Jacqueline Fernandez | Sukesh Chandrasekhar
Jacqueline Fernandez | Sukesh ChandrasekharTeam Lokshahi

'मेरी बेबी, मेरी बोमा' जेलमधून सुकेशने लिहले जॅकलिनला पत्र

200 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात सुकेश चंद्रशेखर सध्या दिल्लीच्या मंडोली कारागृहात बंद आहे. परंतु, त्यानी जेलमधून

तब्बल 200 कोटींच्या मनी लॉन्ड्रींग प्रकरणात तिहार तुरुंगात शिक्षा भोगत असलेला महाठग सुकेश चंद्रशेखरचं एक नवं पत्र समोर आलं आहे. आरोपी सुकेश चंद्रशेखरचे बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसवरील प्रेम संपण्याचे नाव घेत नाही आहे. अलीकडेच तिच्या वाढदिवसानिमित्त महाठग यांनी अभिनेत्रीला पत्र लिहून आपले प्रेम व्यक्त केले होते. त्यातच आता पुन्हा एकदा एक नवीन पत्र समोर आले आहे. या पत्रात त्याने जॅकलिनला इस्टरच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Jacqueline Fernandez | Sukesh Chandrasekhar
Pushpa The Rule Poster : अल्लू अर्जुनने नेसली साडी, कानात झुमका, गळ्यात लिंबाची माळ 'पुष्पा'चा खतरनाक लूक आला समोर

काय लिहले सुकेशने पत्रात?

सुकेशने पत्रात लिहिले की, 'जॅकलिन मेरी बेबी, मेरी बोमा. बेबी तुला इस्टरच्या शुभेच्छा. मला माहिती आहे हा तुझ्या आवडत्या सणांपैकी एक सण आहे. मला आजही तु ज्या प्रकारे इस्टर साजरा करायची ते लक्षात आहे. मला तुझी खूप आठवण येते. मला तुझ्यातील ते लहान मुल पाहायचे जे अंडे तोडून त्यामध्ये कँडी टाकायचे. तुला माहिती आहे का तू की सुंदर आणि गोड आहेस ते. या दुनियेत तुझ्या इतकी सुंदर कोणी नाही. आय लव्ह यू माय बेबी.' असे त्यानी जॅकलिनसाठी लिहले आहे.

200 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात सुकेश चंद्रशेखर सध्या दिल्लीच्या मंडोली कारागृहात बंद आहे. अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिससोबत सुकेशचे संबंध होते. मात्र, जॅकलिनशिवाय नोरा फतेही आणि इतर अनेक अभिनेत्रींची नावेही त्याच्यासोबत जोडली गेली आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com