Latest Marathi News Update live :
Lokshahi Marathi live Latest Marathi News Update live :

Latest Marathi News Update live : उद्या दुपारी 12 वाजता ठाकरेबंधूच्या युतीची घोषणा

Marathi Live Headlines Updates: आज सोमवार, दिनांक 23 डिसेंबर २०२५, राज्यातील थंडी, महापालिका निवडणुका अपडेट्स, आजच्या ताज्या बातम्या, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर..

उद्या दुपारी 12 वाजता ठाकरेबंधूच्या युतीची घोषणा

उद्या दुपारी 12 वाजता ठाकरेबंधूच्या युतीची घोषणा... खासदार संजय राऊतांची ट्विट टाकत दिली माहिती 

महापालिका निवडणुकीत कांजूरमार्ग कचराभूमीचा मुद्दा तापणार

न्यायालयाने देखील त्या परिसरातील दुर्गंधी नियंत्रणात आणण्यासाठी अल्पकालीन उपाय योजना सुचविण्याचे दिले आदेश आहेत. शुद्ध हवं मिळणे हा मूलभूत अधिकाराचा भाग असल्याची न्यायालयाची टिप्पणी. वाढत्या प्रदूषणावर धोरण ठरवण्यासाठी आय आय टी दिल्ली आणि मुंबई यांच्याशी बोलणे सुरू असल्याचे सरकारी वकिलांनी सांगताच न्यायालयाने असमाधान व्यक्त केले. मात्र आजूबाजूला राहणारे नागरिक देखील याप्रकांमुळे त्रस्त असल्याचे पहिला मिळत आहे

राज्यभरात जिंकून आलेल्या शिवसेनेच्या नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचा दादरमध्ये होणार सत्कार.

राज्यभरात जिंकून आलेल्या शिवसेनेच्या नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचा दादरमध्ये होणार सत्कार. शिवसेना मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या नवनिर्विचित नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचा करणार सत्कार. दादरच्या सावरकर स्मारक येथे हा सत्कार सोहळा दुपारी २ च्या सुमारास होणार असल्याची सू्त्रांची माहिती. सत्कार सोहळ्यानंतर नवनिर्वाचित नगराध्यक्षांसह नगरसेवक हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळ येथे अभिवादनासाठी जाणार.

बुर्का घालून फिरत असलेल्या एका व्यक्तीला ‘बालचोर’ समजून जमावाने मारहाण

पार्कसाइट परिसरात आज सकाळी घडलेल्या धक्कादायक घटनेचा CCTV व्हिडीओ समोर आला आहे. बुर्का घालून फिरत असलेल्या एका व्यक्तीला ‘बालचोर’ समजून जमावाने मारहाण केली. नंतर पोलिसांनी हस्तक्षेप करून त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याची ओळख तौसीफ मोहम्मद शेख (वय 33), रिक्षाचालक व स्थानिक रहिवासी अशी पटली.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com