sushant shelar
sushant shelar Team Lokshahi

मराठी नाट्य कलाकार संघाच्या अध्यक्षपदी सुशांत शेलार

मराठी नाट्य कलाकार संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सुशांत शेलार यांना अध्यक्ष म्हणून घोषित करण्यात आले आहे.

मुंबई : मराठी नाट्य कलाकार संघाच्या अध्यक्षपदी अभिनेता सुशांत शेलार (Sushant Shelar ) यांची निवड करण्यात आली. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेशी संलग्न असलेल्या मराठी नाट्य कलाकार संघाच्या सर्वसाधारण सभेत ही घोषणा करण्यात आली.

मराठी नाट्य कलाकार संघाची सर्वसाधारण सभा काल 13 सप्टेंबर 2022 रोजी माटुंगा येथील यशवंत नाट्य मंदिरमध्ये पार पडली. यामध्ये सर्वानुमते सुशांत शेलार यांची संघाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. संघाच्या सर्वसाधारण सभेत माजी अध्यक्ष प्रदीप कबरे यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर सुशांत यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली.

sushant shelar
दमदार कलाकारांची "हवाहवाई"मध्ये फौज!!

मागील दहा वर्षांपासून अध्यपदाची धुरा सांभाळल्यानंतर नवीन पिढीला संधी देण्याच्या उद्देशाने कबरे यांनी सुशांत यांचे अध्यक्षपदासाठी नाव सुचवले. त्यांच्या नावाला उपाध्यक्ष शरद पोंक्षे यांनी अनुमोदन दिले.

Lokshahi
www.lokshahi.com