‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट ऑस्कर 2023 च्या नामांकन यादीत शॉर्टलिस्ट

‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट ऑस्कर 2023 च्या नामांकन यादीत शॉर्टलिस्ट

सर्वाधिक कमाई करणारा ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटावरून मोठा वाद निर्माण झाला होता.
Published by :
Siddhi Naringrekar

सर्वाधिक कमाई करणारा ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटावरून मोठा वाद निर्माण झाला होता. ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाने तब्बल ३०० कोटीहून अधिक कमाई केली. प्रेक्षकांची सुद्धा या चित्रपटाला चांगलीच पसंती मिळाली.

‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट ऑस्कर २०२३ च्या नमांकन यादीत शॉर्टलिस्ट झाला आहे. खुद्द विवेक अग्निहोत्री यांनी ट्वीट करत याबद्दल माहिती दिली. हा चित्रपट गोव्यातील चित्रपट महोत्सवात नदाव लॅपिड यांनी चित्रपटाला व्हल्गर आणि प्रॉपगंडा म्हणून हिणवल्यामुळे हा चित्रपट चांगलाच चर्चेत होता.

या चित्रपटातील कलाकारांची नावंदेखील या यादीत समाविष्ट करण्यात आली आहेत. अनुपम खेर यांनीदेखील याविषयी ट्वीट करत आनंद व्यक्त केला.

‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट ऑस्कर 2023 च्या नामांकन यादीत शॉर्टलिस्ट
ऑस्करच्या रिमाइंडर लिस्टमध्ये ‘मी वसंतराव’ या मराठी चित्रपटाचा समावेश
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com