तुम्ही सनी देओलसारखे दिसता; शेतकऱ्याने अभिनेत्याला ओळखलेच नाही

सनी देओलचा साधेपणा! शेतकऱ्याशी मारल्या दिलखुलास गप्पा

सनी देओल सध्या गदर 2 सिनेमाच्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटातील काही सीन्स आणि फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. अशातच, सनीचा आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून यात तो एका शेतकऱ्यासोबत दिसत आहे. या व्हिडिओमध्ये सनी देओल बैलगाडीवर बसलेल्या शेतकऱ्याशी बोलत होता. मात्र, विशेष बाब म्हणजे तो सनी देओलशी बोलत असल्याचे शेतकऱ्याला माहीत नव्हते.

गदर 2 हा चित्रपट 11 ऑगस्टला स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. हा 2001 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट गदरचा सिक्वेल होता. मागील चित्रपटाप्रमाणेच या चित्रपटाचेही दिग्दर्शन अनिल शर्मा यांनी केले आहे. बॉक्स ऑफिसवर रणबीर कपूरच्या अॅनिमल आणि विवेक अग्निहोत्रीच्या 'द वॅक्सीन वॉर'शी टक्कर होणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com