Video : गोरेगाव फिल्मसिटीत भीषण आग; तीन मालिकांचे सेट जळून खाक

मुंबईच्या गोरेगाव फिल्मसिटीत भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. गुम है किसी प्यार में या मालिकेच्या सेटवर शूटिंग सुरू असताना अचानक आग लागली.

मुंबई : मुंबईच्या गोरेगाव फिल्मसिटीत भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. गुम है किसी प्यार में या मालिकेच्या सेटवर शूटिंग सुरू असताना अचानक आग लागली. या मालिकेच्या सेटवर दुपारी चारच्या सुमारास आग लागली. अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

गुम है किसी के प्यार में ही एक लोकप्रिय टेलिव्हिजन मालिका आहे. या मालिकेच्या सेटवर दुपारी चारच्या सुमारास आग लागली. ही आग इतकी भीषण होती की इतर दोन-तीन मालिकांच्या सेटवरही पोहोचली. या आगीत अपनी तेरी मेरी दूरियाँ आणि अंजू या मालिकांचे सेट जळून खाक झाले. यावेळी तेथे एक हजाराहून अधिक लोक उपस्थित होते. आगीतून काही कलाकारांना सुखरूप बाहेर काढण्यात आले असल्याची माहिती मिळत आहे. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न युध्द पातळीवर सुरू आहेत. विशेष म्हणजे मालिकेच्या सेटवर लागलेली आग विझवण्याचे साधन नव्हते. यामुळे कलाकरांच्या सुरक्षितेवर आता प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com