महेश मांजरेकर दिग्दर्शित वेडात मराठे वीर दौडले सात चित्रपटाच्या सेटवर 100 फूट दरीत कोसळलेल्या तरुणाचा मृत्यू
Admin

महेश मांजरेकर दिग्दर्शित वेडात मराठे वीर दौडले सात चित्रपटाच्या सेटवर 100 फूट दरीत कोसळलेल्या तरुणाचा मृत्यू

महेश मांजरेकर दिग्दर्शित वेडात मराठे वीर दौडले सात या चित्रपटाचे शूटींग सुरु आहे.

महेश मांजरेकर दिग्दर्शित वेडात मराठे वीर दौडले सात या चित्रपटाचे शूटींग सुरु आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाच्या सेटवर मोठी दुर्घटना घडली होती. पन्हाळ गडाच्या तटबंदीतून हा तरुण दरीत कोसळला होता.

त्याला कोल्हापूरच्या एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र दहा दिवसांच्या उपचारानंतर 28 मार्च रोजी त्याचे निधन झाले.

हा तरुण नागेश प्रशांत खोबरे मोबाईल फोनवर बोलत होता. बोलता बोलता किल्ल्याच्या तटंबंदीजवळ तो आला आणि अचानक 100 फूट खोल दरीत कोसळला. त्याच्या छातीला आणि डोक्याला जबर मार लागला होता. घोड्यांची देखभाल करणारा हा तरुण होता.

महेश मांजरेकर यांच्या वेडात मराठी वीर दौडले सात या चित्रपटात अक्षय कुमार काम करत आहे. या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com