Latest Marathi News Update live : मुंबईच्या तिन्ही मार्गांवर जम्बो मेगाब्लॉक
Marathi Live Headlines Updates: आज सोमवार, दिनांक 14 डिसेंबर 2025, हिवाळी अधिवेशन, राज्यातील थंडी , महापालिका निवडणुका अपडेट्स, आजच्या ताज्या बातम्या, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर..
मुंबईत पहिल्यांदाच सनबर्न म्युझिक फेस्टिव्हल आयोजित केला जात आहे. हा कार्यक्रम १९ ते २१ डिसेंबर दरम्यान होणार आहे. आशियातील सर्वात मोठ्या इलेक्ट्रॉनिक डान्स म्युझिक (EDM) कार्यक्रमांपैकी एक असलेल्या या कार्यक्रमावरून मुंबईत वाद सुरू आहे. विविध ठिकाणी निदर्शने होत आहेत. लोक सनबर्न फेस्टिव्हलला विरोध करत आहेत.
मुंबईच्या तिन्ही मार्गांवर जम्बो मेगाब्लॉक
मुंबईची लाईफलाईन असलेल्या मुंबई लोकलच्या तिन्हीही मार्गांवर आज मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. मध्य रेल्वे, हार्बर रेल्वे आणि पश्चिम रेल्वेच्या मार्गांवर विविध तांत्रिक आणि अभियांत्रिकी कामांसाठी जम्बो मेगाब्लॉक घेण्यात आला आहे.
नवी मुंबई विमानतळ 10 दिवसात होणार सुरू
नवी मुंबई विमानतळ 10 दिवसात होणार सुरू
मुंबईच्या तुलनेत नवी मुंबई विमानतळावरील तिकिटांच्या दरात मोठी तफावत
नवी मुंबई विमानतळाचे तिकिटांचे दर मुंबई विमानतळाच्या तुलनेत अधिक
दोन्ही विमानतळाच्या तिकिटाचा दर सारखाच असावा यासाठी प्रयत्न सुरू
हिवाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस
आज सभागृहात अंतिम आठवडा प्रस्ताव सादर होऊन त्यावर चर्चा होणार आहे. याशिवाय काही शासकीय कामकाजही सभागृहाच्या अजेंड्यावर आहे.