
अधिवेशनाच्या आजच्या पाचव्या दिवशी राज्यातील अतिवृष्टीवर पुन्हा चर्चा होण्याची शक्यता असून अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तुटुपुंजी मदत मिळाल्याचा विरोधकांचा दावा आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील 10 नगरपरिषद आणि तीन नगरपंचायतींसाठी मतमोजणी प्रक्रिया 21 डिसेंबरला होणार आहे. यासाठी निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. मतमोजणी दिवशी शासकीय कर्मचारी सोडून अन्य कोणालाही केंद्राच्या 200 मीटरच्या परिसरात जाता येणार नाही .
आज शरद पवार यांचा वाढदिवस आहे. यानिमित्ताने एकनाथ शिंदे यांनी शरद पवार यांच्या शुभेच्छा देण्यासाठी फोन केला.
पार्थ अजित पवार यांच्या अमेडीया कंपनीला मुद्रांक शुल्काचे 22 कोटी रुपये भरण्याचे जिल्हा निबंधकांने आदेश दिले असून मुद्रांक शुल्क बुडवून शासकीय जागेचा व्यवहार करणाऱ्या अमेडीया कंपनीला नोंदणी विभागाने धक्का दिला आहे.
जळगावच्या चोपडा येथे 20 मिनिटांसाठी स्ट्राँग रूम बाहेरील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डिस्प्ले बंद पडल्याच्या प्रकारानंतर शिवसेनेच्या उमेदवारांसह कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला.
लाडकी बहिण योजनेत तब्बल १६५ कोटी रुपये अपात्र लाभार्थ्यांनी लाटले असे महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांची लेखी उत्तरात कबुली दिली असून १२ हजार ४३१ पुरुषांनी २५ कोटी रुपये तर ७७ हजार अपात्र महिलांनी १४० कोटी, तर ९५२६ शासकिय महिला कर्मचाऱ्यांनी १४.५० कोटी रुपये लाटले.
हिवाळी अधिवेशनात चार दिवसांत एक हजार रुग्णांची नोंद झाली असून थंडीचा जोर वाढताच सर्दी, खोकला आणि तापाचे प्रमाण वाढले. विधानभवन आरोग्य केंद्रात रुग्णांची गर्दी झाली असून सर्दी, ताप, खोकल्याचे रुग्ण वाढल्याने आरोग्य केंद्रावरचा ताण वाढला आहे.
महायुती सरकारचे लक्ष वेधण्यासाठी 'लाव रे तो व्हिडिओ' अशी राज्यस्तरीय मोहीम राबवणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य परीट -धोबी आरक्षण हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष विवेक ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. ईमेल आयडी वरून ही धमकी देण्यात आली असून जिल्हाधिकारी कार्यालयात बॉम्बशोधक पथक दाखल झाले आहे.
हिंगोली जिल्ह्यात वातावरणातील बदलामुळे संत्रा उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. शेतकऱ्याने आपल्या अडीच एकर शेतीमधील संत्र्यांची बाग जेसीबीच्या माध्यमातून उध्वस्त केली आहे.
अमरावती महापालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी सज्ज झाली आहे, अमरावती महानगरपालिकेमध्ये एकूण 87 जागा आहेत, या जागेसाठी भारतीय जनता पार्टीतून उमेदवारासाठी तब्बल 641 भावी उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भाजपा पक्षाकडे दाखल केले होते, ते अनुषंगाने आजपासून प्रभाग निहाय इच्छुकांच्या मुलाखती अमरावतीच्या भारतीय जनता पार्टीच्या शहर कार्यालयामध्ये घेण्यात येतं आहे,
उद ग आई उद च्या अखंड गजरात कोल्हापुरातल्या ओढ्यावरील रेणुका मंदिरात पारंपारिक उत्साहात आंबील त्याला सुरुवात झाली आहे. पहाटेपासूनच नैवेद्य अर्पण करण्यासाठी लाखो भाविकांनी प्रचंड गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. मोठ्या गर्दीमुळे मंदिरात्रीला जोडणाऱ्या सर्वच मार्गावर जत्रेचं स्वरूप आला आहे. नैवेद्याची नासाडी होऊ नये यासाठी 200 हून अधिक स्वयंसेवक कार्यरत आहेत. तर सौंदत्ती यात्रेसाठी गेलेले मानाचे जग रात्री उशिरा मंदिरात विसावले आहेत. पहाटे ४ च्या सुमारास देवीची अलंकारिक पूजा बांधण्यात आली. महिला आणि पुरुष अशा दोन स्वतंत्र रांगातून दर्शन व्यवस्था करण्यात आली आहे.
सोन्याच्या आणि चांदीच्या दरात पुन्हा एकदा मोठी वाढ झाल्याचे बघायला मिळालं आहे. सोन्याच्या दराने(Gold Price) जीएसटीसह (GST) 1,36,000 तर चांदीने ही 1,95,000 हजार रुपयांचा नवा उच्चांक गाठला असल्याचं जळगावच्या सुवर्ण नगरीत पाहायला मिळत आहे.
८ वर्षांच्या दर्श सुराणा याने शानदार कामगिरीचे प्रदर्शन करत महाराष्ट्र राज्य रोलर स्केटिंग अजिंक्यपद स्पर्धेत ६०० मीटर व ४०० मीटर शर्यतींमध्ये सुवर्णपदक पटकावले.
उत्कृष्ट गती, संतुलन आणि सातत्यपूर्ण कौशल्याच्या जोरावर दर्शनेने आपला दबदबा राखला आहे
आज दर्श याने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली..
राज ठाकरे यांना त्याने स्केटिंगही करून दाखवले..सोबत दर्श यांचे आई वडील व प्रशिक्षक सुद्धा होते
ईव्हीएम मध्ये छेडछाड होण्याची शक्यता असल्याचा आरोप मारीत करीत स्टाँग रूम परिसरात जामर बसवावा या मागणीसाठी नाशिकच्या मनमाडमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्रवीण नाईक यांच्यासह शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट व काँग्रेस उमेदवारांनी रात्री उशिरा नगर पालिकेच्या प्रवेशद्वाराखाली उपोषण सुरू केले आहे. जामर बसविण्याची वारंवार मागणी करून प्रशासनाकडून कारवाई होत नसल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.
महाराष्ट्र शासनाची भूमिका 'बॉम्बे नाही, मुंबईच' याबाबत खूप स्पष्ट आहे,
अधिकृत आहे आणि तीच आम्ही मांडली आहे आणि यापुढेही मांडणार आहोत.
माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः याबाबतीत केंद्रीय स्तरावरच्या सरकारच्या संबंधित मंत्र्यांना पत्र सुद्धा पाठवलेलं आहे.
केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री महोदयांनी आयआयटी बॉम्बेच्या नावाबाबत केलेल्या विधानाबाबत विधानपरिषद सदस्य अनिल परब यांनी उपस्थित केलेल्या मुद्यावर मंत्री आशिष शेलार यांनी दिलेलं उत्तर.
नागपुरच्या विधानभवनबाहेर आंदोलक आक्रमक
आंदोलकांना शिष्टमंडळ भेटीसाठी विधानभवनात बोलावलं
शिष्टमंडळ भेटीसाठी बोलवून बाहेर ताटकळत उभं ठेवलं गेलं
ताटकळत उभं ठेवल्याने आंदोलक आक्रमक
भिवंडी शहरातील विविध रस्त्यांवर रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू असून व काही धोकादायक इमारती महानगरपालिकेंनी खाली केल्या असून अति धोकादायक इमारतीमध्ये नागरिकांना स्थलांतर करण्यात आले असून शहरातील भंडारी कंपाउंड येथे प्रभाग क्रमांक चार येथे धोकादायक इमारत होती ही इमारत संपूर्ण खाली करण्यात आली होती ती पाडण्याचे काम पालिकेकडून सुरू असतानाच ही इमारत कोसळली आहे. यात कोणतीही जीवित हानी झाली नसून ही संपूर्ण इमारत निर्मनुष्य होती.
'वंदे मातरम उद्यानाचे' उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते थोड्याच वेळात पार पडणार...
- देशाचे रक्षण करण्यासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या २१ परमवीर चक्र विजेत्यांच्या शौर्याला सलाम करण्यासाठी नागपूर महानगरपालिकेने वंदे मातरम् उद्यान साकारले आहे.