'तारक मेहता का उलटा चष्मा' फेम चंपक चाचा यांना शूटिंग दरम्यान दुखापत

'तारक मेहता का उलटा चष्मा' फेम चंपक चाचा यांना शूटिंग दरम्यान दुखापत

शुटींग दरम्यान धावण्याचा सीन शूट करत असताना तोल जाऊन पाय घसरून हा अपघात झाल्याचे समजले.दुखापतीमुळे आता काही दिवस तरी आपल्या सगळ्यांचेच लाडके चंपक चाचा आता मालिकेत दिसणार नाही यावर प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली.

'तारक मेहता का उलटा चष्मा' मागील १४ वर्षापासून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य घालवणारी मालिका म्हणून नावाजली जातेय. १४ वर्ष होऊनसुद्धा प्रेक्षक या मालिकेला आजही तितकाच भरगोस प्रतिसाद देताना दिसून येतायत.जगभरात या मालिकेचे चाहते पसरले आहेत. याच दरम्यान असे समोर आले कि चंपक चाचा हे पात्र साकारणारे 'अमित भट्ट' यांना शुटींग दरम्यान दुखापात झाली. सीन शूट करताना हि दुखापत झाल्याची माहिती समोर आली.

शुटींग दरम्यान धावण्याचा सीन शूट करत असताना तोल जाऊन पाय घसरून हा अपघात झाल्याचे समजले. अपघातानंतर त्वरीतच त्यांच्यावर उपचार करण्यात आले. उपचारानंतर डॉक्टरांकडून बेड रेस्ट घेण्याचा सल्ला देण्यात आला. अपघाताच्या बातमीमुळे चाहत्यांमध्ये कामालीची नाराजी दिसून आली. दुखापतीमुळे आता काही दिवस तरी आपल्या सगळ्यांचेच लाडके चंपक चाचा आता मालिकेत दिसणार नाही यावर प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली.

'तारक मेहता का उलटा चष्मा' फेम चंपक चाचा यांना शूटिंग दरम्यान दुखापत
Photo : पलकचे गोल्डन साडीमधील फोटो पाहिलेत का?

आपल्या अभिनयाच्या जादूने त्यांनी नेहमीच प्रेक्षकांना हसवले आहे, प्रेक्षकांनी चंपक चाचा मालिकेत दिसणार नाहीत म्हणून नाराजी जरी व्यक्त केली असली तरी सोशल मिडिया मार्फत त्यांना लवकर बरे होण्यासाठी सदिच्छा देण्यात येत आहेत. चंपक चाचा लवकरच पुनरागमन करून चाहत्यांना खळखळून हसवतील अशी आशा. १४ वर्षापासून चालत आलेला 'तारक मेहता का उलटा चष्मा' या मालिकेचा हा वारसा असच पुढेही चालत राहिल व प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडत राहील.

Lokshahi Marathi
www.lokshahi.com