Latest Marathi News Update live
Latest Marathi News Update live

Latest Marathi News Update live : राज्यात महानगरपालिका निवडणूक... आजपासून 29 महापालिकेत प्रचाराचा वेग वाढणार

Marathi Live Headlines Updates: आज बुधवार, दिनांक 31 डिसेंबर 2025, राज्यातील थंडी, महापालिका निवडणुका अपडेट्स, आजच्या ताज्या बातम्या, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

BJP - Shivsena : राज्यातील एकूण 15 महापालिकांमध्ये शिवसेना आणि भाजपची युती फिस्कटली ..तर जागेवरून वादंग

आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार, राज्यातील एकूण 15 महापालिकांमध्ये शिवसेना आणि भाजपची युती तुटली आहे. पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नांदेड, अमरावती, मालेगाव, अकोला, मीरा-भाईंदर, नवी मुंबई, धुळे, उल्हासनगर, सांगली, जालना, पिंपरी-चिंचवड, लातूर या शहरांमध्ये शिवसेना आणि भाजपची युती तुटली आहे. अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता. या सर्व ठिकाणी अत्यंत नाट्यमय अशा घडामोडी घडलेल्या बघायला मिळाल्या. पण अखेर शेवटपर्यंत दोन्ही पक्षांचं नेत्यांचं युतीबाबत एकमत होऊ शकलं नाही. त्यामुळे या 15 महापालिकांमध्ये युती तुटल्याचं सध्याचं चित्र आहे

Konkan Railway : कोकण रेल्वे मार्गावर 30 दिवसांचा ब्लॉक

Konkan Railway ) कोकण रेल्वे मार्गावर 30 दिवसांचा ब्लॉक घेण्यात आला आहे. 1 ते 30 जानेवारी दरम्यान हा मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) यार्डमधील दुरुस्ती व देखभालीचे काम हाती घेतल्याने कोकण रेल्वे मार्गावरील काही लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वेळापत्रकात तात्पुरता बदल करण्यात आला आहे.

Maharashtra Mahnagarpalika Election : राज्यात महानगरपालिका निवडणूक... आजपासून 29 महापालिकेत प्रचाराचा वेग वाढणार

राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांचा प्रचार आता निर्णायक टप्प्यात प्रवेश करत असून, आजपासून प्रत्येक उमेदवाराचा प्रचाराचा वेग मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. उमेदवारी अर्जांची छाननी, माघारी आणि अंतिम उमेदवार यादी जाहीर झाल्यानंतर आता थेट मैदानातील राजकीय लढत सुरू झाली आहे. त्यामुळे आजपासून राज्यातील विविध शहरांमध्ये प्रचाराचा जोर स्पष्टपणे दिसून येणार आहे.

Maharashtra Politics : मनपा निवडणुकीत राज्यात बंडोबांच पेव .... बंडोबांना थंड करण्यासाठी नेते मैदानात उतरण्याची शक्यता

मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच प्रमुख राजकीय पक्षांमध्ये बंडखोरीचे सत्र जोरात सुरू असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. ठाकरे ब्रँडच्या युतीपासून ते भाजप–शिंदे सेना युतीपर्यंत अनेक वॉर्डमध्ये अधिकृत उमेदवारांव्यतिरिक्त अपक्ष अर्ज दाखल झाल्याने राजकीय समीकरणे अधिक गुंतागुंतीची बनली आहेत.

BMC Election : मुंबई महापालिकेत बहुरंगी लढत; २२७ जागांसाठी २५००हून अधिक अर्ज दाखल

निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया काल संपली असून, या निवडणुकीत २,५०१ पेक्षा अधिक उमेदवार रिंगणात उतरल्याचे स्पष्ट झाले आहे. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने मुंबईतील विविध विभागांमध्ये चांगलीच धावपळ पाहायला मिळाली.

Delivery Boy Strike : डिलिव्हरी बॉय आज संपावर; विविध मागण्यांसाठी पुकारला संप

( Delivery Boy ) डिलिव्हरी बॉय आज संपावर जाणार आहेत. 31 डिसेंबरला डिलिव्हरी बॉय संपावर जाणार असून विविध मागण्यांसाठी त्यांनी देशव्यापी संप पुकारला आहे. कामाची खालावलेली स्थिती, कमी होत जाणारी कमाई आणि सामाजिक सुरक्षेचा अभाव या प्रमुख मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात येत असल्याची माहिती मिळत आहे.

State Cabinet Meeting : आज दुपारी 12 वाजता सह्याद्री अतिथीगृहावर राज्य मंत्रीमंडळाची बैठक

राज्याच्या प्रशासकीय आणि राजकीय दृष्टीने आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. आज दुपारी १२ वाजता मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडणार असून, बैठकीत राज्यातील विविध महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा होण्याची शक्यता आहे.

Maharashtra Mahnagarpalika Election : राज्यातील 29 महापालिकेसाठी अर्ज भरण्याची मुदत संपली 

राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा काल शेवटचा दिवस होता. शेवटच्या दिवशी प्रचंड राजकीय ड्रामा पाहायला मिळाला.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com