Latest Marathi News Update live
Latest Marathi News Update live

Latest Marathi News Update live : नाशिक पेठ राष्ट्रीय महामार्गावर झाला भीषण अपघात

Marathi Live Headlines Updates: आज बुधवा, दिनांक 0७ जानेवारी 2026, राज्यातील थंडी, महापालिका निवडणुका अपडेट्स, आजच्या ताज्या बातम्या, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर..

डंपिंगवर आता केंद्र सरकारकडून बंदी

कचऱ्यावर प्रक्रिया करुन विद्युत निर्मितीचा प्रकल्प..पुढील तीन चार वर्षात डंपिंगचा विषय संपेल..कचरा निर्मुलन संदर्भात फडणवीसांची माहिती..

Malad: मालाड पश्चिमेत तेजेंद्र सिंग तिवानांचा प्रचार जोमात

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची तयारी

प्रभाग क्रमांक 47 मध्ये तिवानांचा जोरदार प्रचार

तेजेंद्र सिंग तिवाना हे भाजप-महायुतीचे उमेदवार

तेजेंद्र सिंग तिवानांना नागरिकांचा मोठा प्रतिसाद

Pune: पुण्याच्या चंदननगर परिसरात कोयता टोळीचा भर रस्त्यात राडा

पुण्याच्या चंदन नगर परिसरात कोयता टोळीचा भर रस्त्यात राडा

किरकोळ कारणावरून कोयता टोळीने दुचाकीची तोडफोड करत केली तरूणावर दगडफेक ..

पुण्यातील चंदन नगर परिसरात असलेल्या सोपान नगर मध्ये कोयता टोळीची दहशत..

कोयता टोळीच्या रस्त्यातील दहशतीमुळे नागरिक भयभीत..

पीएमपीकडून सुदामेला तिसरी नोटीस जारी

पीएमपी विना परवानगी रिल्स प्रकरण;

- पीएमपीने रिल्स स्टार इंफ्ल्यूएनसर अथर्व सुदामे ठोठावला ५० हजार रुपयांचा दंड

- दंड जमा करा अन्यथा माहिती तंत्रज्ञान कायद्यानंतर्गत गुन्हा दाखल करणार

- पीएमपी प्रशासनाची माहिती

Badlapur: बदलापूर एमआयडीसी भागात कंपनीला भीषण आग

पॅसिफिक ऑरगॅनिक केमिकल कंपनी.

बॉयलरचे होत आहेत स्फोट.

अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल...

कंपनीमध्ये कोणीही कामगार नसल्याचा प्राथमिक अंदाज.

अग्निशमन दलाने दिली माहिती...

Maharashtra Politics: ठाकरेंनी कामं थांबवल्यानं बुलेट ट्रेनला उशीर.

मुलाखती दरम्यान फडणवीसांच उध्दव ठाकरेंवर टीका.. मात्र 2028 पर्यंत मुंबईत बुलेट ट्रेन पहायला मिळेल.. फडणवीसांच वक्तव्य..

Nashik: नाशिक पेठ राष्ट्रीय महामार्गावर झाला भीषण अपघात

गुजरात राज्याला जोडणाऱ्या नाशिक पेठ राष्ट्रीय महामार्गावरील टोलनाक्याजवळ नाशिककडून भरधाव वेगाने येणाऱ्या स्कार्पिओ वाहनाने सिल्वासा पेठ कडून येणाऱ्या कारला समोरून धडक दिल्याने कारमधील तीन जण जागीच ठार तर पाच जण गंभीर जखमी झाले. तर स्कार्पिओ वाहनातील एक जण ठार असून जखमींना टोल नाका वरील रुग्णवाहिका चालक मयूर यांनी तात्काळ नाशिक ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल केले.

माजी महापौर किशोरी पेडणेकर कोट्यवधीच्या मालकीण

किशोरी पेडणेकर यांच्या वेगवेगळ्या बँक खात्यात मिळून ६४ हजार ७१० रुपये तर ८ लाख ४२ हजार ९५३ रुपये ठेवी स्वरुपात आहेत

किशोरी पेडणेकर यांच्याकडे ९३ कोटी १० लाखाचा स्थावर मालमत्ता आहे

तर पतीच्या नावे ४ कोटी ६९ लाख १० हजार स्थावर मालमत्ता आहे

कुटुंबाच्या जंगम मालमत्तेचा तपशील ५७ लाख २५ हजार ८५६ रुपये आहे तर

कुटुंबाची स्थावर मालमत्ता ४ कोटी ६९ लाख २० हजार आहे

किशोरी पेडणेकर यांनी २०१७ च्या निवडणुकीत १ कोटी ६१ लाख ५३ हजार २५१ रुपये दाखवली होती

Navi Mumbai: नवी मुंबईतील मनसे शिवसेना पक्षाच्या उमेदवारांसाठी मनसे नेते अमित ठाकरे मैदानात

नवी मुंबईत अमित ठाकरेंचा दौरा

शाखांना देणार भेटीगाठी

अमित ठाकरे यांचा दौरा दिघा येथून सुरू

दिघा ते वाशी असेल दौरा

अमित ठाकरे यांचे नवी मुंबईत आगमन

मनसे शिवसेनेच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी केले जोरदार स्वागत

पीएमपीकडून सुदामेला तिसरी नोटीस जारी

पीएमपी विना परवानगी रिल्स प्रकरण;

- पीएमपीने रिल्स स्टार इंफ्ल्यूएनसर अथर्व सुदामे ठोठावला ५० हजार रुपयांचा दंड

- दंड जमा करा अन्यथा माहिती तंत्रज्ञान कायद्यानंतर्गत गुन्हा दाखल करणार

- पीएमपी प्रशासनाची माहिती

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रचार रॅली

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघातून प्रचार रॅली काढत आहेत वरळी शिवडी आणि त्यानंतर सायन असा त्यांचा प्रचार दौरा असणार आहेत वरळीतून प्रचार रॅली शिवसेनेला मतदान करण्याचा आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मतदारांना करणार आहेत

राज ठाकरेंच्या आज विविध प्रभागांतील उमेदवारांना भेटी

प्रभाग 114 मध्ये देखील राज ठाकरेंनी दिली भेट

ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवार राजोल पाटील यांना भेट

राजोल पाटील यांच्या प्रचारासाठी राज ठाकरे दाखल

राजोल पाटील यांच्या प्रचारासाठी राज ठाकरे भांडुपमध्ये

मनसेचे उमेदवार यशवंत किल्लेदार यांच्या कार्यालयाला आज दिली उद्धव ठाकरे यांनी भेट

साधारण दोन दिवसांपूर्वी रश्मी ठाकरे यांनी सुद्धा या कार्यालयाला भेट दिली होती...

तर आज उद्धव ठाकरे यांनी भेट देत यशवंत किल्लेदार यांना दिले शुभेच्छा...

ठाकरे बंधूंच्या युतीनंतर दोन्ही पक्षाचे प्रमुख नेते हे एकमेकांच्या उमेदवारा यांच्या कार्यालयाला भेट देत आहेत...

Eknath Shinde: शिंदेंच्या ठाण्यात उद्या राज ठाकरेंचा रोड शो

ठाण्यातील मनसेच्या शाखांना देणार भेटी

ठाण्यातील उमेदवारांची घेणार सदिच्छा भेट

उद्या संध्याकाळी 5 वाजता राज ठाकरेंचा दौरा होणार सुरू

राजू शेट्टींचा मुंबईत ठाकरे बंधूंना पाठिंबा

राज्यातील इतर महापालिकेत काँग्रेसला पाठिंबा देणाऱ्या राजू शेट्टींचा मुंबईत मराठी माणसाची सत्ता यावी म्हणून ठाकरे बंधूंना पाठिंबा

तर महाराष्ट्राच्या हक्काचे किती प्रकल्प गुजरातला पाठवले ते पहा म्हणजे मुख्यमंत्र्यांच मराठी प्रेम कळेल, राजू शेट्टी यांचा मराठी माणसाच्या प्रेमावरून मुख्यमंत्र्यांना टोला

अकोल्यातील अकोटमध्ये भाजपाची MIMसोबत युती

अकोट येथील एमआयएमच्या युतीच्या संदर्भात भाजपा प्रदेशाध्यक्षांचे कडक पाऊल

विधानसभा आमदार प्रकाश भरसकाळे यांना कारणे दाखवा नोटीस

पक्षाची प्रतिमा मलिन झाल्याने रविंद्र चव्हाण यांची नोटीस

भाजपकडून अकोटमध्ये मोठ्या कारवाईचे संकेत

पुण्यातील दौंड-पाटस रोडवरील जगदंब हॉटेलमध्ये गॅसचा सिंलेडरचा भीषण स्फोट

दौंड-पाटस रोड वरील जगदंब हॉटेल मध्ये गॅसचा भीषण स्फोट

भीषण स्फोटात हॉटेल मधील 9 कामगार गंभीर भाजले

जखमी 9 कामगारांना रुग्णालयात केले दाखल

दुपारच्या दरम्यान कामगार काम करत असताना अचानक गॅसचा स्फोट झाल्याने हॉटेलमधील कामगार होरपळले

Washim: वड, पिंपळ आणि उमराच्या झाडांच्या एकत्रित वाढीत चक्क श्री गणेशाच्या मूर्तीचा आकार

वाशिमच्या शिरपूर जैन येथील ओंकारगिर बाबा संस्थान परिसरात एक आश्चर्यकारक आणि श्रद्धा वाढवणारे दृश्य भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे.येथील वड पिंपळ आणि उमराच्या झाडांच्या एकत्रित वाढीत चक्क श्री गणेशाच्या मूर्तीचा आकार स्पष्टपणे दिसून येत असल्याने या नैसर्गिक रचनेत गणरायांचे रूप दिसत असल्याचा भाविकांचा विश्वास असून, दर्शनासाठी आलेले भाविक मात्र हे दृश्य आपल्या मोबाईल फोन मधील कॅमेरा मध्ये टिपत आहे.श्रद्धा,आणि निसर्गचा अनोखा संगम अनुभवण्यासाठी भाविक ओंकारगिर बाबा संस्थान परिसरात आवर्जून हजेरी लावत आहेत...

Karad: बाळूमामा देवदर्शन घेऊन परत पुण्याच्या दिशेने जात असताना पाचवड फाटा येते येथे भीषण अपघात

कराड येथे पाचवड फाटा भाग्यलक्ष्मी पेट्रोल पंप हॉटेल समोर कोल्हापूर ते सातारा लाईनवर उभे राहिलेल्या कंटेनरला पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या शिफ्ट कार नं MH-12-QM-1290 या गाडीने जोरात धडक दिली. त्यामध्ये चार प्रवाशी होते. सुदैवाने जीवित हानी झाली नाही. या कारमध्ये चौघे जण किरकोळ जखमी झाले आहे. पुण्यावरून देवदर्शनासाठी बाळूमामाचे देवदर्शन घेऊन परत पुण्याच्या दिशेने जात असताना पाचवड फाटा येते हा अपघात घडला आहे.

अंबरनाथची काँग्रेस कार्यकारणी बरखास्त

भाजपसोबत आघाडी केल्याने कार्यकारणी बरखास्त

प्रदेशाध्यक्षांकडून कार्यकारणी बरखास्त केल्याचे पत्र जाहीर

चंद्रपूर- बावनकुळेंच्या प्रचार सभेत बंडखोरांचा गोंधळ

चंद्रपुरात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सभेत भाजप बंडखोर आणि समर्थकांनी घुसण्याचा केला प्रयत्न ,बावनकुळे यांनी पोलीस प्रशासनाला सुनावले बोल ,अशा पद्धतीने रॅलीत घुसखोरी होऊ नये हे पाहणे पोलिसांचे कर्तव्य असल्याचे मत, इंदिरानगर भागातील या प्रचार सभेत एबी फॉर्म नाकारलेल्या बंडखोर उमेदवाराच्या कार्यकर्त्यांनी शिरण्याचा केला होता प्रयत्न

BJP: भाजप उमेदवाराकडून प्रचार पत्रकाचं गुजराती भाषेतून वाटप

नवी मुबंईत भाजप उमेदवार प्रचार पत्रक हे गुजरात्री भाषेतुन वाटप करण्यात आलं आहे

या प्रचार पत्रकाला मनसेने विरोध केलाय

मनसेने आता या गुजराती भाषेवर हस्तक्षेप घेतलाय

भाजप सांगते की मराठी भाषेला राज्यभाषा दर्जा दिला आहे

आता नवी मुंबईत त्यांचेच उमेदवार गुजराती भाषाचा वापर करून कोणाला आकर्षित करत आहे

हे मराठी भाषेत का वाटले गेले नाही मराठी भाषेला पुन्हा एकदा दुय्यम दर्जा का दिला जातोय

नवी मुंबई शहराची ओळख ही आगरी कोळी भाषेची ओळख आहे...

Gadchiroli : आरोग्य व्यवस्थेच्या सुधारणेसाठी काँग्रेसचे धरणे

गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्य सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी आज काँग्रेसच्या वतीने गडचिरोलीतील मुख्य चौकात धरणे आंदोलन करण्यात आलं. रस्ते आणि पुलाअभावी अनेक गावांत रुग्णवाहिका पोहोचू शकत नाही. त्यामुळे अनेक रुग्ण आणि गरोदर मातांची पायपीट होऊन त्यांना वेळेवर उपचार मिळत नाही.

Ambernath : अंबरनाथच्या काँग्रेस शहराध्यक्षाचं निलंबन

अंबरनाथमध्ये निवडून आलेल्या काँग्रेस सदस्य आणि भाजप यांची युती झाल्यानंतर काँग्रेस पक्षाचे आक्रमक भूमिका घेतली आहे. संबंधित निर्णय काँग्रेस पक्षासोबत चर्चा न केल्याने घेतला असल्याचा काँग्रेस पक्षाचा ठपका असून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचे कारवाईचे पाऊल घेतले आहे.

Minister Nitesh Rane : हातपाय तोडण्याची भाषा करणाऱ्या MIM ला जशास तसे उत्तर देऊ.. मंत्री नितेश राणे यांचा MIMला इशारा

एमआयएमच्या वक्तव्यावर आम्ही गप्प बसणार नाही - राणे

Chandrashekhar Bawankule :  महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रचार सभेत पुन्हा एकदा भाजप बंडखोरांचा गोंधळ घालण्याचा प्रयत्न...

भाजप कार्यकर्ता मनोज पोतराजे यांनी त्याच्या समर्थकांसह बावनकुळे यांच्या प्रचार सभेत घुसण्याचा केला प्रयत्न मात्र पोलिसांनी पोतराजे याला अडवून प्रचार सभेतून लावलं हुसकावून, मनोज पोतराजे यांच्या पत्नीला म्हणजे पूजा पोतराजे हिला एम ई एल प्रभागातून जाहीर झाली होती भाजपची उमेदवारी

Thackeray Brothers : ठाकरे बंधूंच्या विशेष मुलाखतीचा टीझर जारी

(Thackeray Brothers ) महापालिका निवडणुकांसाठी सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. यातच अनेक दिवस राज ठाकरे - उद्धव ठाकरे यांची युती कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. पत्रकार परिषदेतून ठाकरे बंधू यांनी त्यांच्या युतीची घोषणा केली. याच पार्श्वभूमीवर आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची संयुक्त मुलाखत होणार आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची संयुक्त मुलाखत सामनातून प्रदर्शित केली जाणार असून ठाकरे बंधूंची एकत्रित ही पहिलीच मुलाखत असणार आहे. खासदार संजय राऊत ठाकरे आणि महेश मांजरेकर ठाकरे बंधूंची मुलाखत घेणार असून महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंची संयुक्त मुलाखत असणार आहे. याच पार्श्वभूमीवर आता ठाकरे बंधूंच्या विशेष मुलाखतीचा टीझर जारी करण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे.

Mumbai Elections : निवडणुकीपूर्वी अंतिम मतदार यादी मिळण्यास उशीर, प्रचारासाठी उमेदवारांना आव्हान

2026 च्या महापालिका निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होण्यात विलंब झाल्याचे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी जाहीर केले आहे. निवडणूक आयोगाकडून अंतिम मतदार यादी प्राप्त होण्यास उशीर झाल्यामुळे राजकीय पक्ष आणि उमेदवारांसमोर काही प्रमाणात अडचणी निर्माण झाल्या आहेत. सध्या निवडणुकीला अवघे आठ दिवस शिल्लक असताना, 227 प्रभागांच्या अंतिम मतदार यादीत अजूनही पूर्णता आलेली नाही. पालिकेच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, राज्य निवडणूक आयोगाकडून अंतिम याद्या यायला विलंब झाला आहे. सोमवारपर्यंत 227 प्रभागांपैकी 213 प्रभागांची अंतिम यादी प्राप्त झाली होती, तर मंगळवारी आणखी 13 प्रभागांची यादी मिळाली. मात्र, अजूनही एका प्रभागाची यादी प्राप्त होणे बाकी आहे.

Palghar : पालघरमध्ये पैसा दुप्पट करण्याचं आमिष दाखवून फसवणूक; खासगी कंपनीच्या मालकाला अटक

(Palghar) पालघरमध्ये पैसा दुप्पट करण्याचं आमिष दाखवून फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. पैसा दाम दुप्पट करून देण्याचं आमिष देऊन ग्राहकांना तब्बल दोन कोटी 39 लाख 46 हजार 698 रुपये रकमेचा गंडा घालण्यात आल्याची घटना घडली आहे. काही नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली होती . यापैकी तेरा गुंतवणूकदारांनी आपली फसवणूक झाल्याची तक्रार पालघर पोलीस अधीक्षक यांना दिली. या प्रकरणी आता खासगी कंपनीच्या मालकाला अटक करण्यात आली आहे. रिच टू मनी कंपनीच्या मालकाला अटक केली असून

Budget 2026 : २०२६ च्या बजेटची तारीख काय आहे ? 1 फेब्रुवारी रोजी आला रविवार...

२०२६ च्या केंद्रीय अर्थसंकल्पाच्या सादरीकरणाची तयारी सुरू झाली आहे. केंद्रीय अर्थसंकल्प २०२६-२७ या आर्थिक वर्षाचा १ फेब्रुवारी (रविवार) रोजी सादर होण्याची अपेक्षा आहे. महत्त्वाचे म्हणजे, अलिकडच्या काळात पहिल्यांदाच रविवारी अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. टाईम्सच्या वृत्तानुसार, सूत्रांनी सूचित केले आहे की अर्थसंकल्पीय अधिवेशन २८ जानेवारी रोजी राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने सुरू होऊ शकते.

Sanjay Raut : 'सावरकरांचे विचार न मानणाऱ्या अजित पवारांना दूर करा'.. खासदार संजय राऊतांची मागणी

आज खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत भाजपवर जोरदार टीका केली. त्यांनी म्हटले की, “काल प्रथमच आपण पाहिलं की संयुक्त मुलाखतीला सर्व पत्रकारांना बसवलं होतं. दोन धुरंधर एकत्र आले – मुलाखत देणारे आणि घेणारे, आणि महाराष्ट्राच्या दृष्टीने ही मुलाखत झाली. महाराष्ट्राला जे प्रश्न आहेत, त्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्पष्ट मत व्यक्त केले. खणखणीतपणे त्यांनी महाराष्ट्राच्या समस्या मांडल्या.”

Eknath Shinde : एकनाथ शिंदे आज आदित्य ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात;पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वरळीत प्रचार दौरा

(Eknath Shinde) महापालिका निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. अनेक पक्ष जोरदार प्रचाराला लागले असून सभा, रॅलीचे आयोजन करण्यात येत आहे. येत्या 15 जानेवारी 2026 रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होणार असून 2869 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. प्रचाराला जोरदार सुरूवात झाली असून सभांचा धडाका पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आदित्य ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात असणार आहेत.

Onion Price : शेतकऱ्यांवर पुन्हा संकट! कांद्याच्या दरात मोठी घसरण

आशियातील कांद्याच्या प्रमुख बाजारपेठांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या काही दिवसांत कांद्याच्या बाजारभावात मोठी घसरण झाली आहे. याचा थेट फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसत असून, शेतकरी मोठ्या प्रमाणावर आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. गेल्या आठवड्याच्या तुलनेत कांद्याच्या दरात सुमारे ६०० रुपयांची घट झाली असून, मागील पंधरा दिवसांत तब्बल १ हजार रुपयांनी बाजारभाव खाली आले आहेत. या दरघसरणीमुळे शेतकऱ्यांच्या चिंता अधिकच वाढल्या आहेत.

BJP : केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते आज भाजपाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला जाणार

(BJP) येत्या 15 जानेवारी 2026 रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होणार असून 2869 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. महापालिका निवडणुकांसाठी सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. अनेक पक्ष जोरदार प्रचाराला लागले असून सभा, रॅलीचे आयोजन करण्यात येत आहे. राजकीय पक्षाकडून वचननामा जाहीर करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते आज भारतीय जनता पार्टीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला जाणार आहे.

WeatherUpdate : उत्तर भारतात कडाक्याची थंडी, महाराष्ट्रातही थंडीची लाट येण्याची शक्यता

देशभरात वातावरणात सातत्याने बदल होताना दिसत असून, उत्तर भारतात कडाक्याच्या थंडीने नागरिकांना अक्षरशः गोठवून टाकले आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील काही दिवसांत तापमानात आणखी घसरण होण्याची शक्यता असून, अनेक राज्यांमध्ये थंडीची लाट येण्याचा इशारा देण्यात आला आहे. हरियाणा, पंजाब, राजस्थान, मध्य प्रदेश, झारखंड, पश्चिम बंगाल आणि चंदीगड या भागांत तापमान झपाट्याने खाली येत असून, कडाक्याच्या थंडीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

उत्तर भारतातील या तीव्र थंडीचा परिणाम महाराष्ट्रावरही होताना दिसत आहे. राज्यातील अनेक भागांत गारठा वाढला असून, पुढील काही दिवसांत थंडी अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गोंदिया येथे यंदाचा सर्वांत कमी किमान तापमानाचा विक्रम नोंदवण्यात आला असून, येथे तापमान 7 अंश सेल्सिअसपर्यंत घसरले आहे. धुळ्यात 8 अंश सेल्सिअस, तर नागपूरमध्ये 7.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. विदर्भात शीतलहरीचा इशारा देण्यात आला असून, नागरिकांना आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

NCP : राष्ट्रवादीचा आज जाहीरनामा प्रसिद्ध होणार; काय असेल जाहीरनाम्यात याकडे सर्वांचं लक्ष

(NCP) महापालिका निवडणुकांसाठी सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. अनेक पक्ष जोरदार प्रचाराला लागले असून सभा, रॅलीचे आयोजन करण्यात येत आहे. पक्षाकडून वचननामा जाहीर करण्यात येत आहे. येत्या 15 जानेवारी 2026 रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होणार असून 2869 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचा आज जाहीरनामा प्रसिद्ध होणार आहे. सुनिल तटकरे, नवाब मलिकांच्या उपस्थितीत जाहीरनामा जाहीर करण्यात येणार आहे. मुंबईसह इतर पालिकांसाठी आज जाहीरनामा प्रसिद्ध केला जाणार असून दुपारी 2 वाजता वानखेडे स्टेडियममध्ये हा जाहीरनामा प्रसिद्ध केला जाणार आहे. या जाहीरनाम्यात नेमकं काय असेल याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.

Devendra Fadnavis Interview : मुख्यमंत्र्यांची आज मुलाखत; ठाणे शहराचा विकासाचा अजेंडा मांडला जाणार

( Devendra Fadnavis Interview) येत्या 15 जानेवारी 2026 रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, तर 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होणार असून 2869 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. अनेक पक्ष जोरदार प्रचाराला लागले असून सभा, रॅलीचे आयोजन करण्यात येत आहे. मुलाखती होताना पाहायला मिळत आहेत. याच पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत होणार आहे. महापालिका निवडणुकीसाठी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ठाण्यात गडकरी रंगायतन येथे मुलाखत घेतली जाणार असून या मुलाखतीत ठाणे शहराचा विकासाचा अजेंडा मांडला जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज अमरावती, अकोला दौऱ्यावर; पालिका निवडणुकीसाठी घेणार प्रचार सभा

(Eknath Shinde) महापालिका निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. अनेक पक्ष जोरदार प्रचाराला लागले असून सभा, रॅलीचे आयोजन करण्यात येत आहे. येत्या 15 जानेवारी 2026 रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होणार असून 2869 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. प्रचाराला जोरदार सुरूवात झाली असून सभांचा धडाका पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अमरावती, अकोला दौऱ्यावर असणार आहेत. पालिका निवडणुकीसाठी एकनाथ शिंदे प्रचार सभा घेणार आहेत. या सभेतून एकनाथ शिंदे काय बोलतात याकडे लक्ष लागले आहे. दुपारी 12 वाजता अमरावतीच्या नेहरू मैदानावर जाहीर सभा होणार असून अकोल्यात दुपारी 2 वाजता प्रचार सभा होणार आहे.

Sujat Ambedkar : काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्यावर पुन्हा सुजात आंबेडकरांची टीका..

काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्यावर वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी पुन्हा एकदा तीव्र शब्दांत टीका केली आहे. अमरावती येथे आयोजित एका कार्यक्रमात बोलताना सुजाता आंबेडकर यांनी प्रणिती शिंदे यांच्या भूमिकेवर गंभीर आरोप करत राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली. त्यांनी थेट विधानसभेच्या निवडणुकांतील भूमिकेवर बोट ठेवत, भाजपला अप्रत्यक्ष मदत केल्याचा आरोप केला.

Sonia Gandhi : सोनिया गांधींना न्यायालयाची मुदतवाढ

भारताचे नागरिक होण्याआधीच मतदारयादीत नाव समाविष्ट केल्याप्रकरणी म्हणणे मांडण्यासाठी मंगळवारी काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांनी वेळ मागून घेतली. दिल्ली उच्च न्यायालयाने ७ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे. यासंदर्भातील याचिका न्यायदंडाधिकाऱ्यांनी फेटाळल्यानंतर त्याविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे.राऊस एव्हेन्यू जिल्हा न्यायालयाच्या सेंट्रल दिल्ली बार असोसिएशनचे उपाध्यक्ष ॲड. विकास त्रिपाठी यांनी सोनिया गांधींविरोधात याचिका दाखल केली होती. १९८३मध्ये सोनिया गांधी भारताच्या नागरिक झाल्या पण, त्यापूर्वीच त्यांचे नाव मतदारयादीत समावेश केला गेला. ही फसवणूक असून लोकाधिकाराचा भंग ठरतो, असा दावा त्रिपाठी यांनी केला. या प्रकरणी उच्च न्यायालयाने ९ डिसेंबर रोजी सोनिया गांधींना आपले म्हणणे मांडण्याबाबत नोटीस बजावली होती.

ZP Election : जिल्हा परिषदांच्या निवडणुकांची घोषणा पुढील आठवड्यात होण्याची शक्यता..

राज्यातील जिल्हा परिषदांच्या निवडणुकांबाबत महत्त्वाची हालचाल सुरू असून, पुढील आठवड्यात निवडणुकांची घोषणा होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, या आठवड्यात निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता कमी असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. यामागे प्रामुख्याने आरक्षणाचा मुद्दा कारणीभूत ठरत असल्याचे सांगितले जात आहे.

सध्याच्या परिस्थितीत राज्यातील काही जिल्हा परिषदांमध्ये आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांपेक्षा अधिक गेली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षणाची एकूण मर्यादा ५० टक्क्यांपेक्षा जास्त असू नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे ज्या जिल्हा परिषदांमध्ये ही मर्यादा ओलांडली आहे, त्या ठिकाणी निवडणुका पुढे ढकलण्याचा पर्याय गांभीर्याने विचाराधीन आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com