या अभिनेत्रीने यावेळी हद्दच ओलांडली; पाहा VIDEO
Team Lokshahi

या अभिनेत्रीने यावेळी हद्दच ओलांडली; पाहा VIDEO

सोशल मीडियावर नेहमीच या अभिनेत्री तिच्या नवनवीन कारनाम्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेते.
Published by :
Pankaj Prabhakar Rane

सोशल मीडियावर नेहमीच उर्फी जावेद तिच्या नवनवीन कारनाम्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेते. उर्फी सोशल मीडियावर दररोज काहीतरी नवीन आणि अनोखे फोटो, व्हिडिओ शेअर करत असते. उर्फी नेहमीच सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. दररोज तिच्या चाहत्यांसह नेटकऱ्यांना आश्चर्याचा धक्का देण्याचा तिचा प्रयत्न असतो.

या अभिनेत्रीने यावेळी हद्दच ओलांडली; पाहा VIDEO
Drishyam 2 Review : शेवटपर्यंत खेळवून ठेवणारा सस्पेन्स आणि जबरदस्त क्लायमॅक्स

दरम्यान उर्फी जावेदने तिचा नवीन व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. उर्फीचा हा व्हिडिओ इंटरनेटवर चांगलाच व्हायरल होत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून युजर्सकडून उर्फीच्या व्हिडिओवर कमेंट आणि लाईक्सचा पाऊस पडत आहे. उर्फी जावेदने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन स्वतःचा व्हिडिओ शेअर केला आहे.

या व्हिडिओवर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. या आउटफिटसाठी लोकांनी उर्फीला ट्रोल करायला सुरूवात केली आहे. अभिनेत्रीच्या या व्हिडीओवर कॉमेंट करताना एका यूजरने लिहिले की, “ही ठार वेडी झाली आहे, हिने तिच्या मर्यादा ओलांडल्या आहेत.” तर आणखी एका युजरने कॉमेंट केली “माझा फोनही चार्ज कर, उर्फी दीदी.” एका यूझरने तर तिला भारताबाहेर फेकून द्या, असेही कॉमेंटमध्ये लिहिले आहे. उर्फी ‘​​बिग बॉस ओटीटी’च्या पहिल्या सीझनचा भाग होती, बिग बॉसच्या घरातील उर्फीचा जास्त दिवस निभाव लागला नाही परंतु या काळात तिने लोकांचे भरपूर भरपूर मनोरंजन केले. आजकाल उर्फी जावेद अशाच चित्र विचित्र फॅशनसाठी चर्चेत असते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com