Latest Marathi News Update live :
Lokshahi Marathi live Latest Marathi News Update live :

Latest Marathi News Update live : राज्यातील 23 नगरपालिकांच्या मतदानाला सुरूवात

राज्यातील 23 नगरपालिकांच्या मतदानाला सुरूवात

राज्यातील नगरपरिषदा व नगरपंचायतीच्या निवडणुका 2 डिसेंबर रोजी पार पडल्या. मात्र, त्यापैकी 23 नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आज त्या उर्वरित 23 नगरपरिषद आणि नगरपंचायतीचे मतदान होणार आहे. निकाल उद्याच म्हणजे 21 डिसेंबर रोजी लागेल. 23 नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या अध्यक्ष व सदस्यांचे भविष्य आज ठरणार आहे

गुजरात, तामिळनाडूत मतदारयादीतून दीड कोटी नावे वगळली

निवडणूक आयोगाने आज गुजरात आणि तामिळनाडूमध्ये एसआयआर मोहिमेनंतर प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या आहेत. तामिळनाडूमधून तब्बल 97 लाख आणि गुजरातमधून 73.73 लाख मतदारांची नावे वगळण्यत आली आहेत. गुजरातमध्ये यापूर्वी 5.08 कोटी मतदार होते. त्यातून 73.73 लाख नावे वगळण्यात आल्यानंतर मतदार संख्या 4.34 कोटी झाली आहे. तामिळनाडूमध्ये हा आकडा 97 लाखांनी घटून 5.43 कोटींवर आला आहे.

मुंबईत दीड लाख दुबार मतदार,पडताळणीनंतर आकडेवारीत मोठी घट

मुंबई महानगरपालिकेच्या मतदार यादी पडताळणी प्रक्रियेत धक्कादायक माहिती समोर आली असून, शहरात तब्बल दीड लाख दुबार मतदार असल्याचे निष्पन्न झाले आहे.

१६ जिल्ह्यांतील २४ नगरपालिका-नगरपंचायतींसाठी आज मतदान 

१६ जिल्ह्यांतील २४ नगरपालिका व नगरपंचायतींच्या अध्यक्षपदांसह सर्व सदस्यपदांसाठी आणि ७६ नगरपालिका व नगरपंचायतींमधील १५४ सदस्यपदांच्या जागांसाठी आज मतदान होणार आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com