श्रद्धा-रणबीरचा 'तू झूठी मैं मक्कार'चा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित

श्रद्धा-रणबीरचा 'तू झूठी मैं मक्कार'चा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित

'तू झूठी मैं मक्कार'हा चित्रपट सिनेमागृहांमध्ये रोमान्सला 2023 मध्ये पुनरुज्जीवित करण्यासाठी सज्ज

बहुप्रतीक्षित चित्रपट 'तू झूठी मैं मक्कार'चा ट्रेलर आज एका मेगा इव्हेंटमध्ये रिलीज करण्यात आला असून, याला प्रेक्षकांच्या जबरदस्त प्रतिक्रिया मिळाल्या. या ट्रेलरमध्ये रणबीर कपूर आणि श्रध्दा कपूरमधील उत्कृष्ट केमिस्ट्री, उत्कृष्ट व्हिज्युअल्स, उत्तम डायलॉग्स पाहायला मिळत आहेत. हा ट्रेलर टायटलप्रमाणेच मजेदार, ट्विस्टने भरपूर आणि रिलेटेबल आहे. अशातच, 'तू झूठी मैं मक्कार'हा चित्रपट सिनेमागृहांमध्ये रोमान्सला 2023 मध्ये पुनरुज्जीवित करण्यासाठी सज्ज आहे.

या चित्रपटाद्वारे पदार्पण करणार्‍या स्टँड-अप किंग अनुभव सिंग बस्सी यांनी या कार्यक्रमाचे आयोजन करत आपल्या विनोदी वन लाइनर्सने सर्वांचे मनोरंजन केले आणि वर्षातील सर्वात मनोरंजक ट्रेलर लॉन्चसाठी माहोल सेट केला. तसेच, कार्यक्रमादरम्यान जेव्हा 'झूठी' श्रद्धा आणि 'मक्कार' रणबीर यांनी दिग्दर्शक लव रंजनसोबत स्टेज शेअर केला तेव्हा आपले किस्से सांगत सर्वांचे मनोरंजन केले. तेव्हा असे समजले की चित्रपटाच्या शूटिंगमध्ये जेवढी मजा येते तेवढीच ती पडद्यावर देखील दिसून येते. अशातच, या ट्रेलरमध्ये प्रीतम, अमिताभ भट्टाचार्य आणि अरिजित सिंग यांच्या एकत्र येण्याची जादूसह चित्रपटाच्या सुरेख संगीताची झलकही पाहायला मिळते.

प्रेक्षकांनी एक रिअल युवा रोम-कॉम चित्रपटाची दीर्घकाळ प्रतीक्षा केली आहे आणि 'तू झूठी मैं मक्कार'या सिनेमाने निश्चितपणे सर्व बॉक्सेसमध्ये टिकमार्क केले आहे. दरम्यान, आता या ट्रेलरने चित्रपटाबद्दलची अपेक्षा वाढवली आहे. अशातच, लव फिल्म्सचे लव रंजन आणि अंकुर गर्ग निर्मित 'तू झूठी मैं मक्कार'या चित्रपटाचे दिग्दर्शन लव रंजन यांनी केले आहे. तसेच, टी-सिरीजचे गुलशन कुमार आणि भूषण कुमारद्वारा प्रस्तुत हा चित्रपट, 8 मार्च 2023 रोजी होळीच्या दिवशी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com