विक्रम गोखले यांच्या प्रकृतीत सुधारणा; व्हेंटिलेरवरुन काढल जाऊ शकत, रुग्णालयाची माहिती

विक्रम गोखले यांच्या प्रकृतीत सुधारणा; व्हेंटिलेरवरुन काढल जाऊ शकत, रुग्णालयाची माहिती

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या प्रकृतीत आता सुधारणा
Published on

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या प्रकृतीत आता सुधारणा होत असल्याची माहिती दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी शिरीष याडगीकर यांनी दिली आहे. विक्रम गोखले यांची प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याची माहिती मिळत आहे.

शिरीष याडगीकर यांनी माहिती दिली की, “विक्रम गोखले यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. ते डोळे उघडत असून हात, पाय हलवत आहेत. पुढील ४८ तासात त्यांचा व्हेंटिलेटर सपोर्टही निघू शकेल त्यांचा रक्तदाब आणि हदयाची क्रिया स्थिर आहे,” अशी त्यांनी माहिती दिली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com