भाजपाच्या निवडणूक मुंबई प्रचाराचे गाणं मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते लाँच ...
गायक अवधूत गुप्ते आणि वैशाली सावंत यांनी गायलेले गाणं लाँच...
एकीकडे लोकसभा, विधानसभा सभा असो की इतर निवडणुका कुठे ही भाजपाच्या वतीने मुस्लिमाना उमेदवारवारी देण्यात आली नाही इतकेच नव्हे महापालिका निवडणुकीत देखील मुंबई, पुणे, नाशिकसह इतर ठिकाणी मुस्लिम उमेदवार देण्यात आले नाही मात्र मालेगाव महापालिका निवडणूक याला अपवाद ठरली आहे येथे भाजपा तर्फे 2 महिलासह 4 मुस्लिम उमेदवारांना संधी देण्यात आली त्यात प्रभाग 8 ब मधून रजिया अकबर शहा, ड मधून शेख रहीम फारूक प्रभाग 14 क मधून नसरीन अस्लम शेख आणि ड मधून शेख सलीम बाबू यांचा समावेश आहे जवळपास सर्वच निवडणुका मध्ये मुस्लिम उमेदवाराना तिकीटा पासून एका प्रकारे वंचित ठेवणाऱ्या भाजपा ने मालेगाव महापालिका निवडणुकीत 4 मुस्लिम उमेदवार उभे केल्यामुळे सर्वांना आश्चर्यचा धक्का बसला.
नांदेडच्या माळाकोळी येथे गोपीनाथ मुंडेंच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण
धनंजय मुंडे,पंकजा मुंडे,अशोक चव्हाण यांच्यासह अनेक दिग्गज नेते उपस्थित
कार्यक्रमाला पंकजा मुंडे ,धनंजय मुंडे यांच्यासह खा अशोक चव्हाण देखील संबोधित करणार
कार्यक्रमाला मुंडे समर्थकांची व कार्यकर्त्यांची तुफान गर्दी
पहिली सभा चार वाजता येरवडा येथे होणार आहे तर दुसरी सभा रात्री ८ वाजता कात्रज चौकात होणार आहे
पुणे महानगरपालिका निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी देवेंद्र फडणवीस यांची काहीसे सभा होत आहे
बोरीवली-ठाणे बोगद्याचे काम सुरु..
ठाणे ते बोरिवली 15 मिनीटात प्रवास शक्य..
फडणवीसांची माहिती..
तिकीटवाढ न होता प्रवास करता येणार..
मुंबई लोकलवर फडणवीसांचं वक्तव्य..
मनसेच्या बोरिवली पूर्व येथील शाखेत उद्धव ठाकरे यांचे भाषण सुरू असताना. शिंदेंच्या सेनेची प्रचार रॅली आल्याने दोन्ही कार्यकर्त्यांनी दिल्या घोषणा...
उद्धव ठाकरे गाडीत जात असताना मनसे, ठाकरेंची सेना विरुद्ध भाजपा आणि शिंदेंची सेना यांच्या कार्यकर्त्यांनी दिला घोषणा..
बहुजन विकास आघाडी तर्फे वसई येथे आयोजित करण्यात आलेला कार्यकर्ता संवाद मेळावा अत्यंत आक्रमक आणि उत्स्फूर्त पार पडला.
या मेळाव्यात विविध पक्षांतील कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती पाहायला मिळाली.
कार्यक्रमात बोलताना शेखर धुरी यांनी भारतीय जनता पार्टीवर जोरदार शब्दांत टीका केली.
'हाच का दादाचा वादा?' बॅनरवर उल्लेख
दादा पैसे वाटणाऱ्यांचा प्रचार करणार का?
बॅनरच्या माध्यमातून अजित पवारांना डिवचले
अजित पवार यांच्या सभेआधी झळकले बॅनर
थेट अजित पवारांनाच लक्ष केल्याने पुण्यात सर्वत्र या बॅनरची चर्चा सुरूये….
अलिबाग तालुक्यातील मापगाव येथील कुकूच-कु कंपनीचे मालक कुणाल पाथरे यांच्या घरावर अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास दरोडा टाकला.
यात चोरट्यांनी रोकड आणि दागिने मिळून अंदाजे 15 लाख रुपयांचा ऐवज पळवून नेला आहे, याशिवाय, घरातील कुटुंबीयांचे मोबाईल फोन घेवून चोरटयांनी पोबारा केला.
मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
घरातील सदस्य झोपेत असताना चोरट्यांनी संधी साधून दरोडा टाकला आणि जाग आलेल्या सदस्यांना चाकू दाखवून धमकावले.
काही सदस्यांना दोरीने बांधून ठेवले. या झटापटीत एकजण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
चोरट्यांनी घरात प्रवेश करून कपाटे आणि ड्रॉवरची झडती घेत मौल्यवान वस्तू चोरी केल्या. पोलीस घटनास्थळी पोहोचले असून तपास सुरू केला आहे.
शुभा राऊळ भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनामा सुपूर्द
राजीनाम्यानंतर राऊळ यांनी घेतली मंत्री आशिष शेलार यांची भेट
मात्र, भाजप प्रवेशाबाबत अद्याप स्पष्टता नाही
छत्रपती संभाजी नगरात भाजप पक्षाच्या विरोधात आणि पक्षाच्या नियमांच्या विरोधात काम करणाऱ्या भाजपाच्या कार्यकर्त्यांवर आणि पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे, निवडणुकीत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणे आणि बंडखोरी केल्याने तब्बल 22 जणांवर ही कारवाई करण्यात आली असून जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे यांनी ही कारवाई केली. पक्षाचे प्राथमिक सदस्यत्व तसेच सध्या भूषवत असलेले सर्व पद समाप्त करण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे
छत्रपती संभाजी नगरात भाजप पक्षाच्या विरोधात आणि पक्षाच्या नियमांच्या विरोधात काम करणाऱ्या भाजपाच्या कार्यकर्त्यांवर आणि पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे,
निवडणुकीत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणे आणि बंडखोरी केल्याने तब्बल 22 जणांवर ही कारवाई करण्यात आली असून जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे यांनी ही कारवाई केली.
पक्षाचे प्राथमिक सदस्यत्व तसेच सध्या भूषवत असलेले सर्व पद समाप्त करण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे
नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. नवी मुंबईत भाजप जिल्हाध्यक्षांच्या उपस्थितीत पक्षाच्या प्रचाराचा नारळ फोडण्यात आला. यामुळे आगामी पालिका निवडणुकीसाठी भाजप पूर्ण ताकदीने मैदानात उतरल्याचे चित्र दिसत आहे. याचवेळी जुईनगर येथे भाजपच्या नव्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. नव्या कार्यालयामुळे पक्षाच्या संघटनात्मक कामकाजाला अधिक गती मिळणार असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीत सत्ताधारी महायुतीतील भाजप आणि शिंदेसेना एकमेकांविरोधात उतरल्याने राजकीय वातावरण तापले आहे. जागावाटपावरून मतभेद झाल्यानंतर 29 प्रभागांतील 88 जागांवर दोन्ही पक्षांचे उमेदवार आमनेसामने आहेत. भाजपने 92 तर शिंदेसेनेने 25 उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. विकासाच्या मुद्द्यांऐवजी आरोप-प्रत्यारोपांची धार वाढण्याची शक्यता आहे. ५८चा जादुई आकडा गाठण्यासाठी भाजपची खरी कसोटी आता शिंदेसेनेविरोधात लागणार असून निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शिवसेना आणि मनसे युतीने महापालिका निवडणुकांसाठी जोरदार प्रचार सुरू केला आहे. या प्रचारात ठाकरे बंधूंच्या शक्तिशाली सभा दिसून येणार आहेत. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र येऊन सहा सभा घेण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईतील शिवतीर्थावरही एक खास सभा होणार आहे. पण त्यासाठी काही पक्ष आणि नेत्यांचे कटकारस्थान सुरू असल्याचं शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते संजय राऊत यांनी म्हटलं. ते रविवारी माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदेंवर जोरदार टीका केली.
मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, महायुतीकडून प्रचाराचा आक्रमक सूर पाहायला मिळत आहे. याच अनुषंगाने वरळी येथे आयोजित जाहीर सभेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. “गिरणी कामगार हद्दपार कोणामुळे? हे पाप नेमकं कोणाचं?” असा थेट सवाल करत फडणवीसांनी ठाकरेंवर सडकून टीका केली.
मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागले असून, प्रचाराचा जोर दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर महायुतीकडून मुंबईतील ऐतिहासिक शिवाजी पार्क मैदानावर भव्य जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या १२ जानेवारी रोजी संध्याकाळी ही सभा पार पडणार असून, या सभेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रमुख उपस्थित राहणार आहेत.
भारताच्या सोन्या-चांदीच्या बाजारात सतत बदल होत आहेत. ४ जानेवारी २०२६ रोजी सोन्या आणि चांदीच्या भावात काही प्रमाणात घट दिसून आली आहे. २४ कॅरेट सोन्याचा प्रति ग्रॅम दर १३,५८२ रुपये, २२ कॅरेट सोन्याचा प्रति ग्रॅम दर १२,४५० रुपये आणि १८ कॅरेट सोन्याचा प्रति ग्रॅम दर १०,१८७ रुपये आहेत. १० ग्रॅमच्या प्रमाणात पाहता, २४ कॅरेट सोन्याचा दर १,३५,८२० रुपये, २२ कॅरेट १,२४,५०० रुपये आणि १८ कॅरेट १,०१,८७० रुपये इतका आहे. चांदीच्या दरातही थोडीफार घट दिसली आहे. ३ जानेवारी रोजी चांदीचा प्रति ग्रॅम दर २४२.१० रुपये आणि प्रति किलोग्रॅम २,४२,१०० रुपये होता, तर ४ जानेवारी रोजी चांदीचा प्रति ग्रॅम दर २४१ रुपये आणि प्रति किलोग्रॅम २,४१,००० रुपये झाला आहे. सोन्या आणि चांदीच्या भावातल्या या बदलामुळे बाजारपेठेत सौद्याच्या खरेदी-विक्रीवर परिणाम होऊ शकतो.
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या चरणी नतमस्तक होत लोकशाही मराठी या लोकप्रिय वृत्तवाहिनीचे सर्वेसर्वा गणेश नायडू यांनी आपल्या कुटुंबीयांसह तुळजापूर येथे दर्शन घेतले. सध्या तुळजाभवानी मातेचा शाकंभरी नवरात्र महोत्सव सुरू असून, या पावन काळात पौर्णिमेच्या दिवशी नायडू कुटुंबीयांना अभिषेक पूजेचा मान लाभल्याने हा क्षण अधिकच भाविक आणि विशेष ठरला.
राज्यातील आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रचाराचा धडाका सुरू झाला असून, सर्वच राजकीय पक्षांनी मैदानात उतरून आपली ताकद दाखवण्यास सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपचे वरिष्ठ नेते आणि मंत्री रवींद्र चव्हाण आज उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्याद्वारे महापालिका निवडणुकीसाठी प्रचाराला अधिक वेग देण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.
रवींद्र चव्हाण आज नाशिकपासून आपल्या प्रचार दौऱ्याची सुरुवात करणार आहेत. नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपची भूमिका ठळकपणे मांडत, तेथील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. नाशिकनंतर ते धुळे आणि जळगाव येथेही भेट देणार असून, या दोन्ही ठिकाणी प्रचार सभा, बैठका आणि कार्यकर्ता संवाद कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सिंधुदुर्गात खासदार नारायण राणे हे उद्या येणार असून राणे समर्थकांचा स्वागत मेळावा आयोजित केला आहे. बांदा ते कणकवलीपर्यंत ठीकठिकाणी होणार खासदार नारायण राणे यांचे जंगी स्वागत करण्यात येईल. या अनुषंगाने जिल्ह्यात झाराप येथून जोरदार बॅनरबाजी करण्यात आली आहे.
भिवंडी पालिका सार्वत्रिक निवडणुकीत खऱ्या अर्थाने प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली असताना शनिवारी सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास नारपोली भंडारी चौक या ठिकाणी प्रभाग क्रमांक 20 येथील भाजपा व काँग्रेस उमेदवारांच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची होऊन हाणामारीची घटना घडली आहे.ज्यामध्ये दोन्ही बाजू कडून लाठ्या काठ्या व दगडांचा मारा केल्याने दोन जण जखमी झाले आहेत.या घटने नंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून मोठा पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.दरम्यान या हाणामारीच्या घटनेनंतर नारपोली व भोईवाडा पोलिस ठाण्यातील मोठा पोलिस फौजफाटा घटनास्थळी दाखल होत त्यांनी सौम्य लाठी चार्ज करून परिसरातील गर्दी पांगवली असून,या घटने नंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.तर दोन्ही बाजू कडून पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया रात्री उशिरा पर्यंत सुरू आहे.
लक्ष्मी या भाजपच्या अधिकृत उमेदवार नाहीत,चुकीने त्यांना भाजपाचा उमेदवारी अर्ज मिळाला,मात्र ते लक्षात आल्यानंतर त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न करून उमेदवारी मागे घ्यायला सांगितलं,मात्र त्यांचा कोणताही संपर्क झाला नाही,त्यामुळे ते पक्षाचे अधिकृत उमेदवार नाहीत अशी प्रतिक्रिया दिली,दरम्यान या सगळ्या गोंधळामुळे आता मतदार राजा नक्की कोणाच्या पारड्यात आपलं मतदान टाकतो हे पहावं लागेल.
कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत बिनविरोध निवडून आलेल्या नगरसेवकांच्या निवडीबाबत शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला असून याबाबत न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे जिल्हा प्रमुख अल्पेश भोईर. यांनी सांगीतले असून कल्याण पश्चिमेत एकही उमेदवार बिनविरोध नाही, ठाकरे गटाचे उमेदवार निष्ठेने निवडणूक लढवत असल्याचे भोईर यांनी सांगितले.
नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. नवी मुंबईत भाजप जिल्हाध्यक्षांच्या उपस्थितीत पक्षाच्या प्रचाराचा नारळ फोडण्यात आला. यामुळे आगामी पालिका निवडणुकीसाठी भाजप पूर्ण ताकदीने मैदानात उतरल्याचे चित्र दिसत आहे. याचवेळी जुईनगर येथे भाजपच्या नव्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. नव्या कार्यालयामुळे पक्षाच्या संघटनात्मक कामकाजाला अधिक गती मिळणार असल्याचे मत राजेश पाटील यांनी व्यक्त केले.
देशभरात हवामानात सातत्याने बदल होत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. कडाक्याच्या थंडीनंतर अचानक वातावरणात बदल होऊन वर्षाच्या पहिल्याच दिवशी राज्यातील अनेक भागांत पावसाने हजेरी लावली. झपाट्याने बदलणाऱ्या हवामानामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, पुढील काही दिवसांत थंडी आणखी वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार, उत्तरेकडून थंडीच्या लाटा राज्याच्या दिशेने येत असून त्यामुळे किमान तापमानात लक्षणीय घट होत आहे. गेल्या दोन दिवसांपासून थंडीचा जोर वाढला असून, पुढील दोन ते तीन दिवसांत राज्यात थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. काही भागांमध्ये अवकाळी पावसाचाही इशारा देण्यात आला असून, जानेवारी महिना सुरू होऊनही पावसाने माघार न घेतल्याने शेतकरी आणि नागरिक दोघेही संभ्रमात आहेत.
मुंबई उपनगरी रेल्वे सेवेचा कणा मानल्या जाणाऱ्या पश्चिम रेल्वे मार्गावर आज सकाळी मोठा तांत्रिक बिघाड झाल्याने प्रवाशांचे हाल झाले. वसई–नालासोपारा रेल्वे स्थानकादरम्यान, कॅपिटल मॉलजवळ विरारहून चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या एका लोकल ट्रेनमध्ये तांत्रिक बिघाड झाला. या बिघाडामुळे पश्चिम रेल्वेची लोकल सेवा पूर्णतः विस्कळीत झाली असून, अनेक लोकल ट्रेन तासाभरापासून खोळंबलेल्या अवस्थेत होत्या.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून, आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विदर्भ दौऱ्यावर निघाले आहेत. महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री स्वतः मैदानात उतरले असून, आजचा संपूर्ण दिवस त्यांचा विदर्भातील प्रमुख शहरांमध्ये प्रचार दौऱ्याचा असणार आहे. चंद्रपूर, अमरावती आणि अकोला या तीन महत्त्वाच्या ठिकाणी मुख्यमंत्री फडणवीस रोड शो, प्रचार रॅली आणि जाहीर सभांमधून मतदारांशी थेट संवाद साधणार आहेत.
मुंबई महानगरपालिकेच्या (बीएमसी) निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज राजकीय वर्तुळाचं लक्ष वेधून घेणारी घडामोड घडणार आहे. ठाकरे बंधू—उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे—आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांचा संयुक्त वचननामा आज जाहीर होणार आहे. दुपारी ठीक १ वाजता हा वचननामा प्रसिद्ध केला जाणार असून, मुंबईच्या राजकारणात नव्या समीकरणांची नांदी ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.