आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरात 3 जाहीर सभा आयोजित केल्या आहेत. पहिली सभा संध्याकाळी 7 वाजता बोरगाव चौकात होणार आहे.
रविंद्र चव्हाण आज मराठवाडा दौऱ्यावर असून पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
अजित पवार आज सर्व उमेदवारांची बैठक घेणार आहेत. दुपारी 2 वाजता पुण्यातील सर्व राष्ट्रवादीच्या उमेदवारांची बैठक घेण्यात येणार आहे.
आज ठाण्यामध्ये शिवसेनेची महत्त्वाची बैठक होणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे, राहुल शेवाळे व शिवसेनेचे इतर महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत.
परभणी शहर महानगरपालिकेच्या निवडणूक प्रचारादरम्यान प्रचार वाहनास परवानगी मिळत नसल्याच्या कारणावरून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना (उभाठा) यांच्या उमेदवारांनी परभणी महानगरपालिका कार्यालयात तीव्र आक्षेप नोंदवला.
उमेदवारांचा आरोप आहे की, नियमानुसार अर्ज सादर करूनही प्रचार वाहनासाठी परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे प्रचारात अडथळे निर्माण होत असून निवडणूक प्रक्रियेत असमान वागणूक दिली जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
इंदापूर तालुक्यातील बिरंगुडवाडी येथील जमीन गट नंबर ९३ ही वर्ग २ ची जमीन असून या जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणात व बेसुमार बेकायदेशीर अवैधरित्या गौण खनिज उत्खनन केल्याचा आरोप करत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संतोष भोसले हे अजित पवारांच्या सहयोग सोसायटी बाहेर आमरण उपोषणाला बसलेत.इंदापूरचे तहसीलदार जीवन बनसोडे यांच्याकडे आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रारी करून देखील दाद न दिल्याने भोसले यांनी उपोषणाला सुरुवात केली आहे.
विठ्ठल मूर्तीवर रासायनिक प्रक्रिया करण्यासाठी विधी व न्याय विभागाची परवानगी.....
मूर्तीवर रासायनिक लेपन करताना विठ्ठलाचे पदस्पर्श दर्शन बंद राहण्याची शक्यता ....
पंढरपूरच्या विठ्ठल मूर्तीवर लवकरच होणार रासायनिक लेपन....
रासायनिक लेपन करण्याची तारीख येत्या चार दिवसात ठरणार ....
गेल्या 5 महिन्यापासून विधी व न्याय विभागाकडे रखडली होती रासायनिक प्रक्रियेची परवानगी ....
अखेर विधी व न्याय विभागाने दिली रासायनिक लेपन प्रक्रियेस परवानगी....
आजपर्यंत चार वेळा झाले विठ्ठल मूर्तीवर रासायनिक प्रक्रिया लेपन ....
1988 , 2005 , 2012 आणि 2020 साली झाले रासायनिक प्रक्रिया लेपन .....
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे, राहुल शेवाळे, व शिवसेनेचे इतर महत्त्वाचे नेते राहणार उपस्थित
या बैठकीत शिवसेना व भाजपचा एकत्रित वचननाम्यावरती होणार चर्चा
भाजप व शिवसेनेचा एकत्रित येणार वचननामा
शिवसेना व भाजपचा आज वचननामा फायनल होणार
काल रात्री झालेल्या बैठकीत शिवसेना व भाजपाचा एकत्रित वचननामा येणार यावर झाल निर्णय
तसेच महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती सभा,प्रचार, इतर मुद्द्यांवर होणार चर्चा
हिंगोली जिल्ह्यात पाचही तालुक्यातील पोलीस पाटलांच्या 343 रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया पार पडणार आहे. या भरती प्रक्रिया अंतर्गत आज हिंगोली, वसमत व कळमनुरी उपविभागीय अधिकारी कार्यालयामध्ये आरक्षण सोडत प्रक्रिया पार पडली.यावेळी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार त्याचबरोबर रिक्त पदे असणाऱ्या गावांतील नागरिकांची उपस्थिती होती.
इंदापूर तालुक्यातील बिरंगुडवाडी येथील जमीन गट नंबर ९३ ही वर्ग २ ची जमीन असून या जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणात व बेसुमार बेकायदेशीर अवैधरित्या गौण खनिज उत्खनन केल्याचा आरोप करत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संतोष भोसले हे अजित पवारांच्या सहयोग सोसायटी बाहेर आमरण उपोषणाला बसलेत.इंदापूरचे तहसीलदार जीवन बनसोडे यांच्याकडे आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रारी करून देखील दाद न दिल्याने भोसले यांनी उपोषणाला सुरुवात केली आहे.
नांदेडमध्ये शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील आणि आमदार बालाजी कल्याणकर यांचा अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आला आहे. आमदार पाटील यांच्या विरोधात कल्याणकर समर्थकांनी खालच्या पातळीवर घोषणाबाजी केली आहे. काल आमदार हेमंत पाटील यांनी प्रभाग तीन मधील अपक्ष उमेदवर मीनल पाटील यांच्या कार्यालयाचे उदघाट्न केले होते, यावरून कार्यकर्त्यामध्ये असंतोष पसरला असून आ.कल्याणकर समर्थकांनी आमदार हेमंत पाटील यांच्या विरोधात खालच्या पातळीवर घोषणाबाजी केली आहे..
अकोला जिल्ह्यातील मोहाळा गावात काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष व माजी जिल्हाप्रमुख हिदायात पटेल यांच्यावर प्राणघातक हल्ला
जुन्या वादातून हल्ला झाल्याची सूत्रांची माहिती
अज्ञात व्यक्तीने चाकूने केला हिदायात पटेल यांच्यावर हल्ला
जखमी हिरायत पाटील यांना अकोल्यातील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले
घटनेचे गांभीर्य पाहता पोलिसांचा मोठा बंदोबद घटनास्थळी दाखल
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी दिवंगत विलासराव देशमुख यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावर काँग्रेस नेते आ. अमित देशमुख यांनी यावर प्रतिक्रिया देत त्यांचे हे वक्तव्य दुर्देवी असल्याचे म्हटलं आहे... त्यांनी असे विधान करायला नको होते...ही महाराष्ट्राची संस्कृती नाही... राजकारण कुठल्या स्तरावर चाललंय, हा प्रश्न सगळ्यांना पडलाय, असे आ. अमित देशमुख म्हणाले...
दर्पण दिनाचे औदित्य साधत बीड जिल्ह्याच्या परळी येथील शहर व तालुका पत्रकार संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात राज्याचे माजी मंत्री तथा आमदार धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम घेण्यात आला.
या प्रसंगी बोलताना धनंजय मुंडे म्हणाले की आज ज्यांच्या हातात मोबाईल आहे तो पत्रकार बनला आहे.
वर्षातील तीनशे चौसष्ठ दिवस तुम्ही आमच्या बातम्या घेता एक दिवस आम्हाला तुमला तुमच्या बद्दल बोलण्याची संधी मिळते..
ते पुढे बोलताना म्हणाले की बातमी साधी आणि सरळ सोपी असते त्या बातमीला वेगळ्या पद्धतीने प्रसिद्धी मिळण्यासाठी बातम्या केल्या जात आहेत.
एक काळ असा होता ज्यावेळी एखाद्याला नीट सुधारण्यासाठी केली जात असते.
नवी मुंबईतील तुर्भे मधील हॉटेल राज मध्ये अनेक दिवसापासून अवैध वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती,त्याच अनुषंगाने पोलिसांनी बनावट ग्राहकाला हॉटेल मध्ये पाठवून संपूर्ण प्रकरणाचा पर्दाफाश केला.यात होईल मॅनेजर,महिला पुरवणारा आणि वेटर संगनमत करून महिलांना ग्राहकांना दाखवून त्यातले कमिशन कमावत असल्याचं समोर आले आहे.
अहमदाबाद महामार्गावर असलेले साई रेसिडेन्सी हॉटेल बाहेरून सर्वसामान्य हॉटेलसारखे दिसत होते. मात्र प्रत्यक्षात ते सायबर ठगांचे कंट्रोल रूम असल्याचे उघड झाले आहे. संशयास्पद हालचालींबाबत खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर MBVV पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट-४ ने तातडीने छापा टाकला. छाप्यात तब्बल २०० कोटींहून अधिक रकमेच्या सायबर फसवणुकीचा पर्दाफाश झाला.
सांगली महापालिका निवडणुकीमध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवाराच्या आईने विष प्राशन करत आत्महत्या केल्याचा प्रकार घडला आहे.काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडुन उमेदवारी मागे घेण्यासाठी दबाव टाकल्याने हा प्रकार घडल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाच्यावतीने करण्यात आला आहे.
संतोष धुरी यांच्या भाजप पक्षप्रवेशानंतर संदीप देशपांडे राज ठाकरे यांच्या भेटीला पोहोचले...
खंडोबा देवस्थान पालीची यात्रा नुकतीच पार पडली असून आज मंगळवारी येथे हजारो भाविकांची गर्दी केली आहे. आज मंगळवार देवाच्या खंडोबा म्हाळसा विवाहानंतरचा पाचवा दिवस असून पाच दिवसांनी पाकाळणीचा दिवस असतो. या दिवसी गावकरी मंदीराची साफ सफाई करून देवाची पुजा केली जाते.
'छ.संभाजीनगरात पुणे, बारामती सारखा विकास करायचाय'
आमदार सतीश चव्हाण यांचं वक्तव्य
'छ.संभाजीनगरात 11 तारखेला अजित पवारांचा रोड शो'
आमदार सतीश चव्हाणांची माहिती
बीड शहरातील अंकुश नगर भागात मुख्य रस्त्यालगत हर्षद तुळशीराम शिंदे नामक तरुण नगरपरिषदेचा खड्डा खोदत असताना अज्ञात व्यक्तींनी अचानक फायरिंग करत दोन गोळ्या झाडल्या यामध्ये या तरुणाचा जागीच मृत्यू झाला.
जिल्हा परिषदांच्या निवडणुकांची घोषणा पुढील आठवड्यात होण्याची शक्यता..
या आठवड्यात निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता धूसर..
50% च्या वरती आरक्षण गेलेल्या जिल्हा परिषदांचीच निवडणूक होण्याची शक्यता..
तर ज्या जिल्हा परिषदांमध्ये ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडली आहे त्या पुढे ढकलण्याची शक्यता..
त्यामुळे पुढील आठवड्यात १२ जिल्हा परिषदांच्या निवडणूकीची घोषणा होण्याची शक्यता तर २० जिल्हा परिषदेमध्ये 50 टक्केच्या वरती आरक्षण गेल्याने त्या पुढे ढकलण्याची शक्यता..
या संदर्भात राज्य निवडणूक आयोगाची दोन दिवस सुरु असलेल्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता..
चीनचा बेदाणा विक्री करणाऱ्या बेदाणा व्यापाऱ्यांविरोधात सांगलीमध्ये तासगाव येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने आंदोलन करण्यात आले.
अफगाणिस्तान मार्गे चीनचा बेदाणा भारतात आणून त्याची कमी दरात विक्री करण्याचा उद्योग तासगाव मधल्या बेदाणा व्यापाऱ्यांकडून सुरू होता.
सदर प्रकार उघडकीस आल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून तासगाव मध्ये मोर्चा काढण्यात आला, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांचे नेतृत्वाखाली हजारो शेतकऱ्यांनी बेदाणा व्यापाऱ्यांच्या कोल्ड स्टोअरेजवर धडक देत संबंधित व्यापाऱ्यांचे परवाने रद्द करावे,अशी मागणी करण्यात आली आहे.
वाशिम जिल्ह्यात मागील काही वर्षांत रब्बी हंगामातील पेरणीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले असून, त्यासोबतच मागील दोन वर्षांपासून नव्याने चिया पिकाची पेरणीही वेग घेत आहे.
२०२०–२१ मध्ये जिल्ह्यात रब्बीचे सरासरी क्षेत्र सुमारे ८२ हजार हेक्टर होते ते यंदा थेट एक लाख १८ हजार हेक्टरच्या पुढे पोहोचले आहे.
कृषी विभागाच्या विविध योजना, समाधानकारक पर्जन्यमान आणि वाढलेल्या सिंचन सुविधांचा याचा थेट फायदा शेतकऱ्यांना झाला आहे.
अष्टविनायक महागणपती रांजणगाव येथे आज अंगारक चतुर्थी निमित्त लाडक्या बाप्पाचा गाभारा आकर्षक अशा विविधरंगी फुलांनी सजविण्यात आला असून अथर्वशीर्ष पठाण सह विविध कार्यक्रमाचे देवस्थान कडून आयोजन करण्यात आलंय, लाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविक गर्दी करतायेत त्यामुळे मंदिर परिसर भाविकांनी फुलून गेलाय.
आज मराठी पत्रकारितेचे जनक दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्य जांभेकर मूळ पोंभुर्ल गावी महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी अभिवादन केले.
यावेळी राज्यातील कानाकोपऱ्यातून पत्रकार दीन साजरा करण्यासाठी उपस्थित होते.
अंगारकी चतुर्थी निमित्ताने पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात मोठी गर्दी
पहाटेपासूनच भाविकांनी केली आहे मोठी गर्दी
नवीन वर्षात पहिल्यांदाच अंगारकी चतुर्थी आल्याने बाप्पाच दर्शन घेण्यासाठी भाविकांची रीघ
आजच्या शुभ दिनी मंदिराला आकर्षक फुलांची आरास करण्यात आली आहे
नाशिक जिल्ह्यात वृक्षतोडीला हरित लवादाची स्थगिती
कायदेशीर परवानगीशिवाय एकही झाड तोडू नये – लवादाचा अंतरिम आदेश
समुद्री महामार्ग जोडणाऱ्या रस्त्याच्या कामासाठी ब्रिटिशकालीन जुने वड तोडण्याचा केला होता प्रयत्न
व्हीटीसी फाटा ते एमएसजीबीटी महाविद्यालय मार्गावर वृक्षतोड
पर्यावरणप्रेमी अश्विनी भट यांनी हरित लवादात केली होती तक्रार दाखल
छायाचित्रे व कागदपत्रांसह वृक्षतोडीला ठोस आक्षेप
उद्या चार ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सभा
लातूर, उल्हासनगर, भिवंडी, कल्याण डोंबिवली येथे जाहीर सभा
तर उद्या सायंकाळी ठाण्यात मुख्यमंत्र्यांची होणार मुलाखत
अकोला जिल्ह्यातील मोहाळा गावात काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष व माजी जिल्हाप्रमुख हिदायात पटेल यांच्यावर प्राणघातक हल्ला
जुन्या वादातून हल्ला झाल्याची सूत्रांची माहिती
अज्ञात व्यक्तीने चाकूने केला हिदायात पटेल यांच्यावर हल्ला
जखमी हिरायत पाटील यांना अकोल्यातील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले
घटनेचे गांभीर्य पाहता पोलिसांचा मोठा बंदोबद घटनास्थळी दाखल
आज जाहीरनामा प्रसिद्ध करायच्या वेळी वंचित कडून कोणीही उपस्थित न्हवतं..
या उलट वंचितने याचं वेळी मुंबई कार्यालयात पत्रकार परिषदेचं आयोजन केलं..
हा जाहीरनामा काँग्रेस आणि आघाडी पक्षांचा आहे... मात्र त्यात एकमत दिसून आलं नाही
अजित पवारांच्या सहयोग सोसायटीबाहेर उपोषण
'इंदापुरातील जमिनीमध्ये अवैध गौण खनिज उत्खनन होतंय'
अवैध उत्खनन होत असल्याचा कार्यकर्त्याचा आरोप
'उत्खनन करणारे अजित पवारांचे निकटवर्तीय'
उपोषणकर्ते संतोष भोसलेंचा दावा
बीड जिल्ह्याच्या परळी ग्रामीण भागात पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहिती नुसार सायंकाळच्या सुमारास अंबाजोगाईचे सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश शिंदे यांना माहिती मिळाली की, मौजे धर्मापुरी ते पानगाव रस्त्याच्या डाव्या बाजूस असलेल्या गायराण जमिनीत काही इसम प्रतिबंधित चंदनाची बेकायदेशीर खरेदी-विक्री व वाहतूक करत आहेत.मिळालेल्या अधिकच्या माहितीच्या आधारे सहा. पोलीस अधीक्षक श्री. ऋषीकेश शिंदे यांनी त्यांचे पथक तात्काळ रवाना करुन मध्य रात्रीच्या सुमारास मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी अचानक छापा टाकला.
मिरा-भाईंदर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूकीसाठी काँग्रेस पक्षाने जनहित, विकास आणि सुशासनावर आधारित आपला जाहीरनामा जाहीर केला. जाहीरनाम्यात कायमस्वरूपी जलपुरवठा, खड्डेमुक्त रस्ते, मेट्रो प्रकल्पाची पूर्तता, सक्षम बससेवा, वैज्ञानिक कचरा व्यवस्थापन, भूमिगत गटार योजना, आधुनिक आरोग्य सुविधा व स्वच्छ सार्वजनिक शौचालयांना प्राधान्य देण्यात आले आहे.
उद्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रचार सभा
ठाकरेंचा बालेकिल्ला असलेला शिवडी, वरळी आणि सायन कोळीवाडा या ठिकाणी एकनाथ शिंदे यांच्या सभा होणार
संध्याकाळी 6 नंतर सभेचे आयोजन.
विश्वसनीय सूत्रांची माहिती
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कुलाबा मतदारसंघातील प्रभागांमधील उमेदवारी अर्ज दाखल करण्यावरून सुरू झालेला वाद मुंबई उच्च न्यायालयात
राहुल नार्वेकरांच्या कृतीविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका
राहुल नार्वेकर यांनी हस्तक्षेप केल्याचा याचिकेत आरोप
राहुल नार्वेकरांनी पदाचा गैरवापर करत इच्छुक उमेदवारांना अर्जच भरू न दिल्याचा याचिकेतून आरोप
मातृभाषेचा आदर करीत असतानाच मातृभाषे तून शिक्षण घ्यायला सुरुवात करा तरच आपली मराठी मातृभाषा आणि मराठी शाळा टिकवणे शक्य होणार आहे असे प्रतिपादन चित्रपट अभिनेत्री क्षिति जोग यांनी केले आहे.त्या भिवंडीतील पद्मश्री अण्णासाहेब जाधव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात क्रांतीज्योती विद्यालय ( मराठी माध्यम ) या चित्रपटाच्या यशस्वीतेचे सेलिब्रेशन करण्यासाठी उपस्थित असताना बोलत होत्या.
बोरिवली प्रभाग क्रमांक 14 चे मनसे उमेदवार कुणाल माईंनकर यांच्या निवडणूक कार्यालयात राज ठाकरे यांनी भेट दिली
वसई विरार परिसरातील तरुण तरुणींना वाढवण बंदराच्या ठिकाणी नोकरी मिळणार कारण महाराष्ट्र सरकारचं 26 टक्के वाटा वाढवन बंदर मध्ये आहे.
त्यामुळे त्या वाढवण मंदिराच्या ठिकाणी येथील तरुण-तरुणींना नोकरी देण्याची जबाबदारी माझी असेल हा विश्वास या ठिकाणी मी दिलेला आहे.
जेलमधूनच लढवणार लक्ष्मी आंदेकर पुणे महापालिकेची निवडणूक
लक्ष्मी आंदेकरच्या जामीन अर्जावर न्यायालयाने सुनावणी पुढे ढकलली
१६ जानेवारी रोजी निकालाच्या दिवशी न्यायालयाकडून सुनावणी
प्रभाग क्रमांक २३ रविवार पेठ नाना पेठ मधून लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकर निवडणूक लढवणार
लक्ष्मी आंदेकर प्रभाग २३ (ब) मधून तर सोनाली आंदेकर प्रभाग २३ (क) मधून निवडणूक लढवणार
दोघींना राष्ट्रवादी काँग्रेसकडून मिळाली आहे उमेदवारी