Latest Marathi News Update live : 
यशवंत साखर कारखान्याच्या जमीन व्यवहाराला ब्रेक, मुख्यमंत्री फडणवीसांकडून स्थगिती

Latest Marathi News Update live : यशवंत साखर कारखान्याच्या जमीन व्यवहाराला ब्रेक, मुख्यमंत्री फडणवीसांकडून स्थगिती

रत्नागिरी - कोकणात साहसी पर्यटनाला सुरुवात

कोकणात साहसी पर्यटनाला सुरुवात.. ढोकमळे समुद्रकिनाऱ्यावर एडवेंचर स्कुबा डायविंगचा अनुभव.. अनोखा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी...

यशवंत साखर कारखान्याच्या जमीन व्यवहाराला ब्रेक, मुख्यमंत्री फडणवीसांकडून स्थगिती

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या (Yashwant Sugar Factory) जमीन खरेदी–विक्री व्यवहाराला स्थगिती दिली आहे.

माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्यावर आज लातूरमध्ये होणार अंत्यसंस्कार

सकाळी 11 वाजता लिंगायत समाजाच्या रितिरिवाजाप्रमाणे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार. यावेळी काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासह दिग्गज नेते अंत्यसंस्कारावेळी उपस्थित राहणार. वयाच्या 90 व्या वर्षी वृद्धापकाळाने शिवराज पाटील चाकूरकर यांची प्राणज्योत मालवली. शिवराज पाटील चाकूरकर हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते.

जळगावच्या सराफ बाजारामध्ये सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी वाढ

सोन्याच्या दरात हजार 4 हजार 69 रुपयांनी तर चांदीच्या दरात 3 हजार 90 रुपयांनी वाढ झाली आहे. सोन्याचे दर जीएसटी सह 1 लाख 37 हजार 145 रुपयांवर तर चांदीचे दर जीएसटीसह 2 लाख 850 रुपये किलोवर पोहोचली आह. 

पुणे-संभाजीनगर फक्त 2 तासात पार होणार; नितीन गडकरींकडून मोठी घोषणा

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारणात चर्चेचा विषय ठरलेला पुणे ते संभाजीनगर रस्ता आता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

महसूल विभाग अ‍ॅक्शन मोडमध्ये! अवैध उत्खननप्रकरणी 11 अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई

महसूल विभागाने खळबळजनक कारवाई केली आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनीपुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील मंगरुळ येथील अवैध उत्खनन प्रकरणी कारवाईचे आदेश दिले होते.

राज्यात थंडीची लाट

राज्यात थंडीची लाट आली आहे. महाराष्ट्रातील 17 शहरातील पारा महाबळेश्वरपेक्षाही अधिक घसरल्याचे दिसून आले. त्यामुळे हिवाळ्यात राज्यात थंड हवीची ठिकाणं वाढल्याची चर्चा सुरू आहे. राज्यात अनेक ठिकाणी थंडीमुळे शेकोट्या पेटल्या आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com