रोहित शेट्टीच्या चित्रपटात झळकणार ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरात

रोहित शेट्टीच्या चित्रपटात झळकणार ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरात

प्रसिद्ध चित्रपट निर्माता-दिग्दर्शक रोहित शेट्टी बॉलीवूडनंतर आता मराठी चित्रपटसृष्टीत आपला ठसा उमटवण्यासाठी सज्ज झाला आहे.

प्रसिद्ध चित्रपट निर्माता-दिग्दर्शक रोहित शेट्टी बॉलीवूडनंतर आता मराठी चित्रपटसृष्टीत आपला ठसा उमटवण्यासाठी सज्ज झाला आहे. 'स्कूल कॉलेज आणि लाईफ' या मराठी चित्रपटातून रोहित शेट्टी मराठी इंडस्ट्रीत पदार्पण करणार आहे. स्कूल, कॉलेज आणि लाइफ हा चित्रपट घेऊन रोहित प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाचा ट्रेलरही आज रिलीज झाला आहे.

या चित्रपटात ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरातसुद्धा दिसणार आहे. याच्याआधी शाहिद कपूरच्या ‘कबीर सिंग’ चित्रपटातही वनिता झळकली होती.या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून त्यात वनिताची झलक पाहायला मिळाली आहे. रोहित शेट्टीच्या या चित्रपटात वनितासह अभिनेता जितेंद्र जोशी, तेजस्वी प्रकाश, करण किशोर, प्रसाद जवादे हे कलाकारही आहेत. तसेच या चित्रपटात तेजस्वी प्रकाश आणि करण परब मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

रोहित शेट्टीच्या चित्रपटात झळकणार ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरात
रोहित शेट्टीचे मराठी इंडस्ट्रीत पदार्पण; पहिल्या-वहिल्या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com