Ved Movie
Ved Movie Team Lokshahi

'वेड' सिनेमाचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत समावेश

प्रेमात वेडं होणं किंवा वेड्यासारखं प्रेम करणं ही भावना वेगळीच आहे. त्यात हे सिनेमारूपात एका हटके कथेतून पाहणं एक वेगळं अनुभव देणारं ठरतं.
Published by :
shamal ghanekar

प्रेमात वेडं होणं किंवा वेड्यासारखं प्रेम करणं ही भावना वेगळीच आहे. त्यात हे सिनेमारूपात एका हटके कथेतून पाहणं एक वेगळं अनुभव देणारं ठरतं. असाच अनुभव देतोय 'वेड' हा चित्रपट. मजीली या तेलुगू चित्रपटपासून प्रेरित हा चित्रपट आहे. पत्नी जिनीलिया पहील्यांदाच मराठीत महत्त्वाच्या भूमिकेत झळकतेय. तर तिने निर्मतीची धुरा देखील सांभाळली आहे. या सिनेमाचा आकर्षणाचा भाग म्हणजे रितेश आणि जिनीलिया (Genelia D'Souza) या खऱ्या आयुष्यातील जोडीला स्क्रीनवर एकत्र पाहणं.

'वेड' हा सिनेमा 30 डिसेंबरला सिनेप्रेमींच्या भेटीला आला असून रिलीजच्या पहिल्या दिवशी या सिनेमाने 2.25 कोटींचा गल्ला जमा केला आहे. तर शनिवारी 3.25 कोटी आणि रविवारी 4.50 कोटींचा गल्ला जमा केला आहे. रिलीजच्या तिसऱ्या दिवशी हा सिनेमा सर्वाधिक कमाई करून मराठी सिनेमांच्या यादीमध्ये 5 नंबरवर आहे. तसेच या सिनेमाने 10.25 कोटींची कमाई केली आहे.

Ved Movie
Ved Movie Review : प्रेमातील वेडेपण अधोरेखित करणारा चित्रपट

अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) या चित्रपटातून दिग्दर्शनात पदार्पण केलं आहे. तर जिनिलिया ही या सिनेमामध्ये महत्त्वाच्या भुमिकेत दिसत आहे. सध्या 'वेड' या सिनेमा बॉक्स ऑफिसवर धमाकुळ घालत आहे. तर वेड या सिनेमाने सर्वांच वेड लावल्याचे पाहायला मिळत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com