कॉमेडी सस्पेन्सने भरलेला ‘गोविंदा नाम मेरा’चा ट्रेलर प्रदर्शित

कॉमेडी सस्पेन्सने भरलेला ‘गोविंदा नाम मेरा’चा ट्रेलर प्रदर्शित

कॉमेडी सस्पेन्सने भरलेला ‘गोविंदा नाम मेरा’चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

कॉमेडी सस्पेन्सने भरलेला ‘गोविंदा नाम मेरा’चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. यात अभिनेता विकी कौशल, कियारा अडवाणी, भूमी पेडणेकर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपटाच्या ट्रेलरची सुरवात थोडी विनोदी पद्धतीने होते मात्र नंतर चित्रपटाचा ट्रेलर गंभीर बनत जातो. भूमी पेडणेकर यात विकी कौशल्याच्या पत्नीच्या भूमिकेत दाखवली आहे तर विकी दुसरीकडे कियाराबरोबर रोमान्स करताना दिसून आला आहे.

या चित्रपटाची गेली अनेकदिवसांपासून चर्चा सुरु होती आणि अखेर चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट मर्डर मिस्ट्रीवर आधारित असेल. सयाजी शिंदे यांची झलक यात पाहायला मिळते.

हा चित्रपट डिज्नी प्लस हॉटस्टार वर १६ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन शशांक खैतान यांनी केले असून करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनने याची निर्मिती केली आहे.

Lokshahi Marathi
www.lokshahi.com