
राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. मंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा अजित पवार यांनी स्वीकारला असून राजीनाम्याचे पत्र आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपवलं आहे. मंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा उपमुख्यमंत्री अजि पवार यांनी स्वीकारल्याचं जाहीर केलं आहे.
नवी मुंबई काँग्रेस जिल्हाध्यक्षा पूनम पाटील यांनी पक्षाला रामराम ठोकत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्याने रिक्त झालेल्या जागेवर आबा पाटील यांना प्रभारी अध्यक्षपद देण्यात आलंय. ऐन निवडणुकीत जिल्हाध्यक्षानेच पक्ष सोडल्याने निवडणुकीच्या 15 दिवस आधी नवी जिल्हाध्यक्षांची नेमणूक करण्याची नामुष्की काँग्रेसवर आली.
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपचा जाहीरनामा पुढील आठवड्यात जाहीर होणार आहे. काही दिवसांपूर्वी भाजपने मुंबईकरांचे प्रश्न आणि मते मागवली होती. त्यानुसार जाहीरनामा तयार केला जाणार आहे
उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार मंगल कल्याण मगरे यांच्या घरासमोर लिंबू,नारळ, हळद, कुंकू एक बाहुली ,टाचण पिना व पुजलेली टोपली आढळून आली, जादूटोण्याचा संशय या ठिकाणी व्यक्त केला गेला यामुळे पैठण शहरात खळबळ उडाली,
सांगलीच्या ईश्वरपूरमध्ये शाळकरी मुलीवर दोघांकडून आळीपाळीने अत्याचार अत्याचारानंतर पीडितेला विवस्त्र सोडून दोघांचे पलायन करण्यात आले. पीडिता रस्त्यावरून विवस्त्र चालत जाताना प्रकार उघडकीस सराईत गुन्हेगारासह दोघांना तत्काळ अटक करण्यात आली.
आमदार धनंजय मुंडे यांच्या संभाव्य मंत्रिमंडळ प्रवेशाच्या विरोधात आता मराठा क्रांती मोर्चा आक्रमक झाला आहे. धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात घेतले तर अजित दादांची राष्ट्रवादी आगामी महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये नेस्तनाबूत केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक महेश डोंगरे पाटील यांनी दिलाय.
माणिकराव कोकाटे यांना उच्च रक्तदाब व श्वसनाचा त्रास होत असल्याने त्यांना काल दुपारच्या सुमारास रुग्णालयात आणण्यात आले. त्यांना श्वास घेण्यात अडचण येत असल्याने आणि हृदयाशी संबंधित त्रास जाणवत असल्याने डॉक्टरांनी त्यांना अतिदक्षता विभागात (ICU) ठेवण्यात आले असल्याची काल माहिती दिली
माणिकराव कोकाटे अटक वॉरंट प्रकरण, नाशिक पोलिसांकडून कायदेशीर बाबींची पडताळणी सुरू झाली. पथक पाठवण्याबाबत लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे. कोकाटे सध्या मुंबईच्या लीलावती रुग्णालयात उपचार घेत आहेत.
मुंबईतील वांद्रे कोर्टत बॉम्ब ठेवल्याची धमकी मिळाली असून बॉम्बशोधक पथक कोर्टात दाखल झाले आहे. धमकीचा ईमेल मिळताच संपूर्ण कोर्ट परिसर खाली करण्यात आला.
नागपूर जिल्हा सत्र न्यायालय बॉम्बने उडविण्याच्या धमकीचा मेल आल्याची माहिती मिळत असून जिल्हा सत्र न्यायालयाच्या मेलआयडी वर हा मेल आला आहे. सुरक्षेच्या दृष्टीने खबरदारी म्हणून सत्र न्यायालय परिसरात पोलीस सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
मुंबई मनपासाठी भाजपचा जाहीरनामा पुढील आठवड्यात जाहीर होणार असल्याची माहिती मिळत असून मुंबईकरांच्या प्रश्नांनुसार जाहीरनामा तयार केला जाणार आहे.
अजित पवार,तटकरे,प्रफुल्ल पटेलांची बैठक सुरु असून मुंबईत नवाब मलिकांशिवाय समन्वय समिती स्थापन करता येईल का यावर चर्चा? करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.
मराठी अभ्यास केंद्राचं आज आंदोलन असून पोलिसांनी परवानगी नाकारली तरी आंदोलनावर ठाम असल्याचे पाहायला मिळत आहे. मराठी शाळा जाणून बुजून बंद केल्याचा त्यांनी आरोप केला आहे.
संजय राऊत आज शरद पवारांची भेट घेण्याची शक्यता असून पालिका निवडणुकीसंदर्भात चर्चा करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
माणिकराव कोकाटे यांना उच्च रक्तदाब व श्वसनाचा त्रास होत असल्याने त्यांना काल दुपारच्या सुमारास रुग्णालयात आणण्यात आले. माणिकराव कोकाटेंची प्रकृती स्थिर असून आज डिस्चार्ज देण्याबाबत माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
अंजली दमानिया आज चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेणार आहेत. शासकीय निवासस्थानी त्या भेट घेणार असून भेटीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मनसेच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक आज शिवतिर्थावर बोलावली आहे. या बैठकीत ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या युती संदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे. या बैठकीनंतर ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होण्याची शक्यता आहे.