राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या तारखांची घोषणा केली. सर्वोच्च न्यायलयाच्या आदेशानंतर 12 जिल्हा परिषद, 125 पंचायत समितीमध्ये निवडणुका होणार आहे. प्रत्येक निवडणुकीला दोन मतं द्यावी लागतील. उमेदवारी नोंदणीसाठी महापालिकेचा पॅटर्न वापरला जाईल. नामनिर्देशन प्रक्रिया महापालिकेसारखीच ऑफलाईन घेतली जाईल.

महाराष्ट्रात सध्या २९ महानगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी शिगेला पोहोचली असतानाच आता राज्यात पुन्हा एकदा निवडणुकीचा बिगुल वाजण्याची शक्यता आहे.
मतदान चोरी होऊ न देण्यासाठी ठाकरे बंधूंकडून नवा प्रयोग करण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. या दोन्ही पक्षांकडून मतदानाच्या दिवशी 15 जानेवारीला मतदान केंद्रांबाहेर ‘भगवा गार्ड’ तैनात करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.
पुण्यात आज राज ठाकरे यांची पत्रकार परिषद होणार असून या पत्रकार परिषदेमधून ते काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचे आहे.
नागपुरात मतदान प्रक्रियेसाठी पालिका प्रशासन सज्ज झाली असून संवेदनशील केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्यात येणार असून पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.
नाशिकच्या सातपूर भागात आम आदमी पक्षाचे उमेदवार समाधान आहेर यांच्यावर बंदूक ताणत प्रचाराला न फिरण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदार संघात पैसे वाटपाचे आरोप करण्यात आले असून हेमांगी वरळीकरांच्या पतीने पैसे वाटल्याचा अपक्ष उमेदवार आणि शिंदेंच्या शिवसेनेचा आरोप आहे.
आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरेंची एकत्र प्रचार रॅली होणार आहे. भायखळा, माहीम, वरळी शिवडी या परिसरात आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरेंची एकत्र प्रचार रॅली निघणार आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर असून महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांच्या प्रचार फेरीमध्ये सहभागी होणार आहेत.
29 महानगर पालिकांच्या निवडणुका महाराष्ट्रात पार पडणार आहे. राजकीय पक्षांचा प्रचार आता सध्या शेवटच्या टप्प्यात आला आहे. आज 13 जानेवारीला संध्याकाळी 5.30 वाजता सर्व प्रचारांच्या तोफा थंडावणार आहेत.