Latest Marathi News Update live : मनोज जरांगे पाटील दिल्लीला जाणार

Latest Marathi News Update live : मनोज जरांगे पाटील दिल्लीला जाणार

Marathi Live Headlines Updates: आज बुधवार, दिनांक 10 डिसेंबर 2025, हिवाळी अधिवेशन, राज्यात थंडी , टी-२० सीरिज, महापालिका निवडणुका अपडेट्स, आजच्या ताज्या बातम्या, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

महायुतीच्या सर्व आमदारांसाठी मुख्यमंत्र्यांची ‘ब्रेकफास्ट डिप्लोमसी’

उद्या सकाळी ८ः३० वाजता मुख्यमंत्र्यांच्या रामगिरी निवासस्थानी आमदारांसोबत चर्चा

आगामी निवडणुकीसंदर्भात आमदारांना महत्त्वाच्या सूचना देण्याची शक्यता

सोबतच, विधिमंडळ कामकाजासंदर्भात देखील चर्चेची शक्यता

Virar: विरार पश्चिम विराट नगर परिसरातील आदिनाथ बिल्डिंगमध्ये पॅसेजचा स्लॅब कोसळला

- इमारतीच्या पॅसेजच्या संरक्षण भिंतीचा स्लॅब खालच्या दुकानावर कोसळला आहे

- या दुर्घटनेत कोणतीही जीवित किंवा जखमी झाला नसल्याची प्राथमिक माहिती आहे

- बोलींज पोलीस, वसई विरार महापालिकेचे अग्निशमन जवान घटनास्थळावर दाखल झाले आहेत

- सुरक्षात्मक उपाययोजनात्मक म्हणून सोसायटीतील राहिवाशाना घर खाली करण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त मनोजकुमार पवार यांनी दिली आहे...

Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटील दिल्लीला जाणार

16 डिसेंबर रोजी मनोज जरांगे पाटील दिल्ली मध्ये असणार..

दिल्लीमध्ये संसदेचं अधिवेशन सुरू असताना मनोज जरांगे पाटील यांचा दिल्ली दौरा..

मृत शौर्य पाटील या विद्यार्थ्याच्या कुटुंबियांची दिल्ली मध्ये घेणार भेट..

शौर्य पाटील याने शिक्षिकांच्या त्रासाला कंटाळून केली होती आत्महत्या..

संसदेच्या अधिवेशनामुळे राज्यातील खासदार दिल्लीत असतानाच मनोज जरांगे पाटील दिल्लीला जाणार..

दिल्लीमध्ये जरांगे पाटील आणि काही खासदारांची भेट होण्याचीही शक्यता..

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली 3 सदस्यीय निवड समितीची बैठक

ढील मुख्य माहिती आयुक्त आणि माहिती आयुक्तांची निवड करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय निवड समितीची बैठक

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे देखील या समितीचे सदस्य आहेत.

केंद्रीय माहिती आयोगातील (सीआयसी) रिक्त पदे भरण्यासाठी होणाऱ्या बैठकीला राहुल गांधी उपस्थित राहण्याची अपेक्षा

महावितरणचे लाचखोर तीन कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात

महावितरण कार्यालयात पदस्थापना बदली देण्यासाठी तीस हजार रुपयाची लाच स्वीकारताना एसीबीने रंगेहात पकडले

आरोपीवरद गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून चौकशीसाठी तिघांना अटक केली आहे

तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीनुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून महावितरण कार्यालयात तीस हजार रुपये स्वीकारताना एच आर विभागातील मॅनेजरसह दोन कर्मचाऱ्यांना पकडले रंगेहात

मुंबई महानगरपालिकेसमोर बेस्टच्या कामगारांचं आंदोलन

१० डिसेंबर मानवी हक्क दिनानिमित्त मुंबई महानगर पालिकेसमोर बेस्ट बचाव आणि कामगार बचाव आंदोलन सुरू आहे.

त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आंदोलन सुरू आहे.

Sharad Pawar: शरद पवारांच्या घरी आज खासदारांना स्नेहभोजन

महाविकास आघाडीच्या सर्व खासदारांना स्नेहभोजन

शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त स्नेहभोजन

वाढदिवसानिमित्त दोन्ही राष्ट्रवादीचे नेते एकत्र येणार

अजित पवार देखील उपस्थित राहण्याची शक्यता

अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल देखील उपस्थित राहणार

सुप्रिया सुळेंनी स्वतः प्रफुल्ल पटेल यांना दिलं निमंत्रण

अजित पवार यांच्या सोबत त्यांच्या पक्षाचे इतर नेते उपस्थित राहणार, सुत्रांची माहिती

UNESCO: युनेस्कोच्या अमुर्त हेरिटेजच्या यादीत आता दिवाळी सणाचा समावेश

सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची विधानसभेत माहिती

यामुळे भारतीय संस्कृतीचा देशात नावलौकिक होईल

Gujarat: गुजरातमधील सुरतच्या राज टेक्सटाईल मार्केटमध्ये भीषण आग

आठव्या मजल्यापर्यंतची अनेक दुकानं जळून खाक....

अग्निशमन दलाच्या अनेक पथकांकडून आग विझवण्याचे प्रयत्न...

विधानसभेत शंभुराज देसाई आणि जयंत पाटलांमध्ये खडाजंगी

'1 नंबरचा माणूस 2 नंबरला जाऊन बसला हा राज्याचा तोटा'

जयंत पाटलांचा शंभुराज देसाईंना टोला

'आम्ही 1 नंबर, 2 नंबर अदलीबदली करत असतो'

शंभुराज देसाईंचं जयंत पाटलांना प्रत्युत्तर

आयटक च्या माध्यमातून विधान भवनावर मुक्कामी मोर्चा

आयटक या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून विधानभवनावर अंगणवाडी सेविकांचा मोर्चा धडकला.

विविध मागण्यांसाठी हजारो अंगणवाडी सेविका आणि महिला परिचारिकांनची यावेळी उपस्थिती होती.

मानधनवाढ, पेन्शन आणि 2022 मधील सुप्रीम कोर्टाच्या ग्रॅज्युटी निर्णयाची अंमलबजावणी, या प्रमुख मागण्या होत्या.

सुप्रीम कोर्टाचा आदेश असूनही सरकार ग्रॅज्युटी देत नाही, हे दुर्दैवी आहे,असा संतप्त आरोप आंदोलकांनी केला.

आता सरकार या मागण्यांवर काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

समग्र शिक्षा संघर्ष समितीच्या वतीने बेमुदत आमरण उपोषण आणि अन्नत्याग आंदोलन

- समग्र शिक्षा मधील कंत्राटी कर्मचाऱ्याला सरसकट शासनसेवेत समाविष्ट करण्याची संघटनेची मागणी

- तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात दिव्यांग विभागातील निम्म्या कर्मचाऱ्यांना शासन सेवेत समाविष्ट केले मात्र उर्वरित कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत नाही घेतले...संघटनेचा आरोप

- आमच्या मागण्या मान्य केल्याची विधानसभेत घोषणा करा, संघटनेची मागणी

- अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी आंदोलक झाले आक्रमक

भुसावळ तालुक्यातील कुऱ्हा पानाचे येथील शेतकऱ्यांनी महावितरण कार्यालयावर काढला मोर्चा

जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातल्या कुऱ्हा पानाचे शिवारात शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळत नसल्याने शेतकरी आक्रमक झाले असून रात्री वन्य जीवांचा धोका असून जीव मोठे टाकून शेतकऱ्यांना पीक जगवण्याची वेळ आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिवसा लाईट मिळावी या मागणीसाठी कुऱ्हा पानाचे येथील शेतकऱ्यांनी महावितरण कार्यालयावर शिंगाडा मोर्चा काढत महावितरण विभागा विरोधात तीव्र रोष व्यक्त केला आहे.

Ladki Bahin Yojana: विधानसभेत लाडकी बहीण योजनेवर चर्चा

2 कोटी 43 लाख लाडक्या बहिणींचं रजिस्ट्रेशन-तटकरे

बोगस लाभार्थ्यांवर कारवाई करणार-मंत्री अदिती तटकरे

Jalna: जालन्यातील कुंभार पिंपळगाव -तीर्थपुरी रस्त्याची दुरवस्था

घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव ते तीर्थपूरी हा रस्ता खड्डेमय झालाय..

आज या रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली असून, या रस्त्यावर नेहमी वाहनासह ऊस वाहतुकीची वर्दळ असते

मात्र रस्त्यावर मोठे, खोल खड्डे पडल्याने हा रस्ता सद्या निर्मनुष्य दिसत आहे,

त्यामुळे या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी नागरिक करतायत..

Nagpur: नागपूरमध्ये अवैध राजकीय होर्डिंग्ज तातडीने हटवण्याचे आदेश

अवैध राजकीय होर्डिंग्ज तातडीने हटवण्याचे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे नागपूर महापालिकेला आदेश दिल्यानंतर महापालिकेला जाग आलेली आहे.

कार्यकर्ते आपल्या नेत्यांच्या स्वागतासाठी मोठमोठे होर्डिंग जे आहेत ते लावत असतात.

नागपूर अधिवेशन काळामध्ये मोठ्या प्रमाणात हे होर्डिंग जे आहेत ते रस्त्यावर व अनेक ठिकाणी लावले जातात.

राज्यात भटक्या श्वानांचा सुळसुळाट वाढला

राज्यात भटक्या श्वानांचा सुळसुळाट वाढला असून मागील सहा वर्षांत 30 लाख नागरिकांना श्वानांचा चावा घेतला आहे. रेबीजमुळे 30 व्यक्तींचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.

पुणे पोलीस शीतल तेजवानीची पोलीस कोठडी वाढवून मागणार

मुंढवा जमीन प्रकरणी उद्या शीतल तेजवानी हिची पोलीस कोठडी संपणार असून पुणे पोलीस शीतल तेजवानीची पोलीस कोठडी वाढवून मागणार आहेत. पुणे पोलिसांकडून शीतल तेजवानीचे 3 बँक अकाऊंट फ्रिझ करण्यात आली आहेत.

मावळातील गुलाब शेतीला इंडिगोचा फटका, देशातील शेतकऱ्यांचे 10 कोटींचे नुकसान

इंडिगो एअर लाईन्सच्या गोंधळात मावळातील गुलाब उत्पादक शेतकऱ्यांना 2 कोटींचा तर देशातील शेतकऱ्यांना दहा कोटींचा फटका बसलाय. रोज देशांतर्गत चाळीस लाख गुलाब फुलांची वाहतूक होते, त्यातील पंचवीस टक्के म्हणजे दहा लाख गुलाबांची वाहतूक ही विमानाने होते.

गडचिरोलीत 11 माओवाद्यांचे आत्मसमर्पण

गडचिरोलीत 11 माओवाद्यांचे आत्मसमर्पण केलं असून यामध्ये चार महिला आणि सात पुरूष माओवाद्यांनी आत्मसमर्पण केलं आहे.

मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात अटकेत असलेल्या शितल तेजवानीच्या मोबाईलची तपासणी करण्यात येणार आहे.

मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात अटकेत असलेल्या शितल तेजवानीच्या मोबाईलची तपासणी करण्यात येणार असून सरकारी पंच आणि स्वतः शितल तेजवानी यांच्या उपस्थितीत मोबाईल एक्सपर्टच्या मदतीने ही तपासणी केली जाईल.

जुन्नरचे आमदार शरद सोनावणे बिबट्याच्या वेशात विधानभवनात

मानवी वस्तीत बिबट्या शिरण्याच्या घटना घडत आहेत यावर तातडीने उपाययोजना करावी यासाठी आमदार शरद सोनावणे यांनी थेट बिबट्याचा वेशात विधानभवनात आले

मालाडमधील मनपा शाळेचा मुद्दा विधानसभेत

विधानसभेत मालाड येथील महापालिकेची शाळा खाजगीकरण करण्याच्या मुद्यावरून मंत्री मंगलप्रभात लोढा आणि अस्लम शेख यांच्यात शाब्दिक चकमक झाली. संबंधित शाळा फजलानी ट्रस्टकडून काढून प्रयास संस्थेला चालवायला दिल्याच्या कारणावरून दोघांमध्ये वाद वाढला.

बारामतीमध्ये सकाळपासून ईडीची छापेमारी

बारामती तालुक्यात आज पहाटेपासून ED ने छापेमारी केली आहे. बारामती तालुक्यातील जळोची खताळ पट्टा आणि झारगडवाडी या गावांमध्ये ED रेड केली आहे. बारामती तालुक्यातील सध्या फरार असलेला आनंद सतीश लोखंडे याच्यावर जवळपास साडेतीनशे कोटींच्या वर वेगवेगळ्या ठिकाणी अपहार झाल्याचे गुन्हे दाखल आहेत.

तीन मजली इमारतीवरून धुळ्यात शाळकरी विद्यार्थ्याचा पतंग उडवताना मृत्यू

धुळे तालुक्यातील कापडणे येथील एका शाळकरी विद्यार्थ्यांचा पतंग उडवत असतांना तीन मजली इमारतीवरून पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

वाघोलीत बिबट्याचा धुमाकूळ; बिबट्याच्या हल्ल्यात एक महिला गंभीर जखमी

वाघोली–अष्टापूर परिसरात कालच बिबट्याच्या हल्ल्यात एक महिला गंभीर जखमी झाल्याची घटना ताजी असतानाच, आज पुन्हा एकदा वाघोली परिसरात बिबट्याचे दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील टाके देवगावच्या बरड्याची वाडी येथील मुलं विक्री प्रकरणी समिती कुटुंबाच्या घरी दाखल

नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील टाके देवगावच्या बरड्याची वाडी येथील मुलं विक्री प्रकरणी समिती कुटुंबाच्या घरी दाखल. समितीकडून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात येणार

नागपूरच्या पारडी शिवारात बिबट्याचा धुमाकूळ

नागपूरच्या पारडी शिवारात बिबट्याचा धुमाकूळ पाहायला मिळत असून बिबट्याने नागरिकांवर हल्ला केल्याची माहिती मिळत आहे. दोन दिवसांपूर्वी कापसी भागामध्ये बिबट्या दिसून आला होता, मात्र त्यावेळेस सर्चिंग केल्यावर बिबट्या सापडला नाही.

मुंबई आणि कर्जतकडे जाणारी लोकल सेवा विस्कळीत

कर्जतहून मुंबईकडे आणि मुंबईहून कर्जतकडे जाणारी लोकल सेवा विस्कळीत झालीये. वांगणी आणि बदलापूर रेल्वे स्थानकादरम्यान डाऊन मार्गावर अग्निरोधक यंत्रणा सक्रिय झाल्यामुळे मेल एक्सप्रेस गाड्या ऑटोमॅटिक पद्धतीने थांबत आहेत. त्यामुळे बदलापूरहून कर्जत कडे जाणाऱ्या लोकल रखडले आहेत. त्याचा परिणाम अप दिशेकडील वाहतुकीवरही होतोय. दोन्ही दिशेकडील वाहतूक खोळंबल्यामुळे कामावर जाणाऱ्या प्रवाशांना याचा पुन्हा फटका बसलाय

पडळकर-आव्हाडांच्या समर्थकांमध्ये राडा प्रकरणाचा आज विधानसभा अध्यक्षांना सादर होणार अहवाल

आज अधिवेशनाचा 3 रा दिवस असून पडळकर आणि आव्हाड यांच्या समर्थकांमध्ये झालेल्या राड्याचा अहवाल तयार. आज सकाळी विधानसभा अध्यक्षांना अहवाल विधिमंडळ सुरक्षा यंत्रणेकडून अहवाल देण्यात येणार असल्याची माहिती

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com