Kamal Haasan Hospitalised
Kamal Haasan HospitalisedTeam Lokshahi

Kamal Haasan : सुपरस्टार कमल हासन यांची प्रकृती खालावली;रूग्णालयात करण्यात आलं दाखल

साऊथ सुपरस्टार कमल हासन यांची तब्येत ठीक नसून त्यांची प्रकृती खालवली असल्याचं सांगण्यात येत आहे.
Published by :
Pankaj Prabhakar Rane

साऊथ सुपरस्टार कमल हासन यांची तब्येत ठीक नसून त्यांची प्रकृती खालवली असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यांना तातडीने उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कमल हासन यांना नियमित आरोग्य तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी तब्येत खालावली असल्याची माहिती आहे.  

Kamal Haasan Hospitalised
Vikram Gokhale : ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या प्रकृतीसंदर्भात मोठी अपडेट

अहवालानुसार, कमल हासन यांना बुधवारी खूप ताप आला, त्यानंतर त्यांना चेन्नईतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहे. चिंता करण्याचं कुठलंही कारण नसल्याचं डॉक्टरांकडून सांगण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार डॉक्टरांनी त्यांना पुढील दोन दिवस पूर्ण विश्रांतीचा सल्ला दिला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com