Oscar 2023 Naatu Naatu : ऑस्करमध्ये लाइव्ह वाजणार ‘नाटू नाटू’ गाणं

Oscar 2023 Naatu Naatu : ऑस्करमध्ये लाइव्ह वाजणार ‘नाटू नाटू’ गाणं

एसएस राजामौली यांच्या 'आरआरआर' या चित्रपटाचा डंका जगभरात वाजत आहे.

एसएस राजामौली यांच्या 'आरआरआर' या चित्रपटाचा डंका जगभरात वाजत आहे. केवळ 'आरआरआर'च नाही तर 'नातू नातू' हे गाणे जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचले आहे. या गाण्याच्या व्हायरल अॅक्रोबॅटिक डान्स फेस ऑफची सर्वत्र चर्चा होत आहे. या गाण्याला आतापर्यंत यूट्यूबवर १२२ दशलक्ष व्ह्यूज मिळाले आहेत, तर इन्स्टाग्रामवरही वेगवान रील्स तयार होत आहेत.

ऑस्कर-2023 ची शॉर्टलिस्ट यादी काही दिवसांपूर्वी जाहीर झाली. ज्यामध्ये 'आरआरआर' चित्रपटाच्या 'नाटू नाटू' गाण्याला नामांकन मिळालं. ऑस्कर सोहळ्यात 'नाटू नाटू' गाण्याचं लाइव्ह सादरीकरण केलं जाणार असल्याची माहिती अकादमीने ट्विट करत दिली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com