Latest Marathi News Update live
Latest Marathi News Update live

Latest Marathi News Update live : सिंधुदुर्ग चिपी विमानतळाला “नाईट लँडिंग”ची मंजुरी

Marathi Live Headlines Updates: आज शुक्रवार, दिनांक 02 जानेवारी 2026, राज्यातील थंडी, महापालिका निवडणुका अपडेट्स, आजच्या ताज्या बातम्या, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर..

Election : महापालिका निवडणुकांच्या उमेदवारी अर्जांची छाननी पूर्ण; आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख

महापालिका निवडणुकांच्या उमेदवारी अर्जांची छाननी पूर्ण झाली असून आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे.

Pune : पुणे महानगरपालिका निवडणूक; पुण्यात काल दिवसभरात ६७ जणांनी घेतले अर्ज मागे

पुण्यात काल दिवसभरात 67 जणांनी अर्ज मागे घेतले असून आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची मुदत आहे. सकाळी 11 ते 3 पर्यंत अर्ज मागे घेण्याची वेळ आहे.

Chandrashekhar Bawankule :  मंत्री बावनकुळे आज अमरावती दौऱ्यावर

चंद्रशेखर बावनकुळे हे आज अमरावती जिल्हा दौऱ्यावर आहेत. अमरावती महानगरपालिका निवडणुकीत भाजप आणि रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाची युती आहे. मात्र युती असली तरी रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाने शहरात 41 उमेदवार उभे केलेले आहेत.

Amit Thackeray- Aaditya Thackeray :  अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे उमेदवारांशी साधणार संवाद.

अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे उमेदवारांशी संवाद साधणार आहेत. आज दुपारी 2 वाजता दादर शिवसेना भवनमध्ये मुंबई महानगरपालिकेतील 227 उमेदवारांशी संवाद साधणार आहेत.

99th Marathi Sahitya Sammelan : 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच आज उद्घाटन

99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं आज उद्घाटन असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्घाटनाला राहणार उपस्थित

Ajit Pawar : अजित पवार यांची आज पत्रकार परिषद

अजित पवार आज पत्रकार परिषद घेणार आहेत. पिंपरी-चिंचवडमध्ये संध्याकाळी 5 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत.

Sharad Pawar : शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांच्या भेटीला

शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांच्या भेटीला गेले असून अजित पवारांशी उमेदवारी अर्जावरुन चर्चा करणार असल्याची माहिती

Nagpur : नागपुरात उमेदवारीवरुन हायव्होल्टेज ड्रामा; उमेदवार किसन गावंडेंना लोकांनी घरात कोंडलं

नागपुरात उमेदवारीवरुन हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळत असून उमेदवार किसन गावंडेंना लोकांनी घरात कोंडलं आहे. अर्ज मागे घेऊ नये म्हणून घरात बंद करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

Narayan Rane : नारायण राणे यांनी घेतली मंत्री छगन भुजबळ यांची भेट 

नारायण राणे यांनी मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेतली आहे. नारायण राणे यांनी त्यांची भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली आणि विविध विषयांवर संवाद साधला

GST: देशाच्या एकूण जीएसटी संकलनात महाराष्ट्राचं वर्चस्व

देशातील वस्तू आणि सेवाकर (जीएसटी) संकलनात डिसेंबर 2025 मध्ये वार्षिक 6.1 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे.

ताज्या आकडेवारीनुसार, एप्रिल ते डिसेंबर 2025 या नऊ महिन्यांत एकूण जीएसटी संकलनात महाराष्ट्राचा वाटा सुमारे 22 टक्के एवढा आहे.

देशाच्या एकूण जीएसटी संकलनात महाराष्ट्राने पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केलेय.

Pakistan: पाकिस्तानमध्ये खेळाडूंना घेऊन जाणाऱ्या बसचा भीषण अपघात

पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी एक काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली.

खेळाडूंना घेऊन जाणाऱ्या एका बस आणि व्हॅन यांच्यात भीषण अपघात घडला.

या अपघातात १५ जणांचा मृत्यू झाला असून २० हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत.

जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असून मृतांच्या संख्येत वाढ होण्याची भिती व्यक्त केली जात आहे.

Russia: रशियातील नववर्ष सोहळ्यात ड्रोन हल्ला; किमान २४ जणांचा मृत्यू

रशियातील खेरसान प्रांतात नववर्ष स्वागताच्या जल्लोष सुरू असताना, युक्रेनच्या तीन ड्रोननी एका कॅफे आणि हॉटेलवर हल्ला केला.

या हल्ल्यात किमान २४ जणांचा मृत्यू झाला असून ५० हून अधिक लोक जखमी झाले आहेत.

बुधवारी रात्री हा हल्ला झाला.

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्सला भीषण आग

समृद्धी महामार्गावर माळीवाडा टोलनाक्यापासून सुमारे १५ ते १६ किलोमीटर अंतरावर, मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या महामार्ग क्रमांक ४६३ वर साईराम ट्रॅव्हल्सच्या भारत बेंझ (MH19 CX 3015) या प्रवासी बसला भीषण आग लागल्याची घटना घडली.

प्राथमिक माहितीनुसार समोरील ट्रक (CG04 M 8711) ला धडक दिल्यानंतर हा अपघात झाला असून त्यानंतर बसने पेट घेतला.

या बसमध्ये एकूण ३२ जण प्रवास करत होते, त्यामध्ये २९ प्रवासी, २ ड्रायव्हर आणि १ कंडक्टरचा समावेश होता.

Kalyan-Dombivali: कल्याण डोंबिवलीमध्ये शिवसेनेचा डंका अजून १ उमेदवार बिनविरोध विजयी

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची विजयी खेळी,

डोंबिवलीतून २८- ब- मधून ज्योती राजन मराठे यांची बिनविरोध विजयी

महायुतीचे निर्विवाद वर्चस्व

Kalyan-Dombivali:  कल्याण-डोंबिवलीत भाजपची विजयी घोडदौड.

भाजपचे 15 नगरसेवक बिनविरोध...

भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाणांच्या शिष्टाईला यश...

माजी महापौर हसीना फरास यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज घेतला मागे

राष्ट्रवादी काँग्रेस कडून हसीना फरास यांच्यासह मुलगा आदिल फरास यांनाही देण्यात आली होती उमेदवारी

एकाच घरात दोघांना उमेदवारी दिल्याने महायुती मधील इतर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली होती नाराजी

नाराजी नाट्यानंतर हसीना फरास यांनी आपला उमेदवारी अर्ज घेतला मागे

Vasai-Virar: वसई-विरार महापालिका निवडणुकीत मनसेच्या सात बंडखोर उमेदवारांची माघार

वसई विरार महानगर पालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणातून मनसेच्या सात उमेदवारांनी माघार घेतली आहे.

अपक्ष उमेदवारी अर्ज त्यांनी दाखल केला होता मात्र पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशामुळे माघार घेण्यात आली असल्याचे उमेदवारांचे म्हणणे आहे.

पालिकेच्या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही बहुजन विकास आघाडीच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहे. त्यांना दोन ठिकाणी अधिकृत जागा देण्यात आल्या आहेत.

Worli: वरळीत ठाकरे गटाला भाजपचा धक्का

पद्मशाली समाजाचे नेते रमेश मंथेला यांचा भाजपात प्रवेश

ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देत केला प्रवेश

भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या उपस्थितीत केला प्रवेश

Raigad: माणगावजवळ ताम्हिणी घाटात भीषण अपघात

चारचाकी गाडी खोल दरीत कोसळली

अपघातात चालकाचा जागीच मृत्यू

अपघाताच्या ब्लॅकस्पॉटबाबत प्रशासनाचे दुर्लक्ष

भिमाशंकर मंदिरात दर्शनासाठी मज्जाव केल्यानंतर पुजाऱ्याला मारहाण

- शिंदे शिवसेना, पुणे जिल्हाध्यक्ष देवीदास दरेकर यांची पुजाऱ्याला मारहाण

- अभिषेक करणाऱ्यांची आरती सुरू असताना मागे उभे राहिल्याने पुजाऱ्याने बाहेर जाण्यास सांगितल्याने वाद

- भिमाशंकर मंदिरात येथे पुजारी दर्शनासाठी मज्जाव करत असल्याच्या घटना कायमच घडत आहे

- अभिषेक साठी पैसे दिले तर सुलभ दर्शन नाहीतर मंदिराच्या बाहेर काढल्याचे प्रकार कायम घडतात

- मागच्या काही दिवसापूर्वी सुरक्षा रक्षकाकडून महिलेला व तिच्या कुटुंबाला मारहाण केल्याने खेड पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता

- आता या जिल्हाध्यक्षाने मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडिया व्हायरल होतो

- जिल्हाध्यक्ष मंदिरात दर्शनासाठी मज्जाव केला जात असल्याने न्यायालयात धाव घेणार

महामार्गांवरील मोकाट व भटक्या जनावरांना आता बसणार चाप

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाचा महत्त्वाचा निर्णय

जिल्हा रस्ता सुरक्षा राबविणार विशेष मोहिम

गस्ती पथकांच्या मदतीने भटक्या जनावरांचा बंदोबस्त केला जाणार

महामार्गांवरील जनावरांना आता निवाऱ्यांमध्ये ठेवले जाणार

२४ तास कार्यरत असलेल्या पथकांची निर्मिती करण्याचे आदेश

स्थानिक पोलीस, पशुसंवर्धन अधिकारी व नगरपालिका प्राधिकरणाच्या मदतीने होणार कारवाई

Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या फोडणार महापालिकेच्या प्रचाराचा नारळ

सांगली महापालिका प्रचारासाठी उद्या मुख्यमंत्र्यांची पहिली जाहीर सभा

सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या प्रचारार्थ मुख्यमंत्र्यांच्या जाहीर सभेचे आयोजन

इचलकरंजीत मुख्यमंत्र्यांच्या रोड शोचे आयोजन

संध्याकाळी मुख्यमंत्री मुंबई महापालिकेच्या प्रचाराला करणार सुरुवात

वरळीच्या एनएससीआय डोममध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महायुतीचा पहिला मेळावा

राज्यातील 13 जिल्ह्यांमध्ये शासन उभारणार 'उमेद मॉल'

ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंचा महत्त्वाचा निर्णय

पुणे, कोकण, नाशिक, संभाजीनगर, अमरावती, नागपूर विभागात उभारणार मॉल

महिलांना उत्पादन आणि वस्तू विकण्यासाठी मिळणार हक्काचे व्यासपीठ

पहिल्या टप्प्यात 13 ठिकाणी होणार 'उमेद मॉल'ची सुरु

Pandharpur: लोकशाही मराठीचे संचालक गणेश नायडू यांनी सहकुटुंब पंढरपुरात घेतलं विठुरायाचं दर्शन

लोकशाही मराठीचे संचालक गणेश नायडू यांनी सहकुटुंब पंढरपुरात विठुरायाचं दर्शन घेतलं आहे....

यावेळी संध्याकाळी होणाऱ्या देवाच्या धूप आरतीमध्ये देखील नायडू कुटुंब सामील झालं होतं....

ध्रुमीत नायडू, अंजली नायडू यांनी भक्तीभावानं विठ्ठल रुक्मिणीची पूजा केली आहे...

यावेळी उपस्थित असणाऱ्या मंदिराच्या पुजाऱ्यांकडून नायडू कुटुंबीयांनी मंदिराचा इतिहास जाणून घेतला.....

Thane: ठाण्यातील कोर्ट नाक्यावरील बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे मनसेतर्फे आंदोलन

- “मनसेच्या उमेदवारांना विकत घेण्यातं आलं”

- ⁠”५ -५ कोटींना विकत घेण्यात आलय”

- ⁠”शिवसेना आणि भाजपा ने घेतले विकत”

- ⁠घरी पोलिस पाठवून केला छळ

- ⁠मनसे नेते अविनाश जाधव यांचा गंभीर आरोप

- ⁠निवडणूक आयोगाने याची चौकशी करावी

- ⁠ही तक्रारार घेवून आम्ही उद्या कोर्टात जाणार आहे

- शिवसेनेचे सचिव संजय मोरे यांनी निवडणूक अधिका-याच्या मदतीने मनसेचा उमेदवार मुद्दा अवैध ठरवला

नाराज कार्यकर्त्यांची भाजपकडून समजूत, फॉर्म माघारीचा धोका टळला

महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाराज झालेल्या कार्यकर्त्यांना शांत करण्यासाठी भारतीय जनता पार्टीने समजूत काढण्याची मोहीम राबवली. जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे यांनी थेट कार्यकर्त्याच्या घरी जाऊन त्याची भेट घेतली व सविस्तर चर्चा करत गैरसमज दूर केले. उमेदवारी न मिळाल्याने अनेक कार्यकर्ते अर्ज माघारी घेण्याच्या मानसिकतेत होते. मात्र भाजपच्या समजूत काढणाऱ्या टीमने वेळीच हस्तक्षेप करत नाराजांना विश्वासात घेतले. या प्रयत्नांना मोठे यश मिळाले असून फॉर्म माघारीचा धोका टळल्याचे चित्र आहे.

शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा Zen जी वर विश्वास

पुण्यात शरद पवारांनी उतरवला सर्वात तरुण उमेदवार

२४ वय असलेल्या जयेश मुरकुटे हा तरुण प्रभाग क्रमांक ९ बाणेर बालेवाडी मधून निवडणुकीच्या रिंगणात

जयेश मुरकुटे हा उच्चशिक्षित असून पहिल्यांदाच निवडणूकीच्या रिंगणात…

पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणात सर्वात तरुण आणि कमी वयाचा एकमेव उमेदवार…

दीपेश म्हात्रेंचा विरोधीपक्षावर गंभीर आरोप

'विरोधीपक्षांनी नेत्यांना अंधारात ठेवलं'

'अंधारात ठेवून पक्ष विकण्याचे काम केले'

कल्याण डोंबिवलीत दीपेश म्हात्रे बिनविरोध विजयी

Sindhudurg: सिंधुदुर्ग चिपी विमानतळाला “नाईट लँडिंग”ची मंजुरी

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटनाच्या अनुषंगाने अतिशय महत्वाच्या चिपी विमानतळाला “नाईट लँडिंग”ची मंजुरी मिळाली आहे. विमानतळाला आयएफआर लायसन्स प्राप्त झाल्यामुळे आता हंगामातील चिपी विमानतळावर २४ तास नाईट लँडिंग शक्य होणार आहे. तसेच या विमानतळावरील पार्किंग शमता ३ वरून ६ विमानांपर्यंत वाढविली असून विमानतळाची कार्यक्षमतता दुप्पट होईल. यावर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी सध्या चिपी विमानतळावरून हैदराबाद, पुणे, बेंगलोर सेवा सुरू असून मुंबई सेवा बंद आहे.

निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची अंतिम यादी उद्याच प्रसिद्ध होणार

मुंबई महानगरपालिका निवडणुकीतून एकूण ४५३ उमेदवारांनी माघार घेतली आहे. तर, १ हजार ७२९ उमेदवार निवडणूक लढविण्‍यास सज्‍ज आहेत. उद्या, शनिवारी सकाळी ११ वाजेपासून निवडणूक चिन्‍ह नेमून दिली जाणार आहेत. तसेच, उद्याच निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. याआधी मंगळवार, २३ डिसेंबर २०२५ ते मंगळवार, ३० डिसेंबर २०२५ रोजीपर्यंत एकूण ११ हजार ३९१ नामनिर्देशनपत्रांचे वितरण झाले.

Shirdi: शिर्डी-बॉम्बस्फोटातील आरोपीच्या अंत्यविधीसाठी हजारोंची गर्दी, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

ण्यातील साखळी बॉम्बस्फोटातील श्रीरामपुर येथिल आरोपी बंटी जहागीरदार याच्या अंत्यविधीसाठी हजारोंच्या संख्येने जनसमुदाय उपस्थित राहिल्यानं पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी थेट नाराजी व्यक्त केलीये..

थर्टी फर्स्टच्या दुपारी बंटी जहागीरदारवर दोन दुचाकीस्वारांनी तीन गोळ्या झाडल्या होत्या. यातून त्याची हत्या झाली. एक जानेवारीला श्रीरामपुर येथे त्याचा अंत्यविधी समयी हजारोंच्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता..

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com