Ved Movie
Ved Movie Team Lokshahi

'वेड' चित्रपटासाठी थिएटर मालकांनी सर्कस आणि अवतार २ चित्रपटाचे थांबवले शो

रितेश देशमुखचा वेड चित्रपटांनेही बाजी मारली असून प्रेक्षकांना वेड लावले. प्रेक्षकांचा हा प्रतिसाद थिएटर बाहेर हाऊसफुल्लचे बोर्ड लावताना दिसत आहे.

मराठी चित्रपटांना प्रेक्षकांचा हवा तसा प्रतिसाद मिळत नाही, अशी टीका अनेकदा मराठी चित्रपटांवर झाली होती. परंतु, सध्या मराठी चित्रपटांना सुगीचे दिवस आले आहेत. ऐतिहासिक चित्रपट व कौटुंबिक चित्रपटांना प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला आहे. अशातच रितेश देशमुखचा वेड चित्रपटांनेही बाजी मारली असून प्रेक्षकांना वेड लावले आहे. प्रेक्षकांचा हा प्रतिसाद थिएटर बाहेर हाऊसफुल्लचे बोर्ड लावताना दिसत आहे. एवढंच नाहीतर प्रतिसाद पाहून थिएटर मालकांनीही चक्क बॉलिवूड, हॉलिवूडचे चित्रपट शोऐवजी वेड चित्रपटांना स्क्रीन दिली आहे.

दोन आठवड्यापूर्वी रोहित शेट्टीचा सर्कस चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्याच वेळेला हॉलिवूडचा अवतार 2 हा चित्रपटही प्रदर्शित करण्यात आला होता. मात्र, सर्कसला प्रेक्षकांनी सस्पेशल नाकारला असून अवतार 2 ला मोठी गर्दी केली होती. अवतार 2 ने बॉक्सऑफिसवर कोट्यावधींचा गल्ला जमवला आहे. यानंतर मागील आठवड्यात वेड हा एकमेव मराठी चित्रपट प्रदर्शित झाला.

अवतार २ चित्रपटाची जादू कायम असतानाही वेड चित्रपटाने प्रेक्षकांना खेचण्यात यश मिळवले. इस्लामपूरच्या शिवपार्वती थिएटरमध्ये वेड चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांची थिएटर बाहेर तुडुंब गर्दी झाली होती. हे पाहता थिएटर मालकांने सर्कस आणि अवतार 2 चित्रपटाचे शो रद्द करुन वेड चित्रपटाला स्क्रीन दिली.

वेडने सहा दिवसातच १५ कोटी ६७ कोटींचा गल्ला जमविला आहे. वेड या चित्रपटातील गाण्यांनी प्रेक्षकांनाही वेड लावले आहे. वेड चित्रपटाचे दिग्दर्शन अभिनेता रितेश देशमुख यांनी केले असून चित्रपटाची निर्मिती अभिनेत्री जिनिलिया देशमुख यांनी केली आहे. तसेच अशोक सराफ, विद्याधर जोशी, शुभंकर तावडे हे सर्व कलाकार मुख्य भुमिकेत दिसत आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com