RRR 2 : ऑस्करनंतर राजामौलींची मोठी घोषणा; आता 'आरआरआर 2' येणार लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
Admin

RRR 2 : ऑस्करनंतर राजामौलींची मोठी घोषणा; आता 'आरआरआर 2' येणार लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

RRR चित्रपटाने इतिहास घडवला. नाटू नाटू गाण्याला ऑस्कर पुरस्कार मिळाला.

RRR चित्रपटाने इतिहास घडवला. नाटू नाटू गाण्याला ऑस्कर पुरस्कार मिळाला. नाटू नाटू गाण्याला बेस्ट ओरिजनल साँगचा पुरस्कार मिळाला आहे. चित्रपटसृष्टीतील मानाचा समजला जाणारा पुरस्कार म्हणून ऑस्कर ओळखला जातो.

एस एस एस राजामौली दिग्दर्शित आरआरआऱ या चित्रपटातील नाटू नाटू गाण्याला ऑस्कर पुरस्कार मिळाला. त्यामुळे भारतीय चित्रपटसृष्टीत आनंदाने वातावरण आहे. काही दिवसांपूर्वी ऑस्कर-2023 ची शॉर्टलिस्ट यादी काही दिवसांपूर्वी जाहीर झाली होती. त्यात 'नाटू नाटू' गाण्याला नामांकन मिळालं होते.

याच पार्श्वभूमीवर आता दिग्दर्शक राजामौलींनी मोठी घोषणा केली आहे. ऑस्कर जिंकल्यानंतर एस. एस राजामौलींनी लॉस एंजेलिसमध्ये एका खास पार्टीचे आयोजन केले होते. यात त्यांनी घोषणा केली की, "आरआरआर 2' या सिनेमाचा आम्ही विचार करत आहोत. या सिनेमाच्या कथानकावर काम सुरू आहे. तसेच लवकरच शूटिंगला सुरुवात करु. असे त्यांनी म्हटले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com