Latest Marathi News Update live : अजित पवार यांची आज पत्रकार परिषद
Marathi Live Headlines Updates: आज शनिवार, दिनांक 17 जानेवारी 2026, राज्यातील थंडी, मुंबई महानगरपालिका निवडणुका निकाल, आजच्या ताज्या बातम्या, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर..
Neela Desai Passes Away : माजी आमदार नीला देसाई यांचे निधन
शिवसेनेच्या पहिल्या महिला आमदार नीला देसाई यांचे निधन झालं आहे. हृदयविकाराच्या झटक्याने नीला देसाई यांचे निधन झालं असून त्यांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात नेण्यात आले होते मात्र उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली.
Devendra Fadnavis : महापालिका निकाल लागताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुण्यात
महापालिका निकाल लागताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुण्यात असणार असून भाजपचे नवनिर्वाचित नगरसेवक फडणवीस यांना भेटण्याची शक्यता
Ajit Pawar : अजित पवार शरद पवारांच्या भेटीला
अजित पवार शरद पवारांच्या भेटीला गेले असून अजित पवार यांच्यासोबत अमोल कोल्हे देखील उपस्थित आहेत.
Uddhav Thackeray : पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्व निवडून आलेल्या उमेदवारांना मातोश्रीवर बोलावले
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्व निवडून आलेल्या उमेदवारांना मातोश्रीवर बोलवले आहे. आज सर्व ठाकरेंच्या शिवसेनेचे निवडून आलेले उमेदवार मातोश्रीवर येतील.