Latest Marathi News Update live : 2008 मधील मनसे आंदोलनप्रकरणी सुनावणी संपली...
Marathi Live Headlines Updates: आज गुरुवार, दिनांक 12 डिसेंबर 2025, हिवाळी अधिवेशन, राज्यातील थंडी , महापालिका निवडणुका अपडेट्स, आजच्या ताज्या बातम्या, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
2008 मधील मनसे आंदोलनप्रकरणी आज सुनावणी होणार पार पडली . त्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे सत्र न्यायालयात दाखल झाले होते. ठाणे रेल्वे कोर्टातील सुनावणी आज राज ठाकरे प्रत्यक्ष हजर झाले होते. परप्रांतीयांच्या रेल्वे भरतीवरून मनसेने 2008 साली आंदोलन केलं होतं
नाशिकच्या पंचवटीत कारचा भीषण अपघात
नाशिकच्या पंचवटीत कारचा भीषण अपघात झाला. अपघातात तीन जण जागीच ठार झाल्याची प्राथमिक माहिती मिळत असून मध्यरात्री 3 वाजता हा अपघात झाल्याची स्थानिकांनी माहिती दिली.
सुलभ शौचालयात अनधिकृतरित्या पुरुषांनी थाटला संसार, रे रोड परिसरातील धक्कादायक प्रकार
मुंबई महापालिका शौचालयांमध्ये अनेकदा अस्वच्छता आणि अपुऱ्या सोयीसुविधा पाहायला मिळतात. असे असताना आता एक धक्कादायक प्रकार समोर आल्याचे पाहायला मिळत आहे. रे रोड परिसरात महिलांच्या शौचालयातच अनधिकृत रित्या संसार थाटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
पुण्यात अजित पवारांच्या पदाधिकाऱ्याची शरद पवार यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांला धमकी
पुण्यात राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याकडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील कार्यकर्त्याला धमकी देण्यात आल्याची माहिती मिळत आहे. बाबुराव चांदेरे आणि समीर चांदेरे यांनी मिळून शिवीगाळ, धमकी आणि मारहाण केल्याचा आरोप करण्यात आले आहे.