‘तू झूठी मैं मक्कार’ चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर धमाल; दुसऱ्या दिवशीही जबरदस्त कमाई
Admin

‘तू झूठी मैं मक्कार’ चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर धमाल; दुसऱ्या दिवशीही जबरदस्त कमाई

रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर यांचा ‘तू झूठी मैं मक्कार’ मधील फ्रेश जोडी प्रेक्षकांना खूप आवडली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर यांचा ‘तू झूठी मैं मक्कार’ मधील फ्रेश जोडी प्रेक्षकांना खूप आवडली आहे. लव रंजन दिग्दर्शित हा रोमँटिक कॉमेडी चित्रपट होळीच्या दिवशी ८ मार्च रोजी प्रदर्शित झाला. ‘तू झूठी मैं मक्कार’ चित्रपटगृहांमध्ये प्रचंड गाजत आहे. यासोबतच चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली. त्याचबरोबर ‘तू झूठी मैं मक्कारच्या दुसऱ्या दिवसाच्या कमाईचे आकडेही समोर आले आहेत.

रणबीर कपूर-श्रद्धा कपूर स्टारर ‘तू झूठी मैं मक्कार’' या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. कमाईबद्दल बोलायचे झाले तर या चित्रपटाने रिलीजच्या पहिल्याच दिवशी जबरदस्त कलेक्शन केले आहे. पहिल्या दिवशी म्हणजे बुधवारी चित्रपटाने भारतात 15.73 कोटी रुपयांची कमाई केली.

रणबीर कपूरच्या चित्रपटाने रिलीजच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच गुरुवारी 9 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. यासह, चित्रपटाचे एकूण कलेक्शन आता 24.73 कोटी रुपयांवर पोहोचले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com