Pushpa 2 : अल्लू अर्जुनच्या पुष्पा: द रूल  चित्रपटाच्या निर्मात्यांनी दाखवली दुसऱ्या भागाची झलक; पाहा व्हिडिओ
Admin

Pushpa 2 : अल्लू अर्जुनच्या पुष्पा: द रूल चित्रपटाच्या निर्मात्यांनी दाखवली दुसऱ्या भागाची झलक; पाहा व्हिडिओ

2021 मध्ये रिलीज झालेल्या साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुन आणि अभिनेत्री रश्मिका मंदान्ना यांच्या 'पुष्पा: द राइज' या चित्रपटाने बॉक्स ऑफिस चांगलाच गाजवला.

2021 मध्ये रिलीज झालेल्या साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुन आणि अभिनेत्री रश्मिका मंदान्ना यांच्या 'पुष्पा: द राइज' या चित्रपटाने बॉक्स ऑफिस चांगलाच गाजवला. त्‍याच्‍या उत्‍तम यशानंतर निर्मात्यांनी त्‍याच्‍या पार्ट 2 ची घोषणा केली होती आणि त्‍याच्‍या शूटिंगचे काम सुरू आहे. दरम्यान, निर्मात्यांनी दुसऱ्या भागाची म्हणजेच पुष्पा: द रुलची एक छोटीशी झलक दाखवली आहे.

पुष्पा: द रुलच्या निर्मात्यांनी पुष्पाच्या अधिकृत ट्विटर हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. निर्मात्यांनी पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये अल्लू अर्जुनची झलक पाहायला मिळत आहे. 20 सेकंदांच्या व्हिडिओमध्ये 'पुष्पा' तिरुपती तुरुंगातून पळून गेल्याचे दाखवण्यात आले आहे. तो आता कुठे आहे हे 7 एप्रिलला दुपारी 4 वाजता कळेल. 'शोध लवकर संपेल' असे टीझरमध्ये लिहिले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com