Latest Marathi News Update live :  माणिकराव कोकाटेंना हायकोर्टाचा तात्पुरता दिलासा

Latest Marathi News Update live : माणिकराव कोकाटेंना हायकोर्टाचा तात्पुरता दिलासा

Marathi Live Headlines Updates: आज शुक्रवार, दिनांक 19 डिसेंबर २०२५, राज्यातील थंडी, महापालिका निवडणुका अपडेट्स, माणिकराव कोकाटे, मनसे मिटिंग, धुरंधर चित्रपट, आजच्या ताज्या बातम्या, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर..

अनिल परब राज ठाकरेंच्या भेटीला 

अनिल परब राज ठाकरेंच्या भेटीला दाखल झाले आहेत.

मंत्री आशिष शेलार आज दिल्ली दौऱ्यावर

मंत्री आशिष शेलार आज दिल्ली दौऱ्यावर जाणार असून कार्यकारी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांची भेट घेणार आहेत.

कल्याणमध्ये शिवसेना ठाकरे गटाला भाजपचा धक्का

कल्याण ग्रामीणचे माजी आमदार सुभाष भोईर भाजपात प्रवेश करणार आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होणार आहे.

अमेडिया कंपनीला दिलेले इरादा पत्र रद्द

उद्योग संचालनालय विभागाने अमेडिया कंपनीला दिलेले इरादा पत्र आता मागे घेऊन रद्द करण्यात आले आहे. ही कारवाई उद्योग संचालनालय विभागाकडून करण्यात आली आहे.

पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची महत्त्वाची बैठक सुरू

पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची महत्त्वाची बैठक सुरू असून प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या उपस्थितीत पक्ष कार्यालयात ही बैठक होत आहे.

माणिकराव कोकाटेंचा राजीनामा राज्यपालांकडून मंजूर

माणिकराव कोकाटेंचा राजीनामा राज्यपालांकडून मंजूर करण्यात आला आहे.

सदनिका घोटाळा प्रकरणी कोकाटेंच्या याचिकेवर आज हायकोर्टात सुनावणी

सदनिका घोटाळा प्रकरणी कोकाटेंच्या याचिकेवर आज हायकोर्टात सुनावणी होणार आहे. त्यामुळे कोकाटेंवर अटकेची टांगती तलवार कायम असून अनिकेत निकम आज पुन्हा माणिकराव कोकाटे यांची बाजू कोर्टात मांडणार

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com