Ved Movie
Ved MovieTeam Lokshahi

'वेड'ने मोडला 'सैराट' सिनेमाचा रेकॉर्ड; केली ऐवढ्या कोटींची कमाई

अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जिनिलिया देशमुखच्या यांच्या 'वेड' या सिनेमाने 'सैराट' या सिनेमाचा रेकॉर्ड मोडला आहे.
Published by :
shamal ghanekar

अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि अभिनेत्री जिनिलिया देशमुख (Genelia Deshmukh) यांच्या 'वेड' (Ved) या सिनेमाने प्रेक्षकवर्गाला वेड लावले आहे. तर वेड या सिनेमाने नागराज मंजुळेंच्या (Nagraj Manjule) बहुचर्चित 'सैराट' (Sairat) या सिनेमाचा रेकॉर्ड मोडला आहे. 'सैराट' या सिनेमाने 12.10 कोटींची कमाई केली होती. तर 'वेड' या सिनेमाने आतापर्यंत 33.42 कोटींची कमाई केली आहे. 

'वेड' या सिनेमाने पहिल्या आठवड्याच्या वीकेंडला १० कोटींची कमाई केली होती, तर दुसऱ्या आठवड्याच्या वीकेंडला १२.७५ कोटींंचा गल्ला जमा केला आहे. 'वेड' हा सिनेमा प्रदर्शित झाल्यापासून आतापर्यंत एकूण ३३.४२ कोटींची कमाई केली आहे.

Ved Movie
'वेड' चित्रपटासाठी थिएटर मालकांनी सर्कस आणि अवतार २ चित्रपटाचे थांबवले शो

'वेड' या सिनेमामध्ये रितेश आणि जिनिलिया यांच्यासह ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, जिया शंकर, विद्याधर जोशी, शुभंकर तावडे हे कलाकार मुख्य भुमिकेत आहेत. तर वेड चित्रपटाचे दिग्दर्शन रितेश देशमुख यांनी केले असून चित्रपटाची निर्मिती अभिनेत्री जिनिलिया देशमुख यांनी केली आहे. वेड या सिनेमाला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळताना दिसत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com