Chitra Wagh Urfi Javed
Chitra Wagh Urfi JavedTeam Lokshahi

चित्रा माझी सासू; उर्फीने पुन्हा डिवचले

उर्फी जावेद आणि चित्रा वाघ यांच्यामध्ये ट्विटर वॉर रंगले

मुंबई : उर्फी जावेद आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यामध्ये तू-तू मै-मैं सुरु आहे. तिचे थोबाड फोडणार असल्याचे म्हणत चित्रा वाघ यांनी उर्फीविरोधात पोलिस स्थानकात तक्रार नोंदवली आहे. तरीही उर्फी जावेद शॉर्ट ड्रेस घालून चित्रा वाघ यांना डिवचत आहे. यावरुन दोघींमध्ये ट्विटर वॉर रंगले असून आजही उर्फीने केलेले ट्विट चर्चेत आले आहे. चित्रू मेरी सासू, असे उर्फीने ट्विटमध्ये म्हंटले आहे.

चित्रा वाघ यांच्या आरोपांवर उर्फी जावेद ट्विटरच्या माध्यमातून उत्तर देत आहे. उर्फीनं म्हंटले की, 'मेरी डिपी इतनी ठासू, चित्रा वाघ मेरी सासू', असे ट्विट तिने केले आहे. या ट्विटवरुन नेटकऱ्यांमध्ये चांगलीच चर्चा रंगली आहे. तर, याआधी पंजाबी ड्रेसमधला फोटो शेअर करत चित्रा वाघ यांनी मला सुधरवले. लव्ह यू बेस्टी. पण, अजून खूप सुधार बाकी आहे, सॉरी, असे उर्फीने म्हंटले आहे.

दरम्यान, अभिनेत्री उर्फी जावेदवरून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेताना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर टीका केली होती. यावरुन रुपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषद घेत चित्रा वाघ यांनी राज्य महिला आयोगाच्या अवमान केला आहे. त्या कारणाने त्यांना नोटीस पाठवली असल्याचे सांगितले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com