बहुचर्चित ‘दगडी चाळ २’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

बहुचर्चित ‘दगडी चाळ २’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

दगडी चाळ हा चित्रपट चांगलाच सुपरहिट झाला होता. या चित्रपटातील कलरफुल म्हणजेच सोनल आणि सुर्या यांची लव्हस्टोरी सर्व तरुणांना आजही भुरळ घालते. ही जोडी आता पुन्हा एकदा दगडी चाळ 2 चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पुजाचा कलरफुल लूक नुकताच प्रेक्षकांसमोर आला आहे.

दगडी चाळच्या दुसऱ्या भागाची घोषणा झाल्यापासून यामध्ये कोणते चेहरे झळकणार याबाबत सर्वांनाच उत्सुकता होती. आता यातील कलाकारांचे लूक समोर येत आहेत. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या पोस्टरचे आणि ट्रेलरचे अनावरण दगडी चाळीत अरुण गवळींच्या हस्ते करण्यात आले.

या चित्रपटातील चुकीला माफी नाही हा डायलॉग अजूनही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. त्यानंतर आता दुसऱ्या भागात ‘चाळीचे दरवाजे इतके कमजोर नाहीत की उभं राहायला वाऱ्याचा आधार घेतील’, ‘चाळ काही विसरत नसते’, ‘चुकीला माफी नाही’ असे विविध डायलॉग समोर येत आहे. चंद्रकांत कणसे दिग्दर्शित ‘दगडी चाळ २’ येत्या १९ ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटात मकरंद देशपांडे, अंकुश चौधरी आणि पूजा सावंत मुख्य भूमिकेत असणार आहे.

बहुचर्चित ‘दगडी चाळ २’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित
'दगडी चाळ 2'मध्ये 'कलरफुल' पूजा सावंतचा रोमँटिक अंदाज; पोस्टर रिलीज
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com