केंद्र सरकारच्या  ‘काऊ हग डे’ वर उर्फी म्हणाली; गाईचीदेखील संमती...

केंद्र सरकारच्या ‘काऊ हग डे’ वर उर्फी म्हणाली; गाईचीदेखील संमती...

या निर्णयाची जोरदार चर्चा रंगली होती. त्याचा प्रचंड वाद होत असल्यामुळे आता केंद्रसरकारने हा निर्णय मागे घेतला आहे.

सध्या हा ‘व्हॅलेंटाईन डे’ वीक सुरु आहे. प्रेमवीरांनामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच प्रेमवीरांनासाठी केंद्र सरकारच्या पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय आणि मत्स्यव्यवसाय मंत्रालयाने 14 फेब्रुवारी हा दिवस ‘काऊ हग डे’ अर्थात ‘गाईला आलिंगन दिन’ म्हणजेच गाईला मिठी मारून साजरा करण्याचे निर्देश दिले होते. परंतु, या निर्णयाची जोरदार चर्चा रंगली होती. त्याचा प्रचंड वाद होत असल्यामुळे आता केंद्रसरकारने हा निर्णय मागे घेतला आहे. परंतु, त्यावर आता आपल्या फॅशन आणि हटके स्टाईलमुळे चर्चेत असणाऱ्या उर्फी जावेदने ट्वीट करत भाष्य केलं आहे.

काय म्हणाली उर्फी जावेद?

केंद्र सरकारच्या 'काऊ हग डे’ वर बोलताना उर्फी म्हणाली की, उर्फीने शेअर केलेल्या एका व्हिडीओमध्ये भाजप नेते गाईजवळ जाताना दिसत आहेत. पण ते गाईजवळ जाताच गाय त्यांना पाय मारत आहे. त्यानंतर ते पुन्हा गाईला हात लावण्याचा प्रयत्न करतात पण गाय त्यांना पुन्हा मारते. हा व्हिडीओ शेअर करत उर्फीने लिहिलं आहे,"cowhugging". उर्फीने शेअर केलेला हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

यासोबत आणखी दुसरे ट्विट तिने शेअर केले आहे. त्यात तिने एक फोटो शेअर केला या फोटोत एक माणूस गाईला मिठी मारण्यासाठी जाताना दिसतो आहे. पण त्यावेळी बैल म्हणतोय, "लांब हो... ती माझी 'व्हॅलेटाईन आहे". हे ट्वीट शेअर करत उर्फीने लिहिलं आहे,"गाईचीदेखील संमती असणं आवश्यक आहे. #cowhugging".

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com