Urvashi Rautela
Urvashi RautelaTeam Lokshahi

Urvashi Rautela : इजिप्तच्या गायकाने केलं प्रपोज , प्रतिउत्तर देत उर्वशी म्हणाली....

उर्वशी तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलली आहे. ज्यामुळे उर्वशी पुन्हा प्रसिद्धीच्या झोतात उतरलेली आहे.

बॉलीवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला(Urvashi Rautela)गेल्या अनेक दिवसांपासून तिच्या पॅन इंडिया रिलीज झालेल्या 'द लीजेंड' या चित्रपटामुळे चर्चेत होती. कारण उर्वशी रौतेलाच्या चाहत्यांची यादी बरीच मोठी आहे. ती तिच्या ग्लॅमरस लूकमुळे नेहमीच चर्चेत असते. चित्रपटांमध्ये उर्वशी कमी दिसत असली तरीही उर्वशी रौतेला हे मॉडेलिंग विश्वातील एक मोठं नाव आहे. यामुळेच उर्वशी रौतेलाचा 2021 मध्ये झालेल्या मिस युनिव्हर्स स्पर्धेच्या ज्युरीमध्ये समावेश करण्यात आला होता. यावेळी उर्वशी तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलली आहे. ज्यामुळे उर्वशी पुन्हा प्रसिद्धीच्या झोतात उतरलेली आहे.

एका मुलाखतीदरम्यान उर्वशिला काही वैयक्तिक गोष्टी विचारण्यात आल्या होत्या. यावेळी तिने काही गोष्टींचं गुपित उघड केलं आहे. जेव्हा उर्वशी रौतेलाला विचारण्यात आले की तिला एकदा इजिप्तमधील एका गायिकने प्रपोज केले होते. यावर तिने उत्तर दिले की आधीच त्याला 2 बायका आणि 4 मुलं आहेत. अभिनेत्री पुढे असही म्हणाली की आयुष्यात स्वतःवर प्रेम करणं खूप गरजेचं असतं. मला माझ्या आयुष्यात स्वतःला नेहमी आनंदी ठेवायचय. यामुळे अभिनेत्रीने लग्न आणि अफेअरच्या बातम्यांवर स्पष्ट उत्तर दिलेले नाही. उर्वशी रौतेलाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

तिच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती आगामी 'इन्स्पेक्टर अविनाश' या वेबसिरीजमध्ये दिसणार आहे. या मालिकेत उर्वशी अभिनेता रणदीप हुड्डासोबत दिसणार आहे. उर्वशी लवकरच तामिळमध्ये पदार्पण करणार असल्याचीही बातमी पसरत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com