ऋषभ पंत नव्हे तर 'हा' आहे 'आरपी'; उर्वशी रौतेलाने  उघडले गुपित

ऋषभ पंत नव्हे तर 'हा' आहे 'आरपी'; उर्वशी रौतेलाने उघडले गुपित

बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलाचे नाव क्रिकेटपटू ऋषभ पंतसोबत कोणत्या ना कोणत्या कारणाने जोडले जातेच. पण, याचा खुलासा तिने आज जगासमोर केला आहे.

बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलाचे नाव क्रिकेटपटू ऋषभ पंतसोबत कोणत्या ना कोणत्या कारणाने जोडले जातेच. जेव्हा जेव्हा उर्वशी रौतेला एखादी पोस्ट शेअर करते किंवा मुलाखतीत कोणाबद्दल काही बोलते तेव्हा चाहते तिला ऋषभ पंतसोबत जोडून ट्रोल करतात. पण, उर्वशी रौतेलाच्या आयुष्यातील आरपी ऋषभ पंत नसून दुसरा कोणीतरी आहे. याचा खुलासा तिने आज जगासमोर केला आहे.

उर्वशीला एका मुलाखतीदरम्यान विचारण्यात आले की, हा आरपी कोण आहे? यावर तिने उत्तर दिले की, मी फक्त माझ्या मित्रांबद्दल आणि चित्रपटातील सहकाऱ्यांबद्दल बोलते. आरपी माझा सहकलाकार असून त्याच्यासोबत मी काम करते आहे. आरपी ऋषभ पंत नसून दक्षिणेतील अभिनेता आहे, असे तिने म्हंटले आहे.

उर्वशी रौतेलाच्या या उत्तरावर चाहते पुन्हा तिला ट्रोल करत आहेत. एका यूजरने लिहिले, ऋषभ पंत कुठल्यातरी कोपऱ्यात हसत असेल. दुसर्‍या यूजरने लिहिले, ऋषभ पंत विचार करत असेल मला माफ करा, मी आता सहन करू शकत नाही.

उर्वशी रौतेला ज्या व्यक्तीबद्दल बोलत आहे तो तेलुगू अभिनेता राम पोथिनेनी आहे. तो अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये दिसला आहे. रामने आपल्या करिअरची सुरुवात देवदासू या चित्रपटातून केली होती. त्यांनी अनेक अप्रतिम चित्रपट केले आहेत. राम पोथीनेनी यांच्या आगामी चित्रपटात उर्वशी रौतेलाची खास भूमिका असल्याच्या बातम्या आहेत. दोघांचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

Lokshahi Marathi
www.lokshahi.com