Admin
मनोरंजन
ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांचं निधन
ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांचं निधन झाले आहे
ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांचं निधन झाले आहे. वयाच्या ८८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. भालचंद्र कुलकर्णी यांनी ३०० पेक्षा अधिक सिनेमांमध्ये काम केलं आहे.
‘नवरा नको गं बाई’, ‘पिंजरा’, ‘थरथराट’, ‘मुंबईचा जावाई, हळद रुसली कुंकू हसलं’, ‘माहेरची साडी’ अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी महत्वाच्या भूमिका साकारल्या.
कोल्हपूर याठिकाणी अल्पशा आजाराने भालचंद्र कुलकर्णी यांचं निधन झालं. मराठी कलाविश्वातील भालचंद्र कुलकर्णी यांचं योगदान फार मोठं राहिलं आहे. निधनानंतर अनेक चाहते आणि सेलिब्रिटी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत.