करिश्मा का करिश्मा फेम चाइल्ड आर्टिस्ट झनक शुक्लाचा पार पडला साखरपुडा; पाहा फोटो

करिश्मा का करिश्मा फेम चाइल्ड आर्टिस्ट झनक शुक्लाचा पार पडला साखरपुडा; पाहा फोटो

90 च्या दशकातील फेस शो 'करिश्मा का करिश्मा' द्वारे घराघरात पोहचलेली बाल कलाकार अभिनेत्री झनक शुक्ला हिने बॉयफ्रेंड स्वप्नील सूर्यवंशीसोबत एंगेजमेंट केली आहे.

90 च्या दशकातील फेस शो 'करिश्मा का करिश्मा' द्वारे घराघरात पोहचलेली बाल कलाकार अभिनेत्री झनक शुक्ला हिने बॉयफ्रेंड स्वप्नील सूर्यवंशीसोबत एंगेजमेंट केली आहे. स्वत: झनकने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून ही माहिती दिली. झनक आणि स्वप्नील सोफ्यावर हात धरून बसलेले दिसत आहेत. हे सुंदर फोटो शेअर करत झनकने लिहिले की, रोका हो गया है." झनकच्या या पोस्टवर कमेंट्सचा पाऊस पडला आहे. चाहत्यांसोबतच सेलिब्रिटी देखील झनकचे अभिनंदन करत आहेत.

झनक आणि स्वप्नील खूप दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते. पण अखेर आता त्यांनी त्यांच्या नात्यावर शिक्कामोर्तब केले आहे. स्वप्नील झनकचा फिटनेस ट्रेनर आहे. आई सुप्रिया शुक्ला यांनीही रोका सोहळ्याचे काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत त्याने झनकसाठी लिहिले की, "माझ्या घरी एक छोटी परी आली आहे. तुमच्या प्रेमाने व आशीर्वादाने घरी रोका सोहळा पार पडला. आभारी आहे देवा तू आमच्या मुलांवर दया कर. ही खास बातमी माझ्या मित्रांसोबत आणि इंस्टा फॅमिलीसोबत शेअर करत आहे. 26 वर्षीय झनक शुक्ला तिचा दीर्घकाळचा प्रियकर स्वप्नील सूर्यवंशीसोबत लग्न करणार आहे. आदल्या दिवशी त्याने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर रोका सोहळ्याचे काही फोटो शेअर केले होते. झनक आणि स्वप्नील दोघेही फोटोमध्ये खूप आनंदी दिसत आहेत.

झनक शुक्ला ही टीव्हीवरील लोकप्रिय शो 'कुमकुम भाग्य' फेम सुप्रिया शुक्ला आणि फिल्ममेकर हरी शुक्ला यांची मुलगी आहे. 'करिश्मा का करिश्मा' आणि 'कल हो ना हो' व्यतिरिक्त, झनक 'डेडलाइन: सिरफ 24 घंट' आणि 'वन नाइट विथ द किंग' या हॉलिवूड चित्रपटासह बाल कलाकार म्हणून इतर अनेक चित्रपटांमध्ये दिसली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com