'मुंबई काँग्रेस मुक्त होणार'
'राऊतांची पोपटपंची काही कामाची नाही'
'विरोधकांनी आम्हाला हिंदुत्व शिकवण्याची गरज नाही'
हिंदुत्वाला संजय राऊत आणि ठाकरेंचा विरोध का?
आशिष शेलार यांचा सवाल
अन्नधान्य उत्पादनात भारत नवनवे उच्चांक प्रस्थापित करीत आहे. गतवर्षी देशाच्या अन्नधान्य उत्पादनात १२३.५९ लाख टनांनी वाढ होऊन एकूण अन्नधान्य उत्पादन ३,५७७.३२ लाख टनांवर गेले आहे. त्यात तांदळाचा वाटा १५०१.८४ लाख टन इतका आहे. भारताने चीनला मागे टाकले असून, चीन १४६० लाख टन उत्पादनासह अव्वल होता.
सध्या राज्यात महापालिका निवडणुकांमुळे निवडणूक परिक्षेत्रात आचारसंहिता सुरू असल्याने भरारी पथकेही तैनात करण्यात आली आहेत. मुंबईसह महानगरात ही भरारी पथके संशियत वाहनांची तपासणी करत आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी अनेक उमेदवार बिनविरोध झाल्याने आरोप पैशांचा वापर करुन, आमिष दाखवूनच हे उमेदवा बिनविरोध केल्याचं सांगितलं जात आहे.
आयडियल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या कॉलेजमध्ये मेडिकलच शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीची रात्रीच्या सुमारास रॅगिंग.
रात्रीच्या सुमारास काही मुस्लिम विद्यार्थिनींनी हिंदू विद्यार्थिनीला नमाज पठण करण्यास लावल्याचा बजरंग दलाचा आरोप.
वाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल . पालघरचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्याकडून मेडिकल कॉलेजला भेट देऊन पाहणी.
जिल्ह्यातील कोणत्याही कॉलेजमध्ये रॅगिंग चे प्रकार घडत असतील तर तातडीने पोलिसांना खबर देऊन संबंधित महाविद्यालयांनी देखील कारवाई करण्याचे पोलीस अधीक्षकांचे महाविद्यालयांना आदेश .
मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग सात चे भाजपा उमेदवार गणेश खणकर यांच्या निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या हस्ते पार पडले यावेळी आमदार मनीषा चौधरी आणि प्रभाग दोनच्या उमेदवार तेजस्वी घोसाळकर देखील उपस्थित होत्या उद्घाटन प्रसंगी मोठ्या संख्येने भाजपा शिवसेना महायुतीचे कार्यकर्ते देखील उपस्थित होते.
*सोलापुरातून वंचितचे युवा नेते सुजात आंबेडकरांनी काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंवर केले गंभीर आरोप*
*मनपा निवडणुकीनंतर प्रणिती शिंदे या भाजपमध्ये जाणार ; प्रणिती शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची डिल झाल्याचा सुजात आंबेडकरांनी केला दावा*
आपल्या विरोधात भाजप आहे आणि आरएसएस जर निवडणूक लढवत असती तर त्यांना तिकडेही हरवलं असतं..
काश्मीरा परिसरातील प्रभाग क्रमांक १४ मधून भाजपच्या उमेदवार यशोदा अनिल ताटे यांच्या प्रचारादरम्यान तणावपूर्ण प्रकार घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
भाजपच्या उमेदवारांचे पती व भाजपचे पदाधिकारी अनिल ताटे यांनी प्रचारादरम्यान शिवसेना तसेच खास करून परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यावर टीका केली होती.
या वक्तव्याचा राग मनात धरून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आज संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास प्रचारादरम्यान अनिल ताटे यांची गाडी अडवून त्यांना शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
आज संध्याकाळी सहाच्या सुमारास कांदिवली पूर्वेत पोईसर भागामध्ये एका व्यक्तीने स्वतःचा बंदुकीने डोक्यात गोळी मारून आत्महत्या केल्याच्या धक्कादाय घटना घडली आहे
प्रभाकर चंद्रशेखर ओझा वय 45 असून या व्यक्तीने स्वतःच्या लायसन असलेली बंदुकीने डोक्यात गोळी मारून आत्महत्या केली
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांकडून डॅमेज कंट्रोलला सुरुवात
राज्यातील विविध जिल्ह्यात नाराज कार्यकर्त्यांची काढणार समजूत
उद्या छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड येथे मेळावे
रवींद्र चव्हाण भाजप कार्यकर्त्यांसोबत साधणार संवाद
अक्कलकोट नगरी प्रेमसंबंधातून तरुणीचा निर्घृण खून, प्रियकराने स्वतःवरही केले वार, प्रियकरावर सोलापुरातील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू
अक्कलकोट येथील हद्दवाड भागात खाजगी घरात एका दिवसासाठी भाड्याने रूम घेऊन राहिलेल्या प्रियकरांनी प्रियसीचा धारदार शस्त्राने तिला खून.
4 जानेवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली घटना..
सोलापुरातील स्नेहा श्रीकांत बनसोडे (20) असे खून झालेल्या प्रेयसीचे नाव तर अक्कलकोट येथील आदित्य रमेश चव्हाण (22) असे जखमी असणाऱ्या प्रियकराचे नाव
याप्रकरणी अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात प्रियकरा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उमेदवारी मागे घेणाऱ्या उमेदवारांना पैसे देऊन आणि दबाव टाकून उमेदवारी मागे घ्यायला भाग पडल्याचा याचिकेत दावा
बिनविरोध संकल्पना लोकप्रतिनिधी कायद्यात नाही याचिकेत दावा
लोकप्रतिनिधी कायद्यात निवडून आलेले लोकप्रतिनिधी असा स्पष्ट उल्लेख असून बिनविरोध विजयी उमेदवारांना पडलेल्या मतांची किमान टक्केवारी निश्चित करण्याची याचिकेत मागणी
निवडणूक आयोगाच्या पक्षपातीपणावर बोट ठेवत निवडणूक आयोगाच्या पारदर्शकतेवरच याचिकेतून सवाल
निवडणूक आयोग राज्यसरकारच्या दबावाखाली असल्याचा याचिकेत दावा
भंडारा वनविभागांतर्गत येणाऱ्या लाखनी वनपरिक्षेत्रात अवैध लाकूड वाहतुकीवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. गुप्त माहितीच्या आधारे केलेल्या या कारवाईत, परवान्यापेक्षा जास्त लाकूड भरलेला ट्रक जप्त करण्यात आला असून, लाखो रुपयांचा मुद्देमाल वनविभागाने ताब्यात घेतला आहे.रात्री १० वाजेच्या सुमारास लाखनी येथे एक लाकडाने भरलेला ट्रक उभा असल्याची माहिती वनविभागाला मिळाली. प्राथमिक तपासणीत ट्रककडे ९ घनमीटर लाकडाचा वाहतूक परवाना होता.
जागतिक दर्जाच्या पुणे ग्रँड टूर सायकल स्पर्धा २०२६च्या यशस्वी आयोजनासाठी प्रशासनाने कंबर कसली असून, पुरंदर तालुक्यातील सासवड ते नीरा या तिसऱ्या टप्प्याच्या मार्गाची प्रत्यक्ष पाहणी तहसीलदार विक्रम रजपूत यांनी सोमवारी केली. स्पर्धेदरम्यान खेळाडू व नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत सर्व तयारी पूर्ण करण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.स्पर्धेदरम्यान कुठलाही अपघात होऊ नये यासाठी रस्त्यांची दुरुस्ती, साईड पट्ट्यांची कामे, स्वच्छता तसेच सुरक्षाव्यवस्था याकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे. प्रत्येक गावात स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात आली असून, भटकी जनावरे, कुत्रे अथवा अन्य अडथळे येऊ नयेत
कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात शांतता व सुरक्षितता अबाधित राखण्यासाठी पोलिसांकडून तगडा पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत तब्बल २४ ड्रोन शहरातील संवेदनशील भागांवर लक्ष ठेवण्यासाठी वापरण्यात येत असून एसआरपीएफचे ९ प्लॅटून देखील तैनात करण्यात आले आहेत, अशी माहिती कल्याण परिमंडळ ३ चे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी दिली.
धुळे, जळगाव व नागपूर येथे होणार सभा
महापालिका निवडणुकांसाठी मुख्यमंत्र्यांचा झंझावात सुरुच
पुणे महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक ९ आणि ११ मध्ये शिवसेना उबाठा गटाला मोठा धक्का बसला असून, शिवसेना उबाठा गटाच्या बंडखोर उमेदवारासह, अधिकृत उमेदवारांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करुन भाजपच्या अधिकृत उमेदवारांना जाहीर पाठिंबा दिला आहे.चंद्रकांतपाटील यांनी त्यांचे स्वागत करुन अभिनंदन केले.प्रभाग क्रमांक ९ (ड) आणि (क)मधील शिवसेना उबाठा गटाचे बंडखोर उमेदवार महेश सुतार(ड), पूजा सुतार (क), नियोजन समितीचे सदस्य सुखदेव तापकीर आणि प्रभाग क्रमांक ११ (अ) गटाचे अधिकृत उमेदवार बाळासाहेब धनवडे आणि विद्यार्थी सेनेचे अमर गायकवाड, माजी नगरसेवक पैलवान दिलीपदादा गायकवाड यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश करुन भाजपा उमेदवारांना जाहीर पाठिंबा दिला आहे.
अकोला शहरातील प्रभाग क्रमांक १४ मधील बहुजन नगर भागात मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने, बहुजन नगर येथील नागरिकांनी महानगरपालिका निवडणुकीवर बहिष्कार टाकत मुख्य रस्त्यावर बॅनर व होर्डिंग लावून तीव्र निषेध नोंदवला आहे.
शिवणी ग्रामपंचायतच महापालिकेच्या हद्दीवाढ क्षेत्रात समावेश होऊन जवळपास 8 वर्षे उलटली तरी रस्ते, पाणीपुरवठा, नाल्या आणि स्वच्छते सारख्या मूलभूत सुविधा अद्याप पुरवण्यात आलेल्या नाहीत, असा आरोप नागरिकांनी केला आहे.
अविनाश जाधव आणि समीर गांधी मुंबई उच्च न्यायालयात
दबाव टाकून उमेदवारी मागे घ्यायला भाग पाडल्याचा दावा
मतांची किमान टक्केवारी निश्चित करण्याची याचिकेत मागणी
शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी हिंगोलीत शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला आहे शक्ती पीठ महामार्ग हिंगोली च्या वसमत आणि कळमनुरी तालुक्यातून जात असल्याने या महामार्गासाठी शेतकऱ्यांची शेकडो एकर सुपीक जमीन हस्तांतरित केली जाणार आहे परिणामी बांधीत शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ येईल असा दावा करत शेतकऱ्यांनी हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी निदर्शने केली आहेत रक्ताने लिहिलेले पत्र जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गजानन वाणी यांनी
बीडच्या चौसाळा परिसरात धुळे-सोलापूर महामार्गावर ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर पलटी झाले असुन गेल्या काही काळापासून वाहतूक खोळंबली होती.
NHAI च्या टिमने रस्त्यावर कोसळलेले ट्रॅक्टर, ट्रॉली बाजूला काढली आहे तर वाहतूक एका लेन मधून सुरू करण्यात आली आहे.
निवडणुकीच्या रणधुमाळीत काँग्रेसच्या संगीता तिवारी यांचा राजीनामा
तिवारी काँग्रेसच्या महाराष्ट्र उपाध्यक्षा होत्या
मात्र पक्षात सन्मान मिळत नसल्याने अनेक दिवसापासून नाराज होत्या
आज अखेर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून लवकरच राजकीय निर्णय घेणार आहेत
जुन्या इमारतीला जमीनदोस्त करण्याचे काम सुरू
अचानक कोसळल्याने परिसरात एकच खळबळ
सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही
नार्वेकर नावाचं प्रकरण महाराष्ट्र बुडवणार-सपकाळ
नार्वेकरांनी संविधानाच्या छातीत सुरा खुपसला-सपकाळ
तो मी नव्हे प्रकारचं नाटक निवडणूक आयोग करत आहे .
हरिभाऊ राठोड यांना नार्वेकरांची दमदाटी-सपकाळ
राहुल नार्वेकरांवर गुन्हा दाखल करावा-सपकाळ
भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम यांची आज मालाड मध्ये सभा होणार आहे. वॉर्ड क्रमांक ४७ मधील कोकणी मतदारांसोबत अमित साटम संवाद साधणार असून उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेला अमित साटम प्रत्युत्तर देण्याची शक्यता आहे.
भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आज अहिल्यानगर दौऱ्यावर आहेत. सकाळी 11 वाजता भव्य जाहीर सभा होणार आहे.
मनसे नेते अमित ठाकरे आज शाखांना भेटी देणार आहेत. मनसेच्या शाखांसोबत ठाकरेंच्या शिवसेनेच्या शाखांना देखील अमित ठाकरे भेट देणार आहेत.
ठाकरेंच्या शिवसेनेच्या स्टार प्रचाराकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. संजय राऊत, सुभाष देसाई, अरविंद सावंत, भास्कर जाधव यांचा स्टार प्रचाराकांच्या यादीत समावेश आहे.
ठाकरे बंधूंचा आज एकत्र दौरा असणार आहे. शिवडी आणि लालबागमध्ये हा एकत्र दौरा असणार आहे.
आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दोन सभा होणार आहेत. पहिली सभा चार वाजता येरवडा येथे होणार आहे तर दुसरी सभा रात्री ८ वाजता कात्रज चौकात होणार आहे.