दिग्गज अभिनेते मनोबाला यांचे निधन

दिग्गज अभिनेते मनोबाला यांचे निधन

मनोबाला यांनी वयाच्या ६९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

टॉलीवूडतील ज्येष्ठ कलाकार मनोबाला यांचे वयाच्या ६९ व्या वर्षी निधन झाल्याची माहिती मिळाली आहे. यामुळे तमिळ इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनाबद्दल अनेक चित्रपटसृष्टीतील व्यक्तींनी ट्विटरवर शोक व्यक्त केला. मनोबाला हे मागील अनेक दिवसांपासून खासगी रुग्णालयात दाखल होते. जानेवारीत त्यांच्यावर हृदयविकाराची शस्त्रक्रिया झाली होती. अखेर त्यांची प्राणज्योत आज मालवली.

1970 च्या दशकाच्या सुरुवातीला मनोबाला यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. 1979 मध्ये आलेल्या पुथिया वरपुगल यांच्या चित्रपटात ते सहदिग्दर्शक बनले होते. यानंतर त्यांनी कॉमेडियन म्हणून अनेक चित्रपटात काम केले आहे. अनेक वेळा त्यांनी अशा व्यक्तिरेखा साकारल्या ज्या आजही स्मरणात आहेत. मनोबाला ही एक अष्टपैलू अभिनेता होते. केवळ तमिळच नाही तर त्यांनी तेलुगू आणि मल्याळम चित्रपटांमध्येही काम केले आहे. त्यांच्या निधनाने चाहता वर्गावर शोककळा पसरली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com