Mumbai : उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना भवन येथे बैठक हालचाली
उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शाखाप्रमुख ते विभाग प्रमुख महिला पुरुष पदाधिकारी यांची बैठक शिवसेना भवन येथे बैठक झाली. मुंबई महानगरपालिका निवडणूकीच्या दृष्टीने महत्त्वाची चर्चा होणार तसेच एबी फॉर्म उद्या देण्यात येणार आहेत. आज दुपारी १२ च्या दरम्यान बैठकीला उद्धव ठाकरे शिवसेना भवनात दाखल होणार
Pune : पुण्यात अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील युतीच्या चर्चेला वेग हालचाली
पुण्यात अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील युतीच्या चर्चेला वेग आला. रात्री उशिरा अजित पवार यांच्याकडून शिवसेनेच्या एका नेत्याला फोन आज दोन्ही पक्षातील महत्वाच्या व्यक्तींची भेट होण्याची शक्यता...
Ratnagiri : रत्नागिरीत पर्यटनासाठी आलेल्या मुलीचा मृत्यू
दापोली येथे पर्यटनासाठी आलेल्या तेरा वर्षीय मुलीचा मृत्यू. एकुलती एक लाडक्या सुकन्येचा मृत्यू. आंचल मदन सकपाळ वय वर्ष १३ असे या अल्पवयीन मुलीचे नाव आहे. मुंबई कल्याण परिसरातून हे कुटुंब 25 डिसेंबर रोजी दापोली येथे पर्यटनासाठी आले होते.
Pune: पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासाठी हालचाली
अजित पवारांची अमोल कोल्हे आणि रोहित पवारांसोबत आणखी एक गुप्त बैठक. पुण्याच्या बंगल्यात दुपारी दोन तास चर्चा, मात्र अद्याप शिक्कामोर्तब नाहीच. बैठक झाली, याला दोन्ही बाजूंनी दुजोरा दिला गेला