वाशिम जिल्ह्यात यंदा रब्बी हंगामात तब्बल दहा हजार हेक्टर पेक्षा अधिक क्षेत्रावर चीया पिकाची पेरणी झालीये.
मात्र चिया पिकाचा पिकविम्यामध्ये समावेश नसल्याने शेतकऱ्यांसमोर अडचणी उभ्या राहिल्या आहेत, या हंगामात अवकाळी पाऊस किंवा गारपीट झाल्यास चिया उत्पादक शेतकऱ्यांना विमा संरक्षण मिळणार नाही.
त्यामुळे कृषी विभागाने चिया पिकाचाही पिकविम्यात समावेश करावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे....
वांद्रे–वरळी सी लिंकवर धोकादायक वाहन चालवण्याचा थरार समोर आला असून, तब्बल 250 किलोमीटर प्रतितास वेगाने कार चालवल्याप्रकरणी वरळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या घटनेनंतर पोलिसांनी संबंधित कार ताब्यात घेतली आहे.
राज्यात महापालिका निवडणुका महाविकास आघाडी एकत्रच लढणार
महाविकास आघाडीत मनसेला सोबत घेण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी सकारात्मक
जिथे जिथे शक्य होईल तिथ मनसे महाविकास आघाडी सोबत लढण्याची शक्यता
मनसेला सोबत घेण्यासाठी राहुल गांधीचा ग्रीन सिग्नल..
महाविकास आघाडीत मनसेला सोबत घेण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी सकारात्मक
जिथे जिथे शक्य होईल तिथ मनसे महाविकास आघाडी सोबत लढण्याची शक्यता
गेल्या काही आठवड्यांपासून शहरातील हवेची गुणवत्ता निर्देशांक (एक्युआय) सातत्याने ‘मध्यम’ (१०१-२००) ते ‘खराब’ (२०१-३००) या श्रेणीत
वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांची तैनाती, कचरा जाळण्यावर कडक बंदी, बांधकाम स्थळांवरील धूळ नियंत्रण आणि नियमांचे पालन न करणाऱ्या ठिकाणी काम बंद करण्याच्या उपायांचा आता होणार समावेश
शहरात ऑक्टोबर २०२५ पासून १५ डिसेंबर २०२५ पर्यंतच्या सुमारे ७६ दिवसांपैकी तब्बल ४८ दिवस ‘मध्यम’ एक्युआय नोंद
डिसेंबर महिन्यातील ६ दिवस ‘खराब’ श्रेणीत एक्युआय नोंद
- घटनेचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
- अशोका मार्ग परिसरात असलेल्या शुभम अपार्टमेंट मध्ये घडली घटना
- डोक्यात हेल्मेट आणि तोंडाला रुमाल बांधून आलेल्या भामट्याने खेचली सोन साखळी
- सोन सकाळी खेचत असताना महिलेचा आरडाओरड करत असल्याचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेरात कैद
- सोनसाखळी चोरीच्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
हिंगोली जिल्ह्यात जल जीवन मिशनची कामे संथगतीने सुरू असल्याने जल जीवन मिशनची कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश अधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले आहेत, जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या कामांचा आढावा घेत अपूर्ण कामे पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत...
दिल्लीत पडलेल्या धुक्यामुळे पुण्यातून दिल्लीला जाणाऱ्या विमानांना उशीर
कालपासून पुणे विमानतळावरून दिल्लीसाठी उड्डाण घेणाऱ्या विमानांना तीन तासाचा विलंब
एकूण १० विमानांच पुणे विमानतळावरून उशिराने उड्डाण
काल ठाकरेंची शिवसेना, मनसेकडून सांगता सभेसाठी अर्ज
भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेचाही आता अर्ज
संयुक्त सभेसाठी भाजप-शिवसेनेने अर्ज केल्याची माहिती
11, 12 किंवा 13 तारखेला एक दिवस सभेसाठी अर्ज
मनसेकडून 11, ठाकरेंच्या शिवसेनेकडून 12 जानेवारीसाठी अर्ज
पुण्यातील एका गांजा डीलर कडून मिळाली होती पुणे पोलिसांना मोठी माहिती
पुणे पोलिसांनी पिंपरी चिंचवड शहरात जात केली मोठी कारवाई
पिंपरी चिंचवड भागातील एका बहाद्दराने थेट घरामध्येच उगवला होता गांजा
त्या घरामध्ये धाड टाकल्यानंतर पुणे पोलिसांना मिळाला रॅकेटचा बादशाह
जवळपास चार कोटी रुपयांचा गांजा पुणे पोलिसांनी केला जप्त
आज दुपारी पुणे पोलीस पत्रकार परिषद घेऊन माहिती देणार
सकाळी 11 वाजता पुण्यातील पत्रकार भवन येथे घेणार पत्रकार परिषद
- प्रकाश विठ्ठल कीचक अस जखमीच नाव आहे, ते गाई-म्हशी चारताना जंगलालगत हल्ल्यात गंभीर जखमी.
- दबा धरून बसलेल्या अस्वलाने अचानक हल्ला, प्रसंगावधान राखत कीचक यांनी अस्वलाशी झुंज दिली, आरडाओरड केली.
- गावकऱ्यांनी धाव घेत जखमीला तत्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
- उपसरपंच संजय ढोक आणि पोलीस पाटील डहारकर यांनी वनविभागाला माहिती दिली.
- उमरेड वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी सक्रिय, वरिष्ठांना कळविले, त्यानंतर जखमीला नागपूर मेडिकलला हलवले.
- घटना एफडीसीएम वन महामंडळाच्या हद्दीत घडल्याची माहिती.
छत्रपती संभाजीनगर येथे ‘मला आई बनवा, २५ लाख मिळवा’ असे आमिष दाखवून तरुणांची फसवणूक करणाऱ्या सायबर टोळ्यांचे सहा प्रकार शहरात उघडकीस आले आहेत.
बनावट महिला प्रोफाइल्सद्वारे व्हिडिओ कॉल, अंगप्रदर्शन आणि नंतर ब्लॅकमेल करून टप्प्याटप्प्याने पैसे उकळले जात आहेत.
झारखंड व दिल्लीहून कॉल सेंटर चालवले जात असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
सोशल मीडियाच्या माध्यमातून अशा ऑफर्स दिल्या जातात मात्र या ऑफर्सना कोणतेही कायदेशीर अस्तित्व नसून नागरिकांनी प्रतिसाद देऊ नये, फसवणूक झाल्यास तात्काळ १९३० वर संपर्क साधावा, असे पोलिसांनी आवाहन केले आहे.
- बादल नाकोडे अस मृतक तरुणाचे नाव, रुग्णलयात नेत असताना वाटेतच मृत्यू.
- सावनेर शासकीय रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर रेफर करण्यात आले होते.
- ट्रॅक चालक पोलिसांच्या ताब्यात, मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.
- बादल कळमेश्वरहून सावनेरकडे येत असताना ट्रॅक वळण घेताना अपघात.
- अंबिका हॉटेल परिसरात वारंवार अपघात होत असल्याने तातडीने स्पीड ब्रेकर बसवण्याची मागणी
मुंबईत गेल्या काही दिवसांपासून थंडीची चाहूल लागली असतानाच हवामानात मोठा बदल पाहायला मिळत आहे.
शहरावर धुरकट वातावरणाची चादर पसरली असून हवेच्या गुणवत्तेत मोठी घसरण झाली आहे.
आज मुंबई सह दादरचा एअर क्वालिटी इंडेक्स म्हणजेच AQI 155 नोंदवला गेला असून सायंकाळपर्यंत तो 180 च्या पुढे जाण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.
मुंबईत वाढत्या धुके, धूळ आणि वाहनांच्या धुरामुळे प्रदूषणात मोठी वाढ झाली आहे.
अनेक ठिकाणी हवेची गुणवत्ता ‘अतिशय वाईट’ पातळीवर पोहोचली असून आरोग्याच्या धोक्यामुळे नागरिक पुन्हा मास्क वापरताना दिसत आहेत.
निवडणूक जाहीर होताच राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
शिवसेना नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शनिवार २० डिसेंबर रोजी विरारमध्ये येणार आहेत.
विरारच्या विवंता हॉटेलमध्ये ते शिवसैनिकांशी संवाद साधणार आहेत.
यामुळे शिवसैनिकांमध्ये उत्साह पसरला आहे.
यानिमित्ताने जागा वाटपात अधिक जागा पदरात पाडून घेण्याचा शिवसेनेचा यांचा प्रयत्न आहे.
शिंदे यांच्या या दौऱ्यात काही प्रमुख नेते पक्षात प्रवेश करणार आहेत.
आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा होत असून,भाजपा नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार तेजश्री करंजुले आणि नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी ही सभा आयोजित करण्यात आली आहे,
येत्या 20 डिसेंबरला अंबरनाथ नगर परिषदेचे निवडणूक पार पडणार आहे,
शिवाय महायुतीतील शिवसेना शिंदे गट आणि भाजप आमनेसामने असल्यामुळे ही निवडणूक अधिकच रंगतदार झाली आहे,
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांची प्राथमिक बैठक शहरातील एका हॉटेलमध्ये पार पडली.
प्रत्येक प्रभागातील पक्षांची ताकद, इच्छुक उमेदवार आणि महायुती म्हणून निवडणूक एकत्र लढण्याबाबत चर्चा झाली.
या बैठकीत दोन्ही पक्षांत सकारात्मक वातावरण असल्याचे सांगितले.
आज पुन्हा चर्चा होणार असून पालकमंत्री संजय शिरसाट आणि ओबीसी कल्याणमंत्री अतुल सावे यांची स्वतंत्र बैठक होईल.
त्यानंतर महायुतीतील जागावाटपावर अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.
नगर परिषद धर्माबाद येथील निवडणूक प्रचारासाठी ते येत आहेत
सायंकाळी 5 वाजत्या सभेच आयोजन करण्यात आले आहे, दुपारी 3 वाजता नांदेड विमानतळावर आगमन
5 वाजता सभा,9:30 ला आमदार चिखलीकर यांच्या निवासस्थानी राखीव
10 वाजता पुण्याला रवाना होणार आहेत..
ऐन निवडणुकांच्या काळात कार्यालयावर 4 राऊंड फायर...
गोळीबाराची घटना CCTV कॅमेरात कैद.
सध्याच्या एसी लोकलवरचा भार काही अंशी कमी होणार
नवीन एसी लोकल मुंबईत दाखल झाल्या असून जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून वापरात आणणार
यामुळे एसी लोकलच्या १० ते १२ फेऱ्या वाढवण्यात येणार
चेन्नईच्या इंटिग्रिल कोच फॅक्टरीमध्ये या लोकल बनवण्यात आल्या आहेत
राज ठाकरेंनी बोलावली मनसे नेत्यांची बैठक
बैठकीत उद्धव ठाकरेंसोबतच्या युतीबाबत होणार चर्चा
वॉर्डनिहाय मनसे किती जागा लढणार यावरही होणार चर्चा
ठाकरे सेनेचीही आज युतीसंदर्भात बैठक होण्याची शक्यता
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चेवर होणार बैठक
सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि अजित पवार यांच्यात होणार बैठक
शरद पवार यांच्यासोबत जाण्यासंदर्भात करणार चर्चा
दोन कंटेनरची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू तर दोघे गंभीर जखमी झाले असल्याची घटना गेवराई शहरानजीक बाह्यवळण रस्त्यावर घडली आहे.
सदरील ठिकाणी आय आर बी कंपनीकडून रस्त्याचे काम सुरू आहे त्याच ठिकाणी हा भीषण अपघात झाला असुन पुन्हा एकदा आय आर बी कंपनीचा धिम्म व भोंगळ कारभार चव्हाट्यावर आलाय.
'करून दाखवलंय ते अभिमानाने सांगूया..' मनपा निवडणुकांचे बिगुल वाचतात ठाकरेंच्या शिवसेनेचा आज पहिला मेळावा...
माजी मंत्री आणि आमदार आदित्य ठाकरे करणार मेळाव्याला संबोधित...
महायुतीकडून ठाकरेंच्या शिवसेनेवर मुंबई महानगरपालिकेतील मागील २५ वर्षाच्या संदर्भातील अनेक गंभीर आरोप केल्यानंतर आजच्या मेळाव्याला विशेष महत्त्व..
तीन मोठाल्या स्क्रीनच्या माध्यमातून आदित ठाकरे यांचे विशेष प्रेझेंटेशन...
ठाकरेंच्या शिवसेनेने मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून कोणती कामे केली या संदर्भातील हे विशेष प्रेझेंटेशन...
नगरपालिका निवडणूक निकालापुर्वी तुळजापुरात भाजप आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी
एकजण गंभीर जखमी, जखमीला उपचारासाठी सोलापूरला हलवले
तुळजापूर शहरात पोलीस बंदोबस्त तैनात, निकाला आधिच दोन पार्टीचे कार्यकर्ते भिडल्याने तुळजापूर शहरात तणावाचे वातावरण
कर्जफेड करण्यासाठी किडनी विकावी लागल्याचा गंभीर आरोप शेतकरी रोशन कुडे यांनी केल्यावर पोलिसांनी हे प्रकरण युद्धपातळीवर तपासासाठी घेतले असून, या प्रकरणातील सर्व सहा आरोपी सावकारांवर सायंकाळी सात वाजता गुन्हा दाखल करण्यात आला. यात आरोपींवर कलम 29, 31, 32 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. हे सर्व कलम अवैध सावकारी संदर्भात आहेत. आरोपींमध्ये
धारावी पीटीएनच्या हद्दीत इंटरनेट डक्टमध्ये वायर दुरुस्तीच्या कामादरम्यान एक अजगर आढळला.
पोलिसांना माहिती मिळताच कॉन्स्टेबल सचिन मोरे जे एक प्रशिक्षित सर्पमित्र आहेत, त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.
मोठ्या धाडसाने त्यांनी सुमारे 9 फूट लांबीच्या अजगराची सुरक्षितपणे सुटका केली..
भारतीय जनता पक्षाच्या सरकारने सोनिया राहुलजी गांधी व काँग्रेस पक्षाला नॅशनल हेराल्ड प्रकरणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करून नाहक त्रास दिला यावर काँग्रेस उद्या होणार आक्रमक..
बदनामी केली पण न्यायालयाने निकाल देऊन भाजपाचा बुरखा फाडला आहे...
भाजपाचा खोटेपणा उघड झाला आहे.
भाजपा सरकारच्या इशा-यावर काम करणाऱ्या ईडीच्या कार्यालयावर मुंबई काँग्रेस उद्या दुपारी १ वाजता मोर्चा काढणार आहे..
कल्याण डोंबिवली महानगरपालिका आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कल्याणमध्ये पुन्हा एकदा पक्षप्रवेशावरून राजकीय वाद उफाळून आला आहे.
भाजप आणि शिंदेसेना प्रवेशाबाबत अफवा पसरवल्या जात असून, भाजप पदाधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक चुकीची माहिती प्रसारित केल्याचा गंभीर आरोप शिवसेनेत प्रवेश केलेल्या वंदना गिध यांनी केला आहे.