ठाकरे गटाच्या आमदाराच्या मुलाची गायक सोनू निगमला धक्काबुक्की
Admin

ठाकरे गटाच्या आमदाराच्या मुलाची गायक सोनू निगमला धक्काबुक्की

बॉलिवूड गायक सोनू निगम आणि त्याचा मित्र रब्बानी मुस्तफा खान यांच्यावर हल्ला झाल्याचा आरोप आहे.

बॉलिवूड गायक सोनू निगम आणि त्याचा मित्र रब्बानी मुस्तफा खान यांच्यावर हल्ला झाल्याचा आरोप आहे. मुंबईतील चेंबूर भागात एका कार्यक्रमादरम्यान हा हल्ला झाला. सोनू निगमचा मित्र रब्बानी मुस्तफा खान याला अधिक दुखापत झाली आहे. खानला रुग्णालयात नेले तेव्हा सोनू निगमही त्याच्यासोबत होता. यानंतर सोनू निगम आपला जबाब नोंदवण्यासाठी पोलिसात पोहोचला.

मुंबईतील चेंबूर परिसरात ठाकरे गटाचे आमदार प्रकाश फातर्पेकर यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या फेस्टिवलमध्ये सोनू निगम उपस्थित होता. त्यावेळी सेल्फी घेण्याच्या वादातून आमदाराच्या मुलाची सोनू निगम आणि त्याच्या टीमसोबत भांडण झाले. आमदाराच्या मुलाला सोनू निगमसोबत फोटो काढायचा होता, तो स्टेजवर चढला. मात्र सोनूच्या टीमने त्याला अडवले. सोनू स्टेजवरून खाली उतरत असताना त्याने स्टेजच्या मागच्या पायऱ्यांकडे त्याला ढकलले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com