राज्यातील सिंचन प्रकल्पांतील कथित घोटाळ्याच्या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तत्कालीन शिवसेना–भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. युती सरकारच्या काळात अनेक सिंचन प्रकल्पांच्या किंमती अनाकलनीयरीत्या वाढवण्यात आल्या, असा गंभीर आरोप करत अजित पवारांनी या प्रकरणात पारदर्शक चौकशीची मागणी केली आहे. “आमच्यावर आरोप करणाऱ्यांनी आधी स्वतःच्या काळातील निर्णयांचा हिशेब द्यावा,” असे स्पष्ट शब्दांत ते म्हणाले. अजित पवार यांनी सांगितले की, सिंचन प्रकल्प हे शेतकऱ्यांच्या जीवनाशी थेट जोडलेले असून, त्यामध्ये झालेली कोणतीही अनियमितता गंभीर बाब आहे. मात्र, ज्या काळात शिवसेना–भाजप युती सत्तेत होती, त्या काळात अनेक प्रकल्पांच्या मूळ अंदाजपत्रकात मोठी वाढ झाली. काही प्रकल्पांची किंमत दुप्पट, तर काहींची तिप्पट करण्यात आली. या वाढीमागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यावरून राज्याच्या राजकारणात नवा वाद पेटला असून, शिवसेना (ठाकरे गट)चे मुखपत्र असलेल्या सामना दैनिकाने आजच्या अग्रलेखातून फडणवीसांवर जोरदार टीका केली आहे. सामनाने मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर “वडापाव आणि झुणका-भाकरीचा द्वेष” असल्याचा आरोप करत, हे वक्तव्य मराठी माणसाच्या कष्ट, रोजगार आणि स्वाभिमानाचा अपमान करणारे असल्याचे म्हटले आहे.
अग्रलेखात नमूद करण्यात आले आहे की, मुंबई आणि महाराष्ट्रातील अनेक उद्योग गुजरातकडे वळत असताना मुख्यमंत्री रोजगार देण्याच्या घोषणा करत आहेत, मात्र प्रत्यक्षात हजारो तरुणांच्या उपजीविकेचे साधन असलेल्या वडापाव उद्योगाला कमी लेखले जात आहे. वडापाव हा केवळ खाद्यपदार्थ नसून, मुंबईतील कष्टकरी, कामगार आणि तरुणांसाठी रोजगाराचे मोठे साधन असल्याचा दावा सामनाने केला आहे. मराठी माणसाचा वडापाव आज आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचला असताना, त्याचा अभिमान बाळगण्याऐवजी त्याची खिल्ली उडवली जात असल्याची टीका अग्रलेखात करण्यात आली आहे.
राज्यातील महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वपूर्ण घडामोड समोर आली आहे. सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय नेते अविनाश जाधव यांनी ज्या ठिकाणी उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत, त्या प्रभागांमधील निवडणूक प्रक्रिया तात्काळ स्थगित करावी, अशी मागणी करत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर उद्या, 14 जानेवारी रोजी तातडीची सुनावणी होणार असल्याची माहिती समोर आली आहे.अविनाश जाधव यांनी आपल्या याचिकेत असा दावा केला आहे की, अनेक ठिकाणी उमेदवार बिनविरोध निवडून येण्यामागे लोकशाही प्रक्रियेला बाधा आणणारे प्रकार घडले आहेत. दबाव, धमक्या, राजकीय हस्तक्षेप आणि प्रशासकीय त्रुटींमुळे काही उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्याची संधीच मिळत नसून, ही बाब लोकशाही मूल्यांच्या विरोधात असल्याचे जाधव यांचे म्हणणे आहे.
कोपरखैरणे येथील नटराज लेडीज बारमध्ये घडलेल्या एका वादग्रस्त घटनेची बातमी लोकशाहीने उघडकीस आणल्यानंतर राज्य पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची दखल थेट राज्याचे पोलीस महासंचालक (DGP) सदानंद दाते यांनी घेतली असून, त्यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात अचानक आणि गोपनीय भेट दिल्याची माहिती समोर आली आहे. या भेटीदरम्यान संबंधित घटनेबाबत सविस्तर माहिती घेण्यात आल्याचे समजते.
महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी उद्या, गुरुवारी 15 जानेवारी 2026 रोजी मतदान होणार आहे. लोकशाहीचा हा महत्त्वाचा उत्सव शांततेत आणि मोठ्या सहभागाने पार पडावा, यासाठी राज्य सरकारने संबंधित मतदान क्षेत्रांमध्ये 15 जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. या निर्णयामुळे मतदारांना मतदानासाठी पुरेसा वेळ मिळणार असून मतदानाचा टक्का वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
भाईंदर पश्चिम परिसरात शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. या घटनेनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून न घेतल्याचा आरोप करत भाजप आमदारांनी पोलीस ठाण्याला घेराव घातला. पोलिसांकडून जाणीवपूर्वक दिरंगाई केली जात असल्याचा आरोप करत दोषींवर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी आमदारांनी केली.