Latest Marathi News Update live : संजय राऊत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीला
Marathi Live Headlines Updates: आज गुरूवार, दिनांक 08 जानेवारी 2026, राज्यातील थंडी, महापालिका निवडणुका अपडेट्स, आजच्या ताज्या बातम्या, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर..
Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची छत्रपती संभाजीनगरात भव्य डिजिटल सभा होणार
महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची छत्रपती संभाजीनगरात भव्य डिजिटल सभा होणार आहे.
Sandeep Deshpande : मनसे नेते संदीप देशपांडे यांची आज पत्रकार परिषद
मनसे नेते संदीप देशपांडे यांची आज पत्रकार परिषद होणार असून ते काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज अहिल्यानगर दौऱ्यावर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज अहिल्यानगर दौऱ्यावर असणार आहेत. दुपारी दोन वाजता शहरातील पांजरपोळ मैदानावर जाहीर सभा होणार आहे.
Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये वर्षा जाधवांच्या भावावर हल्ला
मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात प्रचारादरम्यान वाद वाढले आहेत. प्रभाग क्रमांक ५ मधील वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार वर्षा जाधव यांच्या भावावर प्रचार करताना हल्ला झाला
Amit Thackeray : मनसे नेते अमित ठाकरे यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र
मनसे नेते अमित ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात अमित ठाकरेंनी म्हटले आहे की, "गेल्या काही दिवसांपूर्वी सोलापूरमध्ये जे घडलं, ते आजही आमच्यासाठी अविश्वसनीय आहे. आमचा सहकारी बाळासाहेब सरवदे याला ज्या क्रूर पद्धतीने संपवण्यात आले, ते आजही विश्वास बसण्यापलीकडे आहे."
Sanjay Raut : संजय राऊत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीला
संजय राऊत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीला गेले असून 11 तारखेच्या संयुक्त सभेबाबत या भेटीत चर्चा होणार असल्याची माहिती मिळत आहे.
Eknath Shinde : नवी मुंबईत आज पुन्हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा रोड शो
नवी मुंबईत आज पुन्हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा रोड शो आहे. बेलापूर मतदार संघात एकनाथ शिंदे यांचा रोड शो असणार आहे.
Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील कन्नड घाटात भीषण अपघात
जळगाव जिल्ह्यातील कन्नड घाटात भीषण अपघात झाला आहे. घाटावरील वळणावर चालकाचं नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे.
Mohit Kamboj : मोहित कंबोज यांना न्यायालयाचा दिलासा
मोहित कंबोज यांना न्यायालयाचा दिलासा मिळाला असून मनी लाँड्रिंग प्रकरणातील क्लोजर रिपोर्ट न्यायालयाने स्वीकारला आहे.